संगमनेरात 94 तर अकोल्यात 51 गावात सरपंच उपसरपंच कोण? दोन गावांत तुंबळ हाणामार्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोले तालुक्यातील 51 ग्रामपंचायती व संगमनेर तालुक्यातील 94 अशा 145 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात प्रत्येक गावात आरक्षण जाहिर झाले. त्यानंतर आता सरपंच पदांच्या निवडीसाठी आज प्रशासनाने कार्यक्रम जाहिर केला होता. त्यात संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायती व अकोले तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच निवडी जाहिर करण्यात आलेल्या आहेत.
अकोले तालुक्यात मोग्रस येथे सरपंच ज्योती गायकर तर उपसरपंच संजय गोडसे, बोरी येथे सरपंच राहुल साबळे तर उपसरपंच निलेश गंभिरे, धामनगाव पाट येथे सरपंच दिपक पारधी तर उपसरपंच बाळु भोर, जाचकवाडी सभा तहकुब करण्यात आली. लहित येथे मंगला चौधरी सरपंच तर उपसरपंच विवेक चौधरी, परखतपूर सरपंच रिक्त व उपसरपंच भारत वाकचौरे, निळवंडे येथे सरपंच भाऊसाहेब मेंगाळ व उपसरपंच संजय कोकणे, नाचनठाव येथे सरपंच अंजनाबाई मधे व उपसरपंच मच्छिंद्र बर्वे, भोळेवाडी येथे सरपंच बाळु उंबरे व सुजाता देशमुख उपसरपंच, चितळवेढे सरपंच तार्दाबाई पथवे व उपसरपंच नवनाथ अरोटे, कळंब येथे सरपंच उत्तम लांडगे व उपसरपंच शकुंतला कदम, शेरणखेल येथे सरपंच दिपक पथवे व उपसरपंच प्रकाश कासार, औरंगपूर येथे सरपंच रिक्त व प्रकाश पाचपुते उपसरपंच, तांभोळ येथे सरपंच रिक्त व उपसरपंच सुखदेव कडाळे, उंचखडक बु सुलोचना शिंदे व उपसरपंच महिपाल देशमुख, आंबड येथे सरपंच रेशमा कानवडे व उपसरपंच नथु भोर, बदगी येथे सरपंच प्रणेश शिंगोटे व उपसरपंच धिरज शिंगोटे, वाघापूर येथे सरपंच सिमा लांडे, चैतन्यपूर येथे सरपंच नितीन डूंबरे व उपसरपंच महेश गवांदे, इंदोरी येथे सरपंच रिक्त व उपसरपंच वैभव नवले, घोडसरवाडी येथे सरपंच रिक्त, ढोकरी येथे सरपंचबेबी शेटे उपसरपंच किसन शेटे, लिंगदेव येथे सरपंच घोमल राणु व उपसरपंच फापाळे राजुबाई, पिंपळदरी येथे सरपंच रंधे संगिता व उपसरपंच रंधे राम, कळस बु येथे सरपंच संतोष गवांदे व उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, उंचखडक खु भास्कर पवार व उपसरपंच मनोज मोरे, बहिरवाडी येथे सरपंच गोरक्ष पाडेकर, रूंभोडीत रविंद्र मालुंजकर सरपंच व इंदिरा मालुंजकर, धामनगाव आवारी येथे सरपंच पुनम आवारी व उपसरपंच गणेश पापळ अशा व्यक्तींच्या निवडी पार पडल्या आहेत.
यात संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीची निवडणुक झाली. त्यानंतर आता सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या. यामध्ये थोरात विरुद्ध थोरात गट आमने सामने पाहायला मिळाले. तर तालुका पातळीवर पद घेऊन मिरवणाऱ्या मातब्बरांच्या पॅनलचा गावात मात्र पराभव झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. म्हणजेच तालुक्यात पास पण गावात मात्र नापास अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. एवढेच काय संगमनेर सहकारी कारखान्याचे चेअरमन व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यांना देखील सरपंच पदाच्या निवडीत गावात पराभवाला सामोरे जावे लागले. तर पठारभागावर ना. थोरतांचे शिलेदार अजय फटांगरे यांनी मात्र आपला गड राखला आहे. बोटा गटातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. खरंतर बोटागट हा विधानसभेला अकोले मतदारसंघाला जोडला जात आहे. तिथे पिचड पिता-पुत्रांनी लक्ष केंद्रित करून जनार्दन आहेर यांना ताकद देतील असे वाटत होते. पण प्रत्यक्ष मात्र तसे काही चित्र बघायला मिळाले नाही. त्यामुळे पिचडांचे पठारावर अक्षम्य दुर्लक्षच दिसत आहे .
संगमनेर तालुक्याबाबत सविस्तर माहिती अशी की, 94 ग्रामपंचायत वर सरपंच राज सुरू झाले आहे. यामध्ये मंगळवार दि.9 फेब्रुवारी रोजी 48 सरपंच उपसरपंच पदाची निवड झाली तर आज गुरुवार दि.11 फेब्रुवारी रोजी 46 सरपंच उपसरपंचाची निवड झाली आहे . या मध्ये आज झालेल्या निवडीमध्ये कनोली येथे सरपंच भाऊसाहेब पवार , उपसरपंच राधाकिसन काकड , हिवरगाव पावसा सरपंच सुभाष गडाख ,उपसरपंच सुजाता दवंगे ,मिर्झापूर येथे सरपंच शिवाजी वलवे , उपसरपंच कमल हांडे , निमगाव टेंभी सरपंच नानासाहेब वर्पे उपसरपंच नंदकिशोर शिंदे तर समनापूर येथे सरपंच कमल बर्डे, उपसरपंच सविता भवर , पिंपळगाव देपा येथे सरपंच अलका मिंडे उपसरपंच प्रदीप गुंड वरुडी पठार येथे सरपंच बाबाजी फटांगरे उपसरपंच सुरेखा फटांगरे तर महालवाडी येथे सरपंच सुरदर्शना कोठवळ उपसरपंच दत्तू घोडे ,सोनेवाडी येथे सरपंच रिक्त, उपसरपंच विनय गोमासे तर झोळे येथे प्रगती बोऱ्हाडे, उपसरपंच गोविंद खर्डे तर वनकुटे येथे सरपंच तुळशीराम रंधे, उपसरपंच पोपट होंडे तर संगमनेर खुर्द येथे सरपंच वैशाली सुपेकर, उपसरपंच गणेश शिंदे तर कुरकुटवाडी येथे सरपंच संगीता कुरकुटे, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे तर दाढ खुर्द येथे सरपंच सतीश जोशी, उपसरपंच राजेश्वरी जोशी तर आंबीखालसा येथे सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रशीद सय्यद तर शेडगाव येथे सरपंच राजेंद्र बर्डे, उपसरपंच दत्तात्रय नागरेतर अकलापुर येथे सरपंच अरुण वाघ, उपसरपंच संगीता डोंगरे तर मनोली येथे सरपंच अशोक पराड, उपसरपंच किसन शिंदे तर वडगाव लांडगा सरपंच रामनाथ रोकडे, उपसरपंच लक्ष्मण खानेकर तर जाखुरी येथे सरपंच नितीन पानसरे, उपसरपंच राजेंद्र पानसरे तर शिरापुर येथे सरपंच शैला पारासुर, उपसरपंच योगेश पवार तर मालदड येथे सरपंच गोरक्षनाथ नवले, उपसरपंच गणेश भालेराव तर कासारे येथे सरपंच महेश बोऱ्हाडे, उपसरपंच ज्योती नाईक तर पारेगाव बु येथे सरपंच संध्या गडाख, उपसरपंच गडाख बाळू तर सावरगावतळ येथे सरपंच देवराम गाडे, उपसरपंच लहानु थिटमे तर पिंप्रीलौकी अजमपूर येथे सरपंच नंदा गीते, उपसरपंच विकास दातीर तर पिमगिरी येथे सरपंच द्वारका डुबे, उपसरपंच खंडु जेडगुले तर वेल्हाळे येथे सरपंच रिक्त, उपसरपंच सखाहारी शरमाळे तर पळसखेडे येथे सरपंच संध्या कांडेकर, उपसरपंच संपत कांडेकर तर चिंचपुर बु. येथे सरपंच विवेक तांबे, उपसरपंच मिना थेटे तर पारेगावखुर्द येथे सरपंच रिक्त, उपसरपंच सखाहरी शरमाळे तर कोकणगाव सरपंच आशाबाई जोंधळे, उपसरपंच अरुण जोंधळे तर वरवंडी येथे सरपंच किरण नागरे, उपसरपंच पौर्णिमा भोसले तर बोटा येथे सरपंच सोनाली शेळके, उपसरपंच संतोष शेळके तर शेंडेवाडी येथे सरपंच कमल गावडे, उपसरपंच भाऊसाहेब उगले तर आंबीदुमाला येथे सरपंच जालिंदर गागरे, उपसरपंच भिवाजी ढेरंगे तर कासार दुमाला येथे सरपंच राजेंद्र त्रिभुवन, उपसरपंच आशा काळे तर तिगाव येथे सरपंच ज्ञानेश्वर सानप, उपसरपंच प्रकाश सानप तर पोखरीबाळेश्वर येथे सरपंच सुनिल काळे, उपसरपंच ज्ञानदेव मधे तर निमगाव बु येथे सरपंच प्रकाश कानवडे, उपसरपंच सचिन कानवडे तर कौठेकमळेश्वर येथे सरपंच मीरा भडांगे, उपसरपंच नवनाथ जोंधळे तर कौठेमलकापूर येथे सरपंच राहुल गंभीरे, उपसरपंच पोपट पचपिंड तर राजापूर येथे सरपंच शैला हासे, उपसरपंच बादशहा हासे तर पानोडी येथे सरपंच गणपत हजारे, उपसरपंच विक्रम थोरात तर सावरचोळ येथे सरपंच अनिता कानवडे, उपसरपंच सचिन कानवडे तर मेंढवन येथे सरपंच नंदू डापसे, उपसरपंच शुभांगी बढे यांची निवड झाली आहे. तर संगमनेर तालुक्यात यापुर्वी 48 ग्रामपंचायतींवर सरपंच राज सुरू झाल्याचे पहायला मिळाले. त्यात ओझर बु येथे सरपंच म्हणून स्वाती खेमनर, उपसरपंच संदिप नागरे, रायतेवाडीत सरपंच सतिष तनपुरे तर उपसरपंच हारिभाऊ मंडलिक, कौठे धांदरफळ येथे सरपंच विकास घुले तर उपसरपंच आशा क्षिरसागर, डिग्रस सरपंच रखमा खेमनर व उपसरपंच रंगनाथ बिडगर, कुरण येथे सरपंच सय्यद मुद्दतसर उपसरपंच शेख नदीम, खरशिंदे सरपंच सविता वाडेकर तर उपसरपंच अशोक बर्डे, नांदुर खंदरमाळ येथे सरपंच जयवंत सुपेकर तर उपसरपंच दिलीप दुधवडे, जवळे बाळेश्वर येथे सरपंच रामकृष्ण पांडे, उपसरपंच अतुल कौटे, कर्हेत सरपंच खंडू सानप तर उपसरपंच गुळवेताई, पिंपळगाव माथा येथे सरपंच सविता पांडे, उपसरपंच नारायण भांगरे, कौठे बु येथे सरपंच आशिष वाकळे तर उपसरपंच किरण वाकळे, खांडगाव येथे भरत गुंजाळ तर उपसरपंच लक्ष्मीबाई गुंजाळ,
कुरकुंडीत सरपंच शाहिन चौगुले तर उपसरपंच वनिता वायाळ, चनेगाव येथे अशोक खेमनर तर उपसरपंच गितांजली आसावा, माळेगाव पठार येथे सरपंच ज्ञानेश्वर पांडे तर उपसरपंच सुभाष गोडे, झरेकाठीत सरपंच अशोक वाणी तर उपसरपंच सुरज म्हंकाळे, भोजदरीत सरपंच शिल्पा पोखरकर व उपसरपंच विनायक शिंदे, प्रतापपूर येथे सरपंच दत्तात्रय अंधळे तर उपसरपंच संगिता आव्हाड, शिरसगाव धुपे येथे सरपंच गोडे रामनाथ तर उपसरपंच दिघे प्रविण, रायते येथे सरपंच रुपाली रोहम, तर उपसरपंच सुरज पानसरे, देवगाव येथे सरपंच अर्चना लामखेडे तर उपसरपंच सुनिल शिंदे, वडगाव पान येथे सरपंच श्रीनाथ थोरात तर उपसरपंच सोमनाथ गायकवाड, लोहारेत सरपंच ताराबाई सोनवणे तर उपसरपंच राहुल पोकळे, देवकौठे येथे सरपंच ज्योती मोकळ व उपसरपंच ज्योती कहांडळ, चंदनापुरीत सरपंच रहाणे शंकर व उप सरपंच राहणे भाऊसाहेब, खळीत जागा रिक्त आहेत तर उपसरपंच राजेंद चकोर आहेत.
नांदुरी दुमाला येथे सरपंच शेळके अर्चना तर उपसरपंच पथवे सोनबा, मंगळापूर येथे सरपंच शुभांगी पवार व उपसरपंच लक्ष्मणराव भोकनळ, मिरपूर येथे सरपंच रिक्त तर उपसरपंच कमलबाई कापकर, औरंगपूर येथे सरपंच लक्ष्मी वाकचौरे व उपसरपंच इंद्रभान तांबे, पिंपळे येथे सरपंच मिना ढोणे तर उपसरपंच तुकाराम चकोर, कोंची मांची सरपंच अमृता भास्कर व उपसरपंच सोमनाथ जोंधळे, खांबे येथे सरपंच रविंद्र दातीर, उपसरपंच भारत मुठे, कौठे खु येथे सरपंच विलास मेंगाळ व उपसरपंच गोरक्षनाथ ढोकरे, हिवरगाव पठार येथे सरपंच सुप्रिया मिसाळ व उपसरपंच दत्तात्रय वलवे, म्हसवंडीत सरपंच सुरेखा इथापे व उपसरपंच बोडके मंगेश. चिखलीत सरपंच जागा रिक्त आहे. तर उपसरपंच रत्नमाला हासे, माळेगाव हवेलीत सरपंच संदिप गायकवाड तर उपसरपंच गंगुबाई जुंबूकर, सावरगाव घुलेत सरपंच रिक्त तर उपसरपंच नामदेव घुले, निमगाव खु येथे सरपंच संदिप गोपाळे व उपसरपंच राहुल चंद्रमोरे,
सुकेवाडीत सरपंच योगिता कुटे तर उपसरपंच सुभाष कुटे, शिंदोडीत सरपंच रिक्त तर उपसरपंच पोपट कुदनर, जवळे कडलग येथे सरपंच रिक्त व उपसरपंच निलेश कडलग, शिबलापूर येथे सरपंच सचिन गायकवाड तर उपसरपंच दिलीप मुनतोडे, सांगवीत सरपंच विमल कातोरे व उपसरपंच नवनाथ कातोरे, सोनोशी येथे सरपंच सुदाम गिते व उपसरपंच राजेंद्र सानप, खंदरमाळवाडीत सरपंच फणसे शिवाजी व उपसरपंच शुभांगी शिरोळे, खांजापूर येथे सरपंच तुषार सातपुते व उपसरपंच गोविंद शिंदे अशा 48 ग्रामपंचायतींवर सरपंच राज सुरू झाला आहे. यात जवळजवळ बहुतांशी ग्रामपंचायतींवर ना. बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे.
तर अकोले तालुक्यात बेलापूर येथे सरपंच ज्योती जगताप तर उपसरपंच राजाराम फापाळे, नवलेवाडी येथे सरपंच विकास नवले तर उपसरपंच मिनाक्षी वाकचौरे, मेहेंदुरी येथे अमित येवले तर उपसरपंच मंजेरी आरोटे, विरगाव येथे सरपंच प्रगती वाकचौरे तर उपसरपंच जयवंत थोरात, कुंभेफळ रिक्त व उपसरपंच प्रिया पवार, वाशेरे रिक्त व उपसरपंच अनिता गजे, हिवरगाव येथे सरपंच शांताबाई मेंगाळ तर उपसरपंच संग्राम आंबरे, पिंपळगाव खांड रिक्त व उपसरपंच अलका शेटे, पांगरीत सरपंच रामदास खंडवे व उपसरपंच संदिप डोंगरे, टाकळीत सरपंच शितल तिकांडे व उपसरपंच दत्तु गरुड, कोतुळ येथे भास्कर लोहकरे सरपंच व संजय देशमुख उपसरपंच, म्हळदेवीत सरपंच मेंगाळ मारुती व उपसरपंच कविता प्रदिप हासे, सरपंच निब्रळ उल्हास पथवे व उपसरपंच उज्वला पथवे, मन्याळ येथे सरपंच अमित कुर्हाडे व उपसरपंच अशोक डोके, इंदोरी येथे रिक्त व उपसरपंच वैभव नवले, घोडसरवाडी येथे दोन्ही जागा रिक्त.
ढोकरी येथे सरपंच बेबी शेटे व उपसरपंच शेटे किसन, लिंगदेव येथे सरपंच घोमल अमित व उपसरपंच राजूबाई फापाळे, धुमाळवाडीत रविंद्र गोर्डे व उपसरपंच आशा धुमाळ, गणोरे येथे सरपंच संतोष आंबरे व उपसरपंच प्रदिप भालेराव, कळस खुर्द येथे सरपंच सुलोचना झोडगे व उपसरपंच रावसाहेब मेंगाळ, देवठाण सरपंच येथे बोडके केशव व उपसरपंच गिर्हे आनंदा आशा 22 ठिकाणांच्या निवडी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर या व्यतिरिक्त काही सरपंच निवडी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची माहिती प्रशासन रात्री उशिरापर्यंत संकलित करीत होते. त्यामुळे त्यांची माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही.
दरम्यान, अकोले तालुक्यात टाकळी येथे दोन गटात तुफान हाणामारी पहायला मिळाली. एका निवडून आलेल्या व्यक्तीने ऐनवेळी दुसर्या बाजुकडून कौल देणाचा प्रकार समोर आला असता एकच वादंग उभा राहिला होता. टाकळी हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांचे गाव आहे. त्यामुळे, येथील लढाई मोठी प्रतिष्ठेची होती. एकमेकांना बेदम हाणामार झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वादावर पडदा पडला. त्यानंतर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेले नव्हती. दरम्यान निवडणुकीच्या वेळी देखील उंचखडक बु येथे दोन गट आमने-सामने आल्यामुळे, तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, ऐनवेळी पोलीस निरीक्षक परमार यांनी कठोर शब्दात कारवाईंची तंबी दिल्यानंतर पुढील मतदान शांततेत पार पडले होते.