हातगाडा लावण्याहून संगमनेरात नंग्या तलवारी नाचल्या.! 9 जणांवर गुन्हे, पाच अटक.! तलवार, सुरी जप्त.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                       संगमनेर शहरातील लखमीपुरा परिसरात एका पाठ्याच्या दुकानासमोर दुसर्‍या व्यक्तीने चपलाचा गाडा लावल्याच्या किरकोळ कारणाहून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना मंगळवार दि. 23 रोजी भर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही गटातील तुंबळ हाणामारीत कोणी सुर्‍या आणल्या तर कोणी तलवारी आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. मात्र, त्यानंतर केवळ दहशत निर्माण केली. मात्र, फारसे काही कोणी जखमी झाले नाही. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही गटांचे वाद ऐकमेकांमध्ये मिटून गेले. मात्र, पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी कडक भुमिका घेत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करुन 9 जणांना आरोपी केले तर त्यातील 5 जणांना अटक देखील केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लखमीपुरा परिसरात मोठ्या वाहनांचे पाठे बसविण्याचे दुकान आहे. तर त्यांच्या दुकानासमोर दुसर्‍या व्यक्तीने चप्पलचे दुकान लावले होते. त्यामुळे, हे दोन्ही गट एकमेकांना समजावून सांगत असताना वाद टोकाला गेले आणि त्यांच्यावर मारामार्‍या सुरू झाल्या अशा प्रकारची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर हा प्रकार घडला असता काही व्यक्तींना थेट सुर्‍या तलवारी आणून लखमीपुरा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, संगमनेर शहरात चर्चेला एकच उधान सुटले. मात्र, कालांतराने यांच्यातील वाद संपल्यानंतर दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

दरम्यान, दोन्ही गटात वाद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जर अशा प्रकारे कोणी शस्त्रास्त्रे काढून शहरात दहशत माजवत असेल तर तोच पायंडा शहरात पडेल. त्यामुळे, देशमुख यांनी कायद्याच्या भूमिकेवर ठाम राहून दोन्ही गटांच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शफिक एजाज शेख, ओएस एजाज शेख, असिफ एजाज शेख, शरिफ एजाज शेख, गफार लतीफ शेख, दानिश सब्बीर शेख, फरान फारूक शेख, रफिक एजाज शेख, एजाज इस्माईल शेख अशा नऊ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

या गुन्ह्यात खुद्दे पोलीस कर्मचारी अमृत शिवाजी आढाव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करुन आरोपी यांच्याकडून एक तलवार आणि एक सुरा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी यांनी सार्वजानिक ठिकाणी बेकायदेशीर घातक हत्यारांसह जमाव करुन दहशत निर्माण केली. त्यामुळे, 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जेव्हा पोलिसांनी पाच जणांना अटक केली तेव्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महाले यांनी करुन कोर्टासमोर पोलीस कोठडी मागितली होती. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन पाच जणांना गुरूवार दि. 26 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

महत्वाचे.!
संगमनेर तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पाहता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या कॉटेज हॉस्पिटल येथे पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे, संगमनेरात जर कोणी कोरोना बाधित असेल तर त्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये जाण्यापेक्षा सरकारी रुग्णालयात विनाशुल्क लाभ घ्यावा. असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.