घ्या.! लॉकडाऊन आणखी कडक.! 10 नंतर संचारबंदी.! अन लग्नात नवरी-नवरदेवाला 10 हजार दंड.! पाचजण घेऊन फिराल तर मार खाल.!

सार्वभौम (अकोले) :- 

              लोकांना प्रशासनाने जीव तोडून सांगून देखील त्यांच्याकडून कोविड प्रतिबंधासाठी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे, नगर जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. तर ज्यांना कोणाला मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची हाऊस आहे. त्या नवरी नवरदेवाने जर आचारी आणि वाजंत्री धरुन 50 पेक्षा जास्त वर्‍हाड आणले तर त्यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड आणि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तर आज रात्रीपासून 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र दिसल्या तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांकडून महाप्रसाद देखील मिळणार आहे. या व्यतिरिक्त देखील काही कडक व कठोर निमय करुन कोविडच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अशी माहिती अकोले तालुक्याचे तहसिलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे.

आज राज्यात 5 हजार 710 रुग्ण मिळून आले आहेत. तर आजवर नगर जिल्ह्यात 74 हजार 638 इतके कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर 1 हजार 119 व्यक्तींना आपले प्राण गमविले आहेत. ही आकडेवारी कोठेतरी थांबेल, कोरोना निघून जाईल असे वाटत असताना नागरिकांनी हाताने दुखणे वाढवून घेतले आहेत. आज संगमनेर तालुक्यात 15 तर अकोले तालुक्यात 6 रुग्ण बाधित आहेत.जर आज एकाच दिवशी 178 रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रुग्ण कोपरगाव (53) व पारनेर तालुक्यात (29) असून अकोले तालुक्यात सर्वात कमी (1) आहे. त्यामुळे, एकंदर तालुक्यांचा विचार करता जिल्ह्यात संचारबंदी करणे प्रशासनाला योग्य वाटले आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी यांनी कठोर भूमिका घेत काही अंशी लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. त्यामुळे, किमान कोरोनाचा प्रसार होण्यापासून वाचणार आहे.

आता जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, आज दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी पासून रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत जो कोणी रस्त्यावर दिसेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे, रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कोणी घराच्या बाहेर पडू नये. अशा प्रकारचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. खरंतर दिवसभर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही तर रात्री शक्यतो रस्त्यावर कोणाची व किती गर्दी असते हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे, दिवसा नियमांचा बगडा उचलण्यापेक्षा रात्री नेमकी कोणावर कारवाई करणार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत. अर्थात लॉकडाऊन करण्याची ही पहिली पायरी आहे. त्यामुळे, जर गेल्या वर्षभरात जे काही भोगले, टाळ्या कुटल्या, भांडी फोडले, घंट्या वाजविल्या. हे सर्व नको असेल तर आजच नियमांचे कडेकोट पालन करावे असेच काहीसे सांगणे प्रशासनाचे आहे.

दोन रुपये कमविण्यासाठी दुधवाले, फळवाले, फेरीवाले, दुकानदार हे घरोघरी फिरत असतात तसेच त्यांचा मार्केट आणि व्यक्ती यांच्याशी संबंध येतो. मात्र, या दरम्यान हे व्यक्ती कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगत नाहीत. हे समोर आले आहे. त्यामुळे, अशा व्यक्तींनी मास्क वापरणे, त्यांच्याकडे सॅनिटायझर ठेवणे हे बंधनकारक असणार आहे. जर यांना सुचना करुन ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर ज्यांना काही लक्षणे आहेत त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी असे आदेशात म्हटले आहे.

जसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले, तेव्हापासून उतावळे नवरे इतके बेभान सुटले आहे की, कोणाला मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर याचे काही भानच राहिले नाही. लग्न समारंभ पाहिले तर मंगलकार्यालयांमध्ये तोबा गर्दी जमलेली दिसते. मंगलकार्यालयांच्या बाहेर लिहीलेले असते की, मास्क शिवाय आत प्रवेश काही. पण, त्यांचे परसणार कोण? आणि त्यांना अडविणार तरी कोण? त्यामुळे, हजारो लोकांची गर्दी नियम धाब्यावर बसून लग्न कार्याल होत असते. तर यापलिकडे अगदी लॉकडाऊनमध्ये दोन मानसात अंत्यविधी व्हायचा तेथे हजारो लोक एकात्र जमून दहावे मयती करताना दिसून येत आहेत. म्हणजे जो गेला, त्याच्या पाठोपाठ अनेकांना घालवायचे नियोजन आपण स्वत: करत आहोत. हे देखील समाजाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आता लग्न समारंभ व अंत्यविधीत 50 पेक्षा जास्त गर्दी राहणार नाही याची काळजी घेणे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेश करण्यात आले आहेत. आता ही रक्कम मंगलकार्यालयाच्या मालकाने भरायची की, नवरी नवरदेवाने हे त्यांनीच ठरवायचे आहे. 

तर आता शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. अकोले, संगमनेर किंवा यांसारख्या ग्रामिण भागातून जे काही विद्यार्थी शाळेला येतात त्यांना बसमध्ये बसायला सोडा.! उभे रहायला जागा नाही. त्यामुळे. 40 ते 50 ची मर्यादा असणार्‍या बसमध्ये 70 ते 80 प्रवासी अगदी लटकून प्रवास करताना दिसतात. तर या व्यतीरिक्त राजूर सारख्या ठिकाणी खाजगी गाड्यांमध्ये प्रवासी अगदी कोंबून-कोंबून भरतात. त्यामुळे, एक बाधित सापडला तर तो किती जणांना लागण करुन जातो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, यावर देखील प्रशासनाने काहीतरी उपायोजना काढून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. यात आता रेल्वे, बस, रिक्षा, ट्रॅव्हल्स, कॅब, बस यांच्यात बसताना मास्क अनिवार्य असणार आहे. अन्यथा जर विनामास्क वाहक व चालक यांनी प्रवेश दिला तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. खरंतर, खादाड जनतेने सर्व नियम धाब्यावर बसविल्यामुळे, सरकारने त्यांना पुन्हा लॉकडाऊनचा मेन्यु दिला आहे. त्यामुळे, आजापासून हॉटेल्स, फुड्स कोर्टस, रेस्टॅरंटस बार यांच्यात पुर्णत: गर्दी असणार नाही. तेथे 50 टक्के क्षमतेने सामाजिक अंतर ठेऊन स्वच्छतेच्या उपायोजना करणे बंधनकारक असणार आहे.