संगमनेरच्या कॉलेजमधुन कागदपत्रांची चोरी! कॉलेज म्हणे ते तुमचे तुम्हा पहा.! मग काय! कॉलेजच्या धटींगला विद्रोहीने दिले उत्तर.!
संगमनेर शहरातील गोखले ऐज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथून काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे चोरी गेली होती. त्यानंतर एक विद्यार्थ्यास अटक देखील करण्यात आली होती. तर त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला होता. मात्र, त्यात कागदपत्रे मिळून आली नाही. त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे चोरी गेली आहेत. त्यांनी कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता चोराच्या उलट्या बोंबा अशी गंमत पहायला मिळाली. म्हणजे विद्यार्थ्यांना धिर द्यायचा सोडून त्यांना दमदाटी करुन उलट तुमच्यावरच गुन्हे दाखल करु अशी धमकी देण्यात आली. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया खुद्द विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा मुद्दा थेट विद्रोही विद्यार्थी संघटनेने हाती घेतला आहे. त्यांनी कॉलेज प्रशासनाला शनिवार दि. 9 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हल काढण्याची मुदत दिली होती. मात्र, येथील प्रशासनाने दमबाजी करीत उडवाउडविची उत्तरे दिली. त्यामुळे, आज थेट विद्रोही संघटनेने बीएड महाविद्यालयाच्या गेटवर तेथील प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे ओढले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 7 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एका विद्यार्थ्याने कॉलेजमधून काही कागदपत्रांची चोरी केली होती. हा प्रकार केवळ आपल्या मित्रांचे नुकसान करण्याच्या हेतूने होते. त्यात कोणत्याही प्रकारे सराईत पद्धतीने चोरी करण्याचा मानस नव्हता. त्यामुळे, ही सराईत गुन्हेगारीने जोरी केली हे दाखविण्यासाठी त्याने प्रिंटरसह अन्य साहित्य देखील चोरुन नेले होते. मात्र, चोर कितना भी चालाख क्यों ना हो.! कोई ना कोई सुराग छोड ही जाता हैं! असेच येथे झाले. हा व्यक्ती एका सीसीटीव्हीत मिळून आला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
दरम्यान, हा सर्व प्रकार उघड झाला खरा. मात्र, ज्या-ज्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र चोरी गेले आहे. त्याचे काय? त्यात या निष्पाप विद्यार्थ्यांची चुक काय? म्हणून हे विद्यार्थी कॉलेज प्रशासनाकडे गेले. आमचे कागदपत्रे आम्ही कॉलेजकडे सुपुर्त केले होते. त्यामुळे, त्याला जबाबदार कॉलेज आहे. अशा भाषा ऐकल्यानंतर प्रशासनाने मोठा कहरच केला. तुमच्या कागदांचा आणि आमचा काही एक संंबंध नाही. आम्ही तुम्हाला फक्त कागदपत्र चोरी गेले याची एफआयआर देऊ पुढे तुम्ही ठरवायचे पुढे काय करायचे ते.! आता हे ऐकल्यानंतर भावी मास्तर ते मास्तरच.! हॉग झाले आणि त्यांची धाव असणार तरी कोठे? त्यांनी विद्रोही संघटनेशी संपर्क केला आणि तेथून खर्या अर्थाने कागदपत्रांसाठी चळवळीला प्रारंभ झाला.
जेव्हा एका विद्यार्थ्याने चोरी गेलेल्या कागदपत्रांना काढण्यासाठी किती खर्च येतो हे पाहिले असता तो 8 ते 9 हजार रुपये लागतात अशी माहिती मिळाली. त्यात गाडी भाडे, मुलगी असेल तर त्यांच्या पालकांना त्रास, त्यात प्रत्येकाला मानसिक त्रास, त्यात पुण्याचे हेलपाटे त्यात प्रत्येकाची आर्थिक चणचण किती गोष्टींना तोंड द्यायचे हे कॉलेज प्रशासनानेच सांगावे. स्वत:च्या चुका झाकून वर हात करणे त्यांना किती सोपे वाटते. मात्र, असे झाले तर उद्या विद्यार्थ्यांची शिकण्याची मानसिकता राहिल का? पालक मुलींना शाळेत घालतील का? जेथे शिक्षणाचे मंदीर आहे तेथे जर विद्यार्थ्यांना वार्यावर सोडले जाते तर त्या मंदिरातील पुजारी खरोखर विद्यार्थ्यांबाबत संवेदनशिल आहेत का? असे अनेक प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे, हा प्रश्न आता थेट मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या दालनात जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यी संघटनांनी दिली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्रोही संघटना उभी ठाकली आहे. त्यांनी शनिवार दि. 9 जानेवारी रोजी बीएड कॉलेजच्या समोर आंदोलन केले. त्यात स्वप्नील धांडे म्हणाले की, शेतकरी आणि मजूर व्यक्ती मोठ्या कष्टाने मुलांना उच्चशिक्षणापर्यंत शिकवत असतो. मात्र, त्यांच्या कष्टावर पाणी फिरविण्याचे काम या महाविद्यालयाने केले आहे. मोठ्या विश्वासाने विद्यार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे कॉलेजकडे दिली होती. मात्र, ते कॉलेजमधून चोरी जाणे ही फार मोठी गंभीर बाब आहे. आम्ही वार कॉलेज प्रशासन तसेच प्रांताधिकारी व तहसिलदार यांना विनंती करुन देखील या सर्वांनी या गोष्टीकडे गांभिर्याने पाहिले नाही. तर कॉलेजच्या प्राचार्य मॅडम आपल्या पदाच्या गैरवापर करुन विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहेत. मग या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा 10 हजार रुपये खर्च कोणी द्यायचा? महाविद्यालय फक्त त्यांच्या प्रॉपर्टीची काळजी करीत आहे. मात्र, अनेक विद्यार्थी येथे दुर्गम भागातून तसेच गरिबीतून आले आहेत त्यांची या कॉलेजला काहीच काळजी नाही.
संघटनेचे पदाधिकारी स्वप्नील धांडे पुढे म्हणाले की, अर्थात कॉलज हे विद्यार्थी आहेत म्हणून उभे आहेत हे त्यांनी विसरु नये. आजवर येथील विद्यार्थी बोलत नाहीत, अन्याय सहन करतात म्हणून त्यांना वाटेल तसे वागविण्याचे काम हे कॉलेज करीत आहे. त्यामुळे, आता या कॉलेज प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्याची तयारी करीत आहोत. हे कॉलेज स्वत:च्या अविर्भावात व प्रतिष्ठेच्या वावरात यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावले आहे. त्यामुळे, जोवर कॉलेज प्रशासन यावर ठामपणे निर्णय घेत नाही व उत्तर देत नाही तोवर मोठे आंदोनल छेडणार आहोत. आता यानंतरचे आंदोलन थेट संस्थेचे मुख्य कार्यालय नाशिक येथे करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा पवित्रा संघटनेने घेतला आहे. त्यामुळे, या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळतो की नाही. याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.