संगमनेरचे देशमुख व अकोल्याचे परमार खरच यांची चुक होती का? आमदारांचा शब्द एसपींनी पाळला.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची पुन्हा अकोले पोलीस ठाण्यात नेमणुक करण्यात आली आहे. तर यापुर्वीच संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची देखील पुन्हा शहर पोलीस ठाण्यात नेमणुक झाली आहे. त्यामुळे, दोन्ही पोलीस ठाण्यातील वातावरण जैसे थे झाले असून आता पोलीस ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अकोले व संगमनेर अशा दोन्ही पोलीस ठाण्यात एकापाठोपाठ दोन लाचलुचपतचे छापे पडले होते. त्याला दोषी धरुन दोन्ही पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षेत बदली करण्यात आली होती. मात्र, चौकशीअंती देशमुख व परमार यांचा या ट्रॅपशी काही एक संबंध नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

खरंतर जेव्हा संगमनेर पोलीस ठाण्यात देशमुख याच्यावर छापा पडला होता. तो फक्त एक हजार रुपयांचा होता. त्यामुळे, ही रक्कम पाहता त्यात कोण्या अधिकार्‍याचा हात असेल असे म्हणणे चुकीचे ठरेल. तर एक हजार रुपयांत नेमकी किती वाटेकरी? त्यामुळे, ही पोलीस कर्मचार्‍याची वैयक्तीक डिमांड होती. हे नि:शंक आहे. तर यातील दुसरी महत्वाची बाब म्हणजे जेव्हा हा ट्रॉप झाला होता तेव्हा खुद्द पोलीस निरीक्षक पोलीस अधिक्षक यांनी आयोजित केलेल्या क्राईम मिटींगला होते. त्यामुळे, त्यांच्या गैरहजेरीत मागे कर्मचारी अशा प्रकारचे गुण उधळत असेल तर पोलीस अधिकार्‍यांची चुक काय?   त्यामुळे, एखाद्या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करताना किमाण त्यांची चुक आहे की नाही? याचा तपास करणे आवश्यक आहे. अन्यथा, जर अंदाधुंद कारवाया झाल्या तर पोलीस अधिकार्‍यांना काम करताना त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखे होईल. त्यांचे मनोबल तुटले जाईल. विशेष म्हणजे, पहिली कारवाई करण्यापेक्षा पहिली चौकशी झाली तर आज जसे अकोले व संगमनेर पोलीस निरीक्षकांना महिनाभर नियंत्रण कक्षेत थांबावे लागले. ती त्यांची मानसिकता काय असेल हे त्यांनाच माहिती. त्यामुळे, पहिली चौकशी आणि दोषी तर कारवाई अन्यथा वर्दीला बळ दिले पाहिजे अशी चर्चा खकीच्या मुखातून बाहेर पडू लागली आहे.

आता पोलीस निरीक्षक अभय परमार यांना नियंत्रण कक्षेत जमा केले होते. त्यांची चुक काय? तर ज्या वाघ पोलीस कर्मचार्‍याने लाच घेतली होती. तो त्या दिवशी सुट्टीवर होता. इतकेच काय! त्या दिवशी त्याने पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नव्हता. आता एखादा कर्मचारी साप्ताहीक सुट्टीवर असेल तर तो कोठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, कोणाला फोन करतो याचे सार्वभौमत्व संविधानाने त्याला दिले आहे. मात्र, त्याने जर ड्युटीवर नसताना एखादे कुकर्म केले तर त्याला पोलीस निरीक्षक कसा जबाबदार असु शकतो? अन्यथा गृहमंत्र्यांनी प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यास जीपीएस यंत्रणा बसविली पाहिजे आणि डोक्यावर सीसीटीव्ही. हे सर्व हॉरीबल वाटत असले तरी जर पोलीस कर्मचारी सुट्टीवर असल्यानंतर देखील प्रभारी अधिकार्‍यावर कारवाई होणार असेल तर अशा प्रकारच्या नियमांची गरज येणार्‍या काळात निर्माण होऊ शकते.

दरम्यान, अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे हे अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारणारे व्यक्तमत्व आहे. त्यांनी पोलीस अधिक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांना स्पष्टपणे सांगितले होते की, लाच घेणारा संबंधित कर्मचारी हा सुट्टीवर होता. त्यात पीआयची काय चुक? जर ते चुक असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र, कोणावर अन्याय व्हायला नको. त्यामुळे, पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. म्हणुन तर अकोले पोलीस ठाण्यात लवकर अन्य कोणाची नेमणुक झाली नाही. या दरम्यान जेव्हा मनसेला कळले की, पुन्हा तेच पीआय देणार आहेत तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे स्टण्ट उभा केला. साहेबांची फेरनियुक्ती करावी म्हणून कशा प्रकार आंदोलन झाले हे सर्वांनी पाहिले. तर काही किती तराट व्यक्तींनी देखील ही मागणी केली होती. अर्थात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वगळता जर कोणाच्या अंदोलनाने पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्त्या होत असत्या तर पोलीस अधिक्षकांची गरज काय होती? त्यामुळे, परमार यांच्या नियुक्तीचे जर कोणी श्रेय्य लाटण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो निव्वळ राजकीय स्टण्ट म्हणावा लागेल. परंतु, खर्‍या अर्थाने डॉ. किरण लहामटे यांचा अग्रह आणि पोलीस निरीक्षकांच्या भेटीगाठी यामुळे हा दोन्ही नियुक्त्यांना यश आले आहे. ते देखील त्यांची चुक नव्हती हे सिद्ध झाल्यानंतर. त्यामुळे, येथे कोणाचे श्रेय्य नाही अशा प्रतिक्रिया तालुक्यातून येऊ लागल्या आहेत.

यापलिकडे एक महत्वाची बाब म्हणजे पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर व पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी जो काही पायंडा पाडला आहे. तो नक्कीच योग्य आहे. जर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ऑन ड्युटी आहे आणि त्याच्या उपस्थितीत अशा प्रकारे लाचलुचपतचा छापा पडतो. तर याचा अर्थ नक्कीच त्याचे पोलीस कर्मचार्‍यांवर नियंत्रण नाही. किंवा त्याचे हात कोठेतरी पांढरे झालेले आहेत. त्यामुळे, अशा वेळी संबंधित अधिकार्‍यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याची नियंत्रण कक्षेत बदली झाली पाहिजे. मात्र, चौकशीत दोषी ठरण्यापुर्वी कारवाई होत असेल तर तो मनोबल खचविण्यासारखा प्रकार आहे. हे नक्कीच.!