संगमनेरात 94 ग्रामपंचायती, 1 हजार 482 उमेदवार, 932 जणांची माघार.! 192 विजयी, 4 मंत्रालये बिनविरोध.!
- सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :- संगमनेर तालुक्यात 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून तालुक्यात निव्वळ राजकीय दंगल पहायला मिळत आहे. 888 जागांसाठी तब्बल 2 हजार 679 अर्ज इच्छिुक उमेदवारांनी भरले होते. मात्र, त्यानंतर अर्ज छाननीत केवळ 2 हजार 606 अर्ज शिल्लक राहिले. त्यानंतर आज सोमवार दि. 4 जानेवारी 2021 रोजी माघारीची तारीख असल्यामुळे अनेक हौशे-नौशे-गौशे यांना अर्ज माघारी घ्यावे लागले आहेत. तर कोणी गावच्या विकासासाठी नमते घेतले आहे. त्यामुळे 932 व्यक्तींनी त्यांच्या अर्ज माघारी घेेतले असून आता 1 हजार 482 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. यात वट असणारे 41 उमेदवार बिनविरोध निवडुन आले असून केवळ 94 पैकी फक्त 4 ग्रामपंचायती (मिनी मंत्रालये) बिनविरोध झाल्याची आकडेवारी निवडणुक अधिकारी अमोल निकम यांनी दिली आहे. या आकडेवारीमुळे संगमनेरात राजकारण किती प्रगल्भ असून लोकशाहीच्या उत्सवाचा येथे जनता पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. खरंतर ना. बाळासाहेब थोरात हे लोकशाही आणि संविधानाच्या विचारधारेचे आहेत. त्यामुळे, सहाजिकच येथे निवडणुका ह्या रंगतदार होतात असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
यात वडगाव पान येथे 5 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, सावरचोळ येथे 11 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, कोकणगाव येथे 6 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, अकलापुर येथे 2 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, अंबीखालसा येथे 06 जणांची माघार, 00 उमेदवार रिंगणात तर 11 बिनविरोध, आंबीदुमाला येथे 11 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, ओझर बु येथे 08 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, औरंगपूर येथे 14 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, कनोली येथे 11 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, कर्हे येथे 08 जणांची माघार, 15 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
कसारा दुमाला, येथे 28 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, कसारे येथे 15 जणांची माघार, 21 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, कुरकुंडी येथे 03 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, कुरकुटवाडी येथे 3 जणांची माघार, 07 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, कुरण येथे 21 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, कोंची-मांची येथे 2 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 06 बिनविरोध, कौठे खु येथे 03 जणांची माघार, 07 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, कौठे बु येथे 07 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
कौठेकमळेश्वर येथे 14 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, कौठे धांदरफळ येथे 14 जणांची माघार, 09 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, कौठे मकलापुर येथे 08 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, खंदरमाळवाडी येथे 04 जणांची माघार, 09 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, खरशिदे येथे 01 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, खळी येथे 02 जणांची माघार, 09 उमेदवार रिंगणात तर 05 बिनविरोध, खंचापुर येथे 06 जणांची माघार, 16 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, खांडगाव येथे 23 जणांची माघार, 25 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, खांबे येथे 09 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, चंदनापुरी येथे 16 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध,
चणेगाव येथे 4 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, चिंचपुर बु येथे 30 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, चिखली येथे 11 जणांची माघार, 21 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, जवळे कडलग येथे 3 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, जवळे बाळेश्वर येथे 6 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, जाखुरी येथे 10 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, झरेकाठी येथे 18 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, झोळे येथे 8 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, डिग्रस येथे 07 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, तिगाव येथे 6 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
दाढ खु येथे 10 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, देवकौठे येथे 4 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, देगवगाव येथे 04 जणांची माघार, 21 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, नांदुरखंदरमाळ येथे 5 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, नांदुरी दुमाला येथे 18 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, निमगाव ठेंभी येथे 3 जणांची माघार, 00 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, निमगाव बु येथे 06 जणांची माघार, 00 उमेदवार रिंगणात तर 11 बिनविरोध, पळसखेडे येथे 10 जणांची माघार, 10 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, पानोडी येथे 10 जणांची माघार, 24 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
पारेगाव बु येथे 18 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, पिंपळगाव माथा येथे 00 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, पिंप्रीलोकी अजमपुर येथे 12 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, पेमगिरी येथे 17 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, पोखरी बाळेश्वर येथे 07 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, प्रतापपुर येथे 31 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, बोटा येथे 15 जणांची माघार, 29 उमेदवार रिंगणात तर 03 बिनविरोध, भोजदरी येथे 03 जणांची माघार, 99 उमेदवार रिंगणात तर 9 बिनविरोध, मंगळापूर येथे 20 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
मनोली येथे 16 जणांची माघार, 32 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, महालवाडी येथे 5 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, मलदाड येथे 33 जणांची माघार, 24 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, माळेगाव हवेली येथे 1 जणांची माघार, 11 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, मिरपुर येथे 11 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, मिर्झापूर येथे 5 जणांची माघार, 10 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, मेंढवण येथे 00 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, म्हसवंडी येथे 4 जणांची माघार, 04 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, राजापुर येथे 27 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
रायते येथे 3 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, रायतेवाडी येथे 18 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, लोहारे येथे 5 जणांची माघार, 04 उमेदवार रिंगणात तर 07 बिनविरोध, वडगाव लांडगा येथे 06 जणांची माघार, 31 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, वनकुटे येथे 3 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, वरवंडी येथे 12 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 08 बिनविरोध, वरुंडी पठार येथे 08 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, वेल्हाळे येथे 07 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, शिंदोडी येथे 4 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, शिबलापुर येथे 21 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
शिरसगाव धुपे येथे 14 जणांची माघार, 02 उमेदवार रिंगणात तर 06 बिनविरोध, शिरपुर येथे 03 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, शेंडीवाडी येथे 2 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, शेंडगाव येथे 18 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, समनापुर येथे 27 जणांची माघार, 33 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, सांगवी येथे 10 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, सावरगाव घुले येथे 03 जणांची माघार, 25 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, सावरगाव तळ येथे 2 जणांची माघार, 08 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, सुकेवाडी येथे 4 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
सोनेवाडी येथे 7 जणांची माघार, 15 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, सोनोशी येथे 11 जणांची माघार, 16 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, हिवरगाव पठार येथे 2 जणांची माघार, 2 उमेदवार रिंगणात तर 8 बिनविरोध, हिवरगाव पावसे येथे 11 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, निमगाव खु येथे 20 जणांची माघार, 08 उमेदवार रिंगणात तर 05 बिनविरोध, पिंपळगाव देपा येथे 15 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 03 बिनविरोध, संगमनेर खुर्द येथे 7 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, माळेगाव पठार येथे 3 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, पारगाव खु येथे 20 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, पिंपळे येथे 12 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.
तर अकोले तालुक्यात 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी पेटली आहे. त्यात 1 हजार 497 जणांनी आठ दिवसात अर्ज दाखल केले होते. आज सोमवार दि. 4 जानेवारी रोजी माघारीचा दिवस होता. त्यानंतर 1 हजार 132 जणांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. तर 365 उमेदवारांनी माघार घेतली आहे. आज 179 उमेदवार बिनविरोध आल्याचे निच्छीत झाले असून 287 जागांसाठी 568 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. अशी माहिती निवडणुक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. आज चितळवेडे, निळवंडे, कळंब, बहिरवाडी, वाघापूर, उंचखडक खु, निंब्रळ, जाचकवाडी, म्हाळदेवी, मोग्रस, मनोहरपूर अशा 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.