उसण्या पैशाहून धारधार शस्त्राने वार.! आठ जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक, संगमनेरातील घटना.!
संगमनेर शहरात उनसे पैसे घेण्या-देण्याच्या कारणाहून शहरातील दिल्लीनाका परिसरात दोन गटात तुफान हाणामार्या झाल्या. यात एक व्यक्तीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले असून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना मंगळवार दि. 19 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारस घडली. यात शापिनखान शौकत पठाण (रा. उपासनी गल्ली, संगमनेर) हे गंभीर स्वरुपात जखमी झाले आहे. त्यांच्यावर एखा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शापिखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, आरोपी सलीम हजी, सोनु कुरेशी, मुस्तगीम कुरेशी, सकीम सारभ कुरेशी, काशिक आसद कुरेशी, अमिर आसद कुरेशी, काले जानद कुरेशी व अब्दुल समद कुरेशी (रा. मदिनानगर, ता. संगमनेर) यांच्यासोबत पठाण यांची काही अर्थिक देवाणघेवण होती. त्यावर योग्यतो मार्ग काढून ते मिटविण्यासाठी आरोपी यांनी पठाण यांना काल मंगळवार दि. 19 रोजी दुपारी दिल्लीनाका येथे बोलावून घेतले होते.
दरम्यान, पठाण हे तेथे आल्यानंतर त्यांच्याशी काही चर्चा विनिमय करण्यात आला होता. मात्र, आरोपी यांनी संगनमत करुन गैरकायद्याची मंडळी जमा केली पठाण यांना बेदम मारहाण केली. यातील काही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्या, टॉमी, व कोणत्यातरी धारधार हत्याराने मारहाण केली. यात पठाण यांच्या डावे दंडावर, हाताच्या मनगटीवर, उजव्या हाताच्या मधल्या बोटावर, डावे गुढग्यावर तसेच पाठीवर मारहाण करुन जबरी जखमी केले आहे. तर याच दरम्यान त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
संगमनेरात आता वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. कारण, पुर्वी गुटखा व गांजा होता. आता खून, दरोडे व मारामार्या याच्यामुळे संगमनेर कोविड नंतर पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. कारण, काल 19 जानेवारी रोजी भर दुपारी दरोडा पडला तर त्यात एका महिलेला जीव गमवावा लागला असून बालिकेच्या कानास प्रचंड मोठ्या जखमा झाल्या आहेत. एकीकडे महिलेचा खून तर याचवेळी दुसरीकडे शहरात धारधार हत्याराने जिवघेणा हल्ला. या पलिकडे कुरण येथे दोन गटात दंगा अशा रोज अनेक घटना घडत आहे. त्यामुळे, येथे कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.