जिल्हा बँकेत प्रस्तापितांना डिच्चू.! संगमनेरातुन साहेबांनी दिले नवे चेहरे.! काय झालं आणि कसं होणार गणित.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 जिल्हा बँकेची 21 जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवार दि.25 पर्यंत अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. त्यातच संगमनेर मधुन जिल्हा बँकेला कोणाची वर्णी लागते हे उत्सुकतेच ठरत आहे. मागील तीस वर्षांपासून बाजीराव पाटील खेमनर व दहा वर्षांपासून रामदास पाटील वाघ हे दोन सदस्य जिल्हा बँकेवर ना. थोरतांच्या वर्चस्वाखाली निवडुन जात होते. मात्र, थोरतानी आता रणनीती बदलुन नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पुढील व्यूहरचना आखुन पाऊले टाखल्याचे पाहायला मिळत आहे. संगमनेर सहकारी कारखान्याचे चेअरमन माधवराव कानवडे व माजी जिल्हा परिषदेचे सभापती गणपतराव सांगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून या दोन जागेंवर शिक्कामोर्तब केला आहे. खरंतर हे दोन्ही नाव थोरतांनीच सुचवलेले असतील यात तीळ मात्र शंका नाही. कारण मागील दहा वर्षे माधवराव कानवडे हे स्व. भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे चेअरमन होते त्यांना सहकाराचा दांडगा अनुभव आहे. पण यावेळी त्यांना डावले गेले व ते पद बाबा ओहळ यांना बहाल झाले. खरंतर काँग्रेस तालुका अध्यक्ष असताना बाबा ओहळ यांना संगमनेर सहकारी कारखान्याचे चेअरमन पद मिळाले आहे. पण त्यांना स्वतःच्या गावात ग्रामपंचायतला संघर्षाला सामोरे जावा लागले आहे. त्यामुळे माधवराव कानवडे हे काही काळ प्रवाहात दिसले नाही. पण त्यांच्या सारख्या सहकारातील अनुभवी माणसाला बाहेर बसवणे हे थोरतांना देखील उचित वाटत नसावे. कारण जेष्ठ नेते बाजीराव खेमनर हे वयोवृद्ध झाल्याने त्यांना थांबणे हे स्वाभाविकच होते. पण कानवडें सारख्या मातब्बर आणि अनुभवी माणसांना कारखान्याच्या निवडणुकीपासुन बाहेर का ठेवले हे गणित मात्र कोणालाच कदाचित समजले नसावे. कारण, जिल्हा बँकेवर गेली दहा वर्षे थोरात-पिचड झेंडा फडकत आहे. पण मागील पाच वर्षात जिल्हा बँक घोटाळा मोठ्या प्रमाणात जिल्हाभर गाजला आहे. यामध्ये जिल्हाबँकेचे व्हा. चेअरमन यांच्या मुलाचा देखील समावेश असल्याची वार्ता काही माध्यमांनी दिली होती. जर रामदास वाघ याना पुन्हा संधी दिली असती तर थोरतांना घोटाळ्याच्या प्रश्नावर विरोधकांन पुढे संघर्षाला सामोरे जावे लागले असते. कारण उद्या कदाचित बँकेची निवडणूक झालीचं तर बँकेत घडलेला नोकर भरतीचा घोटाळा हा प्रचाराचा मुद्दा ठरवू शकतो. त्यामुळेच रामदास वाघ यांना निवडणूकीतून पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा निर्णय थोरतांना घ्यावा लागला त्यातच नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुका अध्यक्षाप्रमाणे रामदास वाघ यांना ही गावात पराभवाला सामोरे जावे लागल्याने अधिक नाराजी ओढुन घेण्यापेक्षा थोरतांनी निर्णय करून उमेदवारीची फिरवलेली भाकरी विशेष मानली जाते. त्यामुळे जिल्हाबँकेत थोरतांची भुमिका खंबीर पणे मांडणारा अनुभवी माणुस हवा होता. आणि तो अनुभव माधवराव कानवडे यांच्याकडे आहे. गणपतराव सांगळे यांनी आश्वि गटातुन आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र,त्यांना विखे गटाचे गुलाबराव सांगळे यांच्याकडुन पंचायत समितीला पराभव स्वीकारावा लागला होता. पण, आश्विगटात पुन्हा थोरतांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती व जिल्हापरिषद ओढुन आणायची असेल तर वंजारी समाजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते गणपतराव सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आहे हे थोरतांनी वेळीच ओळखुनच गणपतराव सांगळे यांचे नाव पुढे आणले असावे असे राजकीय विश्लेषकांना वाटते. ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत अश्विगटात थोरतांना चांगले यश मिळाले आहे. त्याचाच फायदा उठवत अश्विगटात थोरतांनी पंचायत समिती व जिल्हापरिषदाचे  राजकीय समीकरण गणपतराव सांगळे यांच्या माध्यमातून  आखले असावे असे जनतेला वाटते.