त्या चौघांनी महिलेेची छेडछाड करुन रॉड डोक्यात टाकला.!, दोघे जखमी, चौघांवर संगमनेरात गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
किरकोळ कारणास्तव दोन गटात वादंग झाले असता चार जणांनी मिळून एका महिलेस लोखंडी रॉडणे मारहाण केली. इतकेच काय! घरात कोणी नसताना लज्जा उत्पन्न होईल असे महिलेशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरातील अकोले नाका येथे 13 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात दातीर बाबमिया शेख, समीर दातीर शेख, अशपाक शौकत शेख, मलखा रमजान पठाण(सर्व रा. अकोले नाका,ता. संगमनेर) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हे दोन्ही ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहे. ते अकोले नाका परिसरात एकमेकांच्या जवळच राहतात.परंतु त्यांच्यामध्ये गेली अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद चालु आहे. हा वाद टोकाला गेल्याने आरोपी दातीर शेख, समीर शेख, अशपाक शेख, मलका पठाण हे फिर्यादी यांच्या घरात घुसले. फिर्यादी ही एकटीच असल्याने त्यांना दमदाटी करू लागले. तुझी सासु व नवरा आम्हाला तुम्ही राहत असलेली जमीन का देत नाही. आता तुझ्याकडे पाहतो. यावरून फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. तिचे हळूहळू मोठ्या वादात रूपांतर झाले. आरोपी यांनी मागे पुढे न पाहता लोखंडी गज व काठी फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. व फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मावस सासुला देखील आरोपींनी बेदम मारहाण केली.
दरम्यान, यातील काही आरोपी यांनी फिर्यादीच्या घरात घुसुन दमदाटी करीत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दातीर बाबमिया शेख, समीर दातीर शेख, अशपाक शौकत शेख, मलखा रमजान पठाण(सर्व रा. अकोले नाका,ता. संगमनेर) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.