आपलं ठेवांंयचं झाकुन लोकांचं पहायचं वाकुण.! पिचडांवर टिका कारणार्या मुंडेंचा आता राजिनामाच...!
नाव ठेवे लोकाला अन शेंबुड आपल्या नाकाला.! या म्हणीची प्रचिती आता धनंजय मुंडे यांच्याबाबत पहायला मिळाली आहे. कारण, याच धनंजय मुंडेंनी दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता अकोले तालुक्यातील राजूर येथे विधानसभेच्या प्रचारार्थ एक सभा घेतली होती. त्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या दुसर्या पत्नी संदर्भात गरळ ओकून त्यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टिका केली होती. तेव्हा त्यांना माहिती होते की, आपल्याला देखील आणखी एक पत्नी असून तिच्यापासून दोन मुले आहेत. मात्र, सगळं काही मनात ठेऊन आपलं ठेवायचं झाकुण अन लोकांचं पहायचं वाकूण अशी बेधुंदशाहीची शब्दफेक त्यांच्याकडून पहायला मिळाली. त्यामुळे, समोरच्याला बोलताना देखील आपल्याही बुडाखाली किती अंधार आहे. हे चाचपून बोलले पाहिजे. अशा प्रकारची टिका अकोले तालुक्यातील भाजपने त्यांच्यावर केली आहे.
बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2019, अकोले तालुक्यात विधानसभेच्या वादळी वार्यात धनंजय मुंडे यांचा झांजावात सुरू होता. अगदी त्यात काळात शरद पवार यांचे कट्टर समर्थक मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि थेट भाजप गाठले. त्याच्या पक्षबदलाने राज्यात सर्वात मोठी खळबळ उडली होती. त्यानंतर अकोल्यात प्रचारार्थ खुद्द शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सभा गाजविल्या होत्या. त्यावेळी हे मात्तबर नेते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दोन्ही पवारांनी संयमाने शब्दफेक करीत जनतेला आवहान केले होते. त्यानंतर जेव्हा धनंजय मुंडे यांनी जी काही राजुरमध्ये सभा घेतली होती. त्याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
तोंडाने फटकळ आणि वकृत्वावर कमांड मिळविलेल्या धनंजय मुंडेंच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. ते पिचडांवर काय टिका करणार? केवळ हे पाहण्यासाठी तोबा गर्दीने तोंडात बोट घातले होते. सकाळी 12 ची सभा थेट चार वाजता झाली. मात्र, तसुभरही गर्दी हाटली नव्हती. धनंजय मुंडे यांनी बोलण्यास सुरूवात केली आणि ते उच्चारले.! लै दिवसापासून माझी इच्छा होती. की, कधी मी एकदाचा राजुरला येथे येतोय. त्यांच्या वाक्याने मोठा जल्लोष झाला आणि म्हणाले, एखाद्या व्यक्तीला पक्ष का सोडावा लागतो तर 40 वर्षात या पिचडांनी काही न करता फक्त एकाचे दोन केले तर दुसरीने 15 कोटी केल्यामुळे पिचडांना पक्ष बदलायची वेळ येते. असे म्हणत थेट कौटुंबिक प्रश्नावर होत घातला होता. त्यामुळे, जनतेला ते ऐकण्यासाठी फार गोड वाटले होते. मात्र, या मुंडेंचा कारणामा आता कोणी मांडायचा? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
याचा मतितार्थ असा की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन स्वत: कबुल केले आहे की, मी माझ्या पत्नीच्या व्यतिरिक्त ही माझी मेहुणी असून परस्पर संमतीने त्यांच्यात संबंध आले आणि त्यातून दोन आपत्त्य झाली आहेत. म्हणजे, जेव्हा विधानसभा झाल्या तेव्हा हा सर्व प्रकार घडलेला होता. म्हणजे स्वत:ने दोनाचे एक नव्हे तर चार केलेले यांना दिसले नाही. मात्र, दुसर्याचे एकाचे दोन दिसले. त्यामुळे, आपलं ठेवायचं झाकुण अन लोकांचं पहायचं वाकूण या शब्दापलिकडे त्यांना दुसरी कोणती म्हण लागू होते? असा प्रश्न आता पिचड समर्थक विचारू लागले आहे. अर्थात दुसरा विवाह हा राजकारणाचा भाग मुळीच नव्हता. मात्र, त्यावेळी त्याला राजकीय अजेंड्यावर आणून त्याचे भांडवल केले गेले. फक्त आता मापक अपेक्षा इतकी आहे की, जर स्वत:च्या बुडाखाली इतका अंधार होता तर दुसर्यांकडे बोट करताना त्यांनी देखील थोडेफार तारतम्य बाळगायला हवे होते. असे मत आता भाजप कार्यकर्ते मांडू लागले आहेत.
दरम्यान, जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा निवडणुक आयोगाने ज्या काही नियम अटी दिल्या होत्या. त्यात मुंडे यांनी असणारे वास्तव नमुद केले होते का? यांना पहिल्या पत्नीपासून एक तर दुसर्या पत्नीपासून दोन असे तीन आपत्य होतात. त्यामुळे, त्यांनी निवडणुक लढविली कशी? विशेेष म्हणजे हे तिन्ही मुले त्यांच्या नावे आहेत. त्यामुळे, आता मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तशा प्रकारची तक्रार देखील दाखल झाली आहे. यात जेव्हा गुन्हा नोंदेल तेव्हा नोंदविला जाईल. मात्र, त्या व्यतिरिक्त निवडणुक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, त्यांना कदाचित तत्काळ राजिनामा देखील देण्याची वेळ येऊ शकते. आता ते सामजकल्याण मंत्री असून शरद पवार यांनी देखील काही सुचक वक्तव्य केले आहेत. त्यामुळे, मुंडे यांना राजिनामा देण्याची वेळ येणार आहे.