ब्रेकींग.! चुकीचे उपचार झाल्याने रुग्णाचा मृत्यु, डॉ. कोरडे व डॉ. सोनांबेकर या दोघांवर गुन्हा दाखल, पतीच्या न्यायासाठी पत्नीचा लढा यशस्वी.!


सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर शहरातील नामांकीत हॉस्पिटल सोनांबेकर येथे अकोले तालुक्यातील रुग्णाला चुकीचे उपचार झाल्याने रुग्ण दगवल्याची धक्कादायक घटना 22 मार्च 2025 रोजी घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे किडनी फेल्युअर झाली. त्यामुळे, रुग्ण दगावला गेला. मयताच्या  पत्नीने ही सर्व गोष्ट खटकली. तीने प्रशासकीय पातळीवर व न्यायालयीन लढा चालू ठेवला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपी डॉ.अभिजीत भाऊसाहेब कोरडे व डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर (रा. सोनांबेकर हॉस्पिटल अकोले बायपास,चैतन्यनगर,ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इतकेच काय, एका राजकीय नेत्याचे हॉस्पिटल विरुद्ध मा. न्यायाधीशांनी खाटीक असल्याची तक्रार केली होती. तरी देखील डॉक्टर सुधारण्याचे नाव घेत नसेल तर हे दुर्दैव आहे. काही बोटावर मोजण्यावितीरिक्त डॉक्टर सोडले तर माणसातील देव असल्याची भावना देखील लोकांनी सोशल मीडियावर मांडली आहे. खरंतर, डॉक्टरांच्या एका चुकीमुळे सामान्य व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे, काळजीपुर्वक रुग्णाला उपचार करणे देखील गरजेचे आहे असे मत तज्ञानी मांडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका व्यक्तीला छातीत दुखू लागले.  त्यामुळे, त्यांनी 27 फेब्रुवारी 2025  रोजी संगमनेर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या तपासण्या केल्या. त्यात लालपेशी व क्रीयेटीन हे नॉर्मल होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी रुग्णाचा एन्जोप्लास्टी करण्याच्या आधी रुग्णाच्या पुन्हा तपासण्या केल्या. त्यामध्ये रुग्णाचे रिपोर्ट सर्व नॉर्मल होते. हे सर्व रिपोर्ट घेऊन सोनांबेकर हॉस्पिटल मधील डॉ.अभिजीत कोरडे यांनी रुग्णाला स्टेन टाकण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांनी पुढील उपचारासाठी संमती देखील दाखवली. त्यानंतर रुग्णाला 1 मार्च 2025 रोजी मध्यरात्री एकदम अॅमीव्हॅल घेऊन स्टेन टाकली. त्यावेळी रुग्ण पूर्णपणे तंदरुस्त होते. 

                  रुग्णाचा आजार हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसवले. परंतु, रुग्णाला स्टेन टाकलेल्या जागेवर हाताला गॅंगरिंग झाल्याचे दोन्ही डॉक्टरांनी सांगीतले. मात्र, रुग्ण व्यवस्थित आहे असे देखील रुग्णाच्या पत्नीला सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी रिपोर्टचेक केले आणि क्रियाटीन 4.91 वर गेल्याची माहिती दिली. ही माहिती देण्याआधी सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पॅनलवर असलेल्या युरोलॉजीस्ट/नेफरोलॉजीस्ट यांना बोलविले नाही. आणि एन्जोप्लास्टिक करताना युरोलॉस्ट याना बोलविले नाही. त्यांनी फक्त खर्च जास्त येणार आहे असे रुग्णाच्या पत्नीला सांगितले.  आणि पैश्याचा तगादा लावण्यात आला. रुग्णाची प्रकृती ही खालावत चालली नंतर सोनांबेकर हॉस्पिटलमधून नाशिक येथे रुग्णाला हलवण्यात आले.

         दरम्यान, 3 मार्च 2025 रोजी रुग्णाला नाशिक येथे एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे महात्मा फुले जनारोग्य योजनेत रुग्णाचे उपचार बसतात का? हे तपासले असता सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये या योजनेचा सर्व लाभ घेतला आहे. त्यामुळे, नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये योजनेचा लाभ घेता येणार नाही. रुग्णाला हा खर्च न पेलवणार असल्याने त्यांनी पुन्हा घोटी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या दरम्यान तज्ञ डॉक्टरांकडुन असे निदर्शनास आले की, डॉ. अभिजीत कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्याकडून रुग्णाला उपचार करीत असताना निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झाला आहे. सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला उपचार घेत असताना युरोलॉजीस्ट किंवा नेफरॉलॉजिस्ट यांचे ओपिनियन का घेतले नाही. व किडनीच्या आजारावर उपचार करण्यात वेळ का घालवला? रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण किडनी फेल्युअर मध्ये गेलेले आहे असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तोपर्यंत फार वेळ गेलेला होता.

                     सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉ. अभिजीत कोरडे यांच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळे रुग्णाला किडनीचा विकार झाला. ते किडनी फेल्युअरमुळे दि. 22 मार्च 2025 रोजी डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे अकोले तालुक्यातील गरीब रुग्णाचा बळी गेला. हे जेव्हा पत्नीच्या लक्षात आले. तेव्हा रुग्णाच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली. संगमनेर न्यायालयासमोर आपली बाजु मांडली. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे व डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर (रा.सोनांबेकर हॉस्पिटल अकोले बायपास, चैतन्यनगर, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.