अकोले - संगमनेरात ग्रामपंचायतीवर पहा कोणात्या प्रवर्गाचा सरपंच.! भल्याभल्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.!
संगमनेर तालुक्यात 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात कोणाच्या गटाचा आणि कोणत्या जातीचे आरक्षण निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता यात अनुसुचित जातीच्या 13 जागा असून त्यात 7 खुला (पुरूष) व 6 स्त्रीया अनुसुचित जमातीसाठी 17 जागा असून 8 खुल्या व 9 महिलांसाठी, ओबीसीसाठी 39 जागा असून 19 खुल्या व 20 महिलांसाठी, सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी 74 जागा असून त्यात 37 खुल्या प्रवर्गासाठी तर 37 जागा महिलांसाठी अशा प्रकारचे आरक्षण निघाले आहे. खरंतर या आरक्षणामुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले असून धटींगशाहीचा आरक्षणाने कुच्चामोड केल्याचे पहायला मिळाले आहे. तर संगमनेर तालुक्यात ना. थोरात साहेबांचे निर्विवाद वर्चस्व राहिल्याचे दिसून आले आहे.
याबाबत सविस्तर आकडेवरी अशी की, अनुसुचित जातीसाठी खळी (महिला आरक्षण), शिंदोडी (महिला आरक्षण), कासारे मनोली, सारोळे पठार (महिला आरक्षण), माळेगाव हवेली, वेल्हाळे (महिला आरक्षण), कासारा दुमाला, सावरगाव घुले (महिला आरक्षण), रायते (महिला आरक्षण), देवकौठे, साकुर, हिवरगाव पठार अशा 13 जावांमध्ये एससी साठी आरक्षण जाहिर झाले आहे.
तर अनुसुचित जमातीसाठी शेंडेवाडी (महिला आरक्षण), चिकणी (महिला आरक्षण), सोनेवाडी (महिला आरक्षण), शेडगाव, पारेगाव खुर्द (महिला आरक्षण), आश्वी बु, निमज (महिला आरक्षण), कौठे खुर्द, कनोली, पिंपारणे, समनापूर (महिला आरक्षण), मिरपुर, जवळे कडलग (महिला आरक्षण), वडगाव लांडगा, सायखिंडी (महिला आरक्षण), चिखली (महिला आरक्षण), पोखरी हवेली अशा 16 जागेवर एसटी समाजाचे आरक्षण जाहिर झाले आहे.
त्यानंतर नागरिकांची खुला प्रवर्ग यासाठी जवळे बाळेश्वर, अकलापूर, डिग्रस, पानोडी, पळवखेडे, चिंचोली गुरव, चिंचपूर बु, लोहारे, औरंगापूर (महिला आरक्षण), वरवंडी (महिला आरक्षण), देवगाव (महिला आरक्षण), म्हसवंडी (महिला आरक्षण), डोळासणे (महिला आरक्षण), रहिमपूर (महिला आरक्षण), कौठे कमळेश्वर (महिला आरक्षण), पिंपळे (महिला आरक्षण), कोकणगाव (महिला आरक्षण), निमगाव जाळी (महिला आरक्षण), सुकेवाडी (महिला आरक्षण), तळेगाव (महिला आरक्षण), शिवलापूर, राजापूर (महिला आरक्षण), करुले, खांबे, काळवाडे (महिला आरक्षण), कुरण, वनकुटेे, मेंढवण, बोटा (महिला आरक्षण), कौठे मलकापूर, धांदरफळ खुर्द (महिला आरक्षण), पारेगाव बु (महिला आरक्षण), घारगाव, झोळे (महिला आरक्षण), चंदनापुरी कोंची मांची (महिला आरक्षण), मंगळापूर (महिला आरक्षण), चणेगाव, माळेगाव पठार अशा 39 जागांवर ओबीसींचे आरक्षण जाहिर झाले आहे.
यात सर्वसाधारण गटासाठी 74 जागांचे आरक्षण लागले आहे. त्यात दरेवाडी, खरशिंदे, मिर्झापूर, सावरगाव तळ, सोनाशी, तिगाव, निमगाव बु, गुंजाळवाडी, रायतेवाडी, निमगाव खु, कौठे धांदरफळ, हिवरगाव पावसा, दाढ खु, वरुंडी पठार, कर्हे, मालदाड, खांडगाव, खांजापूर, निमगाव टेंभा, शिरसगाव धुपे, आंबी खालसा, मांडवे, नांदुरी दुमाला, रणखांबवाडी, आंबी दुमाला, सादतपूर, खंदरमाळवाडी, पोखरी बाळेश्वर, नांदूर खंदरमाळ, वाघापूर (महिला आरक्षण), सांगवी, काकडवाडी (महिला आरक्षण), धांदरफळ (महिला आरक्षण), निमगाव भोजापूर (महिला आरक्षण), निंबाळे (महिला आरक्षण), निळवंडे (महिला आरक्षण), जांभूळवाडी (महिला आरक्षण), पिंप्री लौकी अजमपूर (महिला आरक्षण), कनकापूर (महिला आरक्षण), पिंपळगाव देपा (महिला आरक्षण), हंगेवाडी (महिला आरक्षण), पेमगिरी (महिला आरक्षण), अंभोरे (महिला आरक्षण), कौंठे बु, बोरबनवाडी (महिला आरक्षण), खराडी (महिला आरक्षण), कुरकुंडी (महिला आरक्षण), कुरकुटवाडी (महिला आरक्षण), भोजदरी (महिला आरक्षण), महालवाडी (महिला आरक्षण), ओझर बु (महिला आरक्षण), वडझरी बु (महिला आरक्षण), कर्जुल पठार (महिला आरक्षण), जांबुत बु (महिला आरक्षण), बिरेवाडी (महिला आरक्षण), वडगाव पान, आश्वी खु (महिला आरक्षण), प्रतापपूर, सावरचोळ (महिला आरक्षण), शिरापूर (महिला आरक्षण), घुलेवाडी (महिला आरक्षण), ओझर खुर्द (महिला आरक्षण), जोर्वे (महिला आरक्षण), जाखुरी, पिंपळगाव माथा (महिला आरक्षण), झरेकाठी, उंबरी बाळापूर (महिला आरक्षण), संगमनेर खु (महिला आरक्षण), नान्नज दुमाला (महिला आरक्षण), वडझरी खु, कोल्हेवाडी (महिला आरक्षण), मालुंजे (महिला आरक्षण), पिंपळगाव कोंझिरे (महिला आरक्षण), निमोण अशा 74 ठिकाणी ओपनचे आरक्षण लागले आहे.
तर अकोले तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात कोणाच्या गटाचा आणि कोणत्या जातीचे आरक्षण निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पिंपळगाव खांड येथे अनुसुचित जाती महिला, उंचखडक खु येथे अनुसुचित जाती, तांभोळ येथे कळस बु येथे अनुसुचित जाती, सुगाव बु येथे नागीरकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, बहिरवाडी नागीरकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), बोरी नागीरकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), ढोकरी नागीरकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, गर्दनी, उंचखडक ब, विरगाव अशा चार ठिकाणी नागीरकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला. तर धुमाळवाडी, मेहेंदुरी, डोंगरगाव, मन्याळे व कळस खु येथे नागीरकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी खुला).
या व्यतिरिक्त आंबड येथे सर्वसाधारण महिला, बदगी सर्वसाधारण, चास सर्वसाधारण महिला, चैतन्यपूर सर्वसाधारण, देवठाण सर्वसाधारण, धामनगाव आवारी सर्वसाधारण महिला, गणोरे सर्वसाधारण, जाचकवाडीत सर्वसाधारण महिला, पिंपळदरी सर्वसाधारण महिला, रूंभोडी सर्वसाधारण, रेडे सर्वसाधारण, सुगाव खु सर्वसाधारण महिला, टाकळी सर्वसाधारण महिला, वाघापूर सर्वसाधारण महिला, कळंब सर्वसाधारण, लहित बु सर्वसाधारण महिला, लहित खु सर्वसाधारण महिला, लिंगदेव सर्वसाधारण, मनोहरपूर सर्वसाधारण, मोग्रस सर्वसाधारण महिला, नवलेवाडीत सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण आहे.
तर वाशेरे, पिंपळगाव निपाणी या दोन ठिकाणी अनुसुचित जामाती, औरंगपूर येथे अनुसुचित जामाती महिला, बेलापूर अनुसुचित जामाती महिला, हिवरगाव अनुसुचित जामाती, इंदोरीत अनुसुचित जामाती महिला, जांभळे येथे अनुसुचित जामाती महिला, कुंभेफळ येथे अनुसुचित जामाती, परखतपूर येथे अनुसुचित जामाती अशा प्रकारे आरक्षण जाहिर झाले आहे.
विनंतीहून :- बातमी कॉपी करणार्या आईतखाऊंनी थोडेफार कस्ट करून स्वत: बातम्या तयार कराव्यात.!