तब्बल 4 वर्षानंतर तिच्या खुनाचे रहस्य उलगडले! तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल.! घारगाव फाट्यावरील घटना.!
तुझ्या आईने जो गुन्हा दाखल केला आहे, तो मागे घे असे म्हणत एक विवाहीत तरुणीला श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव फाट्यावर लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली होती. ही घटना दि. 16 मार्च 2017 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली होती. म्हणजे हा प्रकार जरी चार वर्षापुर्वीचा असला तरी आज पीडित मुलीच्या आईने दिलेल्या जबाबानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गिता उर्फ गितांजली बाणेश्वर काळे (वय 23, रा. बुर्हानगर, भिंगार, अ. नगर) ही विवाहीत तरुणी मयत झाली आहे. तर या घटनेत दादा विठोबा कोकरे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) व दिलीप भापकर (रा. बाणगा, ता. श्रीगोंदा) व अन्य एक अनोळखा व्यक्ती अशा तिघांना आरोपी करण्यात आले आहे.
भगवान के पास देर हैं, लेकीन अंधेर नाही.! अशी फार जुनी म्हण आहे. म्हणुन तर नगर शहरातील केडगाव परिसरात 2008 साली घडलेले अशोक लांडे खून प्रकरण 2012 साली उघड झाले आणि त्यात कोतकर पितापुत्रांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अरुषी हत्याकांडा, शिना बोरा हत्याकांड, मुंब्रा येथे अनैतिक संबंधातून झालेले हत्याकांड अशा अनेक घटना सांगता येतील, ज्यात तीने ते चार वर्षानंतर गुन्हे दाखल होऊन देखील त्यांचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे, कानुन के हाथ लंबे होते हैं! हे आता नव्याने सांगायला नको. अशीच आणखी एक प्रचिती अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पाहायला मिळाली आहे. आता या घटनेत गुन्हा दाखल झाला खरा.! मात्र, जर या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन सखोल तपास झाला. तर तो पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या कार्यकाळातील तो ऐतिहासिक तपास ठरु शकतो.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, गितांजली दि. 16 मार्च 2017 रोजी सायंकाळी घारगाव पाट्याहुन बसमधुन उतरुन पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी यांनी त्यांचा रस्ता आडविला आणि दादा कोकरे त्यांना म्हणाला की, तुझ्या आईने माझ्यावर केलेल्या केस काढून घे. त्यावेळी गिताजली यांनी कोकरे यास गुन्हा मागे घेण्यास नकार दर्शविला. त्यावेळी कोकरे यास राग आला आणि त्याने गितांजली यांच्या डोक्यात जोराने दांडा मारला. तर दिलीप भापकर आणि त्याच्यासोबत असणार्या अन्य एकाने गितांजली यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या दरम्यान, गितांजली यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यानंतर त्या दि. 2 एप्रिल 2017 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास उपचार घेण्यासाठी गेल्या असता त्यांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर याबाबत काही अक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यामुळे, ईडी दाखल असताना देखील त्याचा तपास सुरूच होता. दरम्यान चार वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये पोलिसांना सीए व पीएम रिपोर्ट निल आला असला तरी मयत गितांजली यांच्या आईने पोलिसांना एक जबाब दिला होता. त्यानंतर त्यात काही तत्थ आढळले असता कायदेशी पद्धतीने भिंगार पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मयत व्यक्ती भिंगार हाद्दीतील असल्यामुळे ती जेव्हा मयत झाली होती तेव्हा तिच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारे तक्रार नव्हती. तर तेव्हा ती स्वयंपाक करताना तिला विकनेस आला होता. तर ती चुहीहुन पडली होती अशा प्रकारच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर तिच्या आईने उपरोक्त जबाब दिले होते. मयत, तिची आई व आरोपी यांचे पुर्वी वाद झाले होते. त्यामुळे, यांनी तिला मारल्याचे जबाबत म्हटले आहे. त्यामुळे, तब्बल चार वर्षानंतर या गुन्ह्याला वाचा फुटली आहे. आता खरे काय आणि खोटे काय? याची उकल पोलीस लावतील. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यामुळे, पुन्हा एकदा उशिरा का होईना पण कोणावर अन्याय होणार नाही. याची खात्री न्यायालय आणि पोलीस घेत असतात. हे दिसून आले आहे. आता हा तपास शुन्य क्रमांकाने श्रीगोंदा पोलिसांंकडे वर्ग करण्यात आला आहे. लवकरच याची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.