11 ग्रामपंचायती बिनविरोध तर 568 उमेदवार रिंगणात, 179 विजयी, तर 365 जणांची माघार.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी पेटली आहे. त्यात 1 हजार 497 जणांनी आठ दिवसात अर्ज दाखल केले होते. आज सोमवार दि. 4 जानेवारी रोजी माघारीचा दिवस होता. त्यानंतर 1 हजार 132 जणांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. तर 365 उमेदवारांनी माघार घेतली आहे. आज 179 उमेदवार बिनविरोध आल्याचे निच्छीत झाले असून 287 जागांसाठी 568 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. अशी माहिती निवडणुक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. आज चितळवेडे, चैतन्यपुर, जांभळे, निळवंडे, कळंब, बहिरवाडी, वाघापूर, उंचखडक खु, निंब्रळ, जाचकवाडी, म्हाळदेवी, मोग्रस, मनोहरपूर अशा 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
गेल्या 11 दिवसांपासून 52 ग्रामपंचायतींचे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. या दरम्यान 1 हजार 497 अर्ज दाखल झाले होते. त्यात आज 31 डिसेंबर रोजी अर्ज छाननी सुरू झाली होती. त्यात 15 जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. त्यानंतर आज अर्ज माघार घेण्याची तारीख होती. त्यात385 व्यक्तींनी माघार घेतली आहे. तर 566 उमेदवार निवडणुकीच्या रिगणात कायम आहेत. त्यात सुगाव खुर्द गावात 25 जणांपैकी 15 व्यक्तींनी माघार घेतली असून 7 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 3 उमेदवार बिनविरेध आले आहे. आंबड गावात 28 जणांपैकी 10 व्यक्तींनी माघार घेतली असून 18 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. कळस बु येथे 32 जणांपैकी 4 व्यक्तींनी माघार घेतली असून 28 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.
चैतन्यपूर येथे 05 व्यक्ती बिनविरोध आलेल्या आहेत तर दोन जागा रिक्त आहेत. टाकळीत 27 जणांपैकी 07 व्यक्तींनी माघार घेतली असून 19 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 1 जणांनी माघार घेतली आहे. येथे बिनविरोधचा फंडा कामी आला नाही. मात्र, तिकांडे गटाने औंदा मागासवर्गीय व्यक्तींना आरक्षण सोडून संधी दिल्यामुळे, त्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. कळंब 13 जणांपैकी 07 व्यक्तींनी माघार घेतली असून 06 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 1 जागा रिक्त आहे. धामनगाव आवारी 50 अर्जांपैकी 23 व्यक्तींनी माघार घेतली असून 25 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 02 उमेदवार बिनविरोध आले आहे. हिवरगाव 32 अर्जांपैकी 12 व्यक्तींनी माघार घेतली असून 20 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. औरंगपूर 08 अर्जांपैकी कोणीही माघार घेतलेली नाही तर 2 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत, बाकी 6 उमेदवार बिनविरोध आले आहेत.
ब्राम्हणवाडा 34 अर्जांपैकी 06 व्यक्तींनी माघार घेतली असून 28 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. बेलापूर 27 अर्जांपैकी 06 व्यक्तींनी माघार घेतली असून 20 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 01 उमेदवार बिनविरोध आला आहे. गणोरे 47 अर्जांपैकी 20 व्यक्तींनी माघार घेतली असून 27 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. पांगरी 17 अर्जांपैकी 01 व्यक्तींनी माघार घेतली असून 14 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 02 उमेदवार बिनविरोध आले आहे. तर चितळवेढे 07 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. रूंभोडीत 30 अर्जांपैकी 15 व्यक्तींनी माघार घेतली असून 07 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 08 उमेदवार बिनविरोध आले आहे. धुमाळवाडी 44 अर्जांपैकी 24 व्यक्तींनी माघार घेतली असून 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 04 उमेदवार बिनविरोध आले आहे.
बहिरवाडी 08 अर्जांपैकी 01 व्यक्तींनी माघार घेतली असून 07 उमेदवार बिनविरोध आले आहे. वाघापूर 19 अर्जांपैकी 19 व्यक्तींनी माघार घेतली असून 09 उमेदवार बिनविरोध आले आहे. कोतुळ 60 अर्जांपैकी 20 व्यक्तींनी माघार घेतली असून 40 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. उंचखडक खु 09 उमेदवार बिनविरोध आले आहे. बदगी 14 अर्जांपैकी 05 व्यक्तींनी माघार घेतली असून 04 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 05 उमेदवार बिनविरोध आले आहे. इंदोरी 15 अर्जांपैकी 04 व्यक्तींनी माघार घेतली असून 06 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 05 उमेदवार बिनविरोध आले आहे. परखतपूर 16 अर्जांपैकी 08 व्यक्तींनी माघार घेतली असून 02 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 06 उमेदवार बिनविरोध आले आहे. मेहेंदुरी 37 अर्जांपैकी 12 व्यक्तींनी माघार घेतली असून 25 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. भोळेवाडी 04 उमेदवार बिनविरोध आले आहे.
नवलेवाडी 18 अर्जांपैकी 04 व्यक्तींनी माघार घेतली असून 07 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 07 उमेदवार बिनविरोध आले आहे. पिंपळगाव निपाणी 20 अर्जांपैकी 07 व्यक्तींनी माघार घेतली असून 07 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 06 उमेदवार बिनविरोध आले आहे. बोरी 14 अर्जांपैकी 01 व्यक्तींनी माघार घेतली असून 12 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 01 उमेदवार बिनविरोध आले आहे. वाशेरे 23 अर्जांपैकी 11 व्यक्तींनी माघार घेतली असून 11 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 01 उमेदवार बिनविरोध आले आहे. शेरणखेल 07 अर्जांपैकी 01 व्यक्तींनी माघार घेतली असून 06 उमेदवार बिनविरोध आले आहे. घोडसरवाडी 01 उमेदवार बिनविरोध आला आहे. नाचणठाव 11 अर्जांपैकी 03 व्यक्तींनी माघार घेतली असून 2 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 06 उमेदवार बिनविरोध आले आहे. निंब्रळ 18 अर्जांपैकी 09 व्यक्तींनी माघार घेतली असून ही ग्रामपंचायत बिनविरोध आली आहे.
जाचकवाडी 06 उमेदवार बिनविरोध आले असून एक जागा रिक्त आहे. म्हाळदेवी 07 उमेदवार बिनविरोध आले आहेत. लहित बु 17 अर्जांपैकी 01 व्यक्तींनी माघार घेतली असून 14 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 02 उमेदवार बिनविरोध आले आहे. पिंपळगाव खांड 26 अर्जांपैकी 11 व्यक्तींनी माघार घेतली असून 12 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 03 उमेदवार बिनविरोध आले आहे. मोग्रस 07 उमेदवार बिनविरोध आले आहे. पिंपळदरी 25 अर्जांपैकी 05 व्यक्तींनी माघार घेतली असून 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 04 उमेदवार बिनविरोध आले आहे. मनोहरपूर ग्रामपंचायतीत 7 उमेदवार बिनविरोध आले आहे. तांभोळ 15 अर्जांपैकी 01 व्यक्तींनी माघार घेतली असून 10 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 04 उमेदवार बिनविरोध आले आहे. कुंभेफळ 33 अर्जांपैकी 17 व्यक्तींनी माघार घेतली असून 13 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 03 उमेदवार बिनविरोध आले आहे.
मन्याळे 14 अर्जांपैकी 08 व्यक्तींनी माघार घेतली असून 02 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 04 उमेदवार बिनविरोध आले आहे. धामनगाव पाट 16 अर्जांपैकी 04 व्यक्तींनी माघार घेतली असून 08 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 04 उमेदवार बिनविरोध आले आहे. विरगाव 33 अर्जांपैकी 10 व्यक्तींनी माघार घेतली असून 22 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत तर 01 उमेदवार बिनविरोध आले आहे. येथे जालिंदर वाकचौरे आणि रावसाहेब वाकचौरे एकापा घडून आला असून रिपाई, राष्ट्रवादी यांच्यासह मित्रपक्ष यांच्या पॅनलमुळे मोठी चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. यात रावसाहेब हे व्यक्तीपरत्वे पिचड समर्थक आहेत तर जलिंदर हे पक्षपरत्वे पिचड समर्थक आहेत. त्यामुळे हे एकाच गटात आले असून येथे प्रस्तापित दोन्ही तलवारी एकाच मॅनात सामावल्याचे आश्चर्य असले तरी आता डॉ. लहामटे समर्थक आमनेसामने असणार आहेत. तर देवठाण 66 अर्जांपैकी 29 व्यक्तींनी माघार घेतली असून 37 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.