महिलांनो, सावधान.! चोरटे तुमच्या गळ्यावर टपलेत.! गर्दीतून मंगळसुत्र तोडलं.!

सार्वभौम (राजूर) :- 

                 अकोल तालुक्यातील राजूर ते कोहणे या बसमध्ये प्रवास करीत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र कोण्या अज्ञात व्यक्तीने कापून घेतल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 7 डिसेंबर रोजी घडली. यात ठकुबाई बुधा पोटकुले (वय 65, रा. वाघदरा, ता. अकोले) या महिलेने राजूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाला या घटनेत चोरी गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठकुबाई बुधा पोटकुले ही महिला काही कारणास्तव राजूर येथे आली होती. त्यांनी त्यांचे काम अटोपले व त्या घराकडे जाण्यासाठी राजुरच्या बस स्थानकावर येऊन थांबल्या. अर्थात वय 65 असल्यामुळे त्यांच्या वयोवृद्धपणाचा फायदा घेत कोण्या भुरट्या चोरट्याने त्यांचा माग केला. त्याला गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकण्यासाठी एक संधी हवी होती. त्यामुळे त्याने थेट गर्दीचा फायदा घेत जेव्हा बस लागली तेव्हापासून आजीच्या पाठीमागे राहून चोरीच्या हलचाली सुरू केल्या. आजी गाडीत चढत असताना त्याचा फायदा घेत म्हणा किंवा गाडीत चढल्यानंतर गर्दीतून आजीच्या गाळ्यात सोन्याचे मंगळसुत्र अलगद कापून घेतले. हा प्रकार आजीबाईंच्या लक्षात आला नाही. मात्र, कालांतराने त्यांनी गळ्याला हात लावला असता त्यांच्या लक्षात आले की, गळ्यात मंगळसुत्र नाही. त्यानंतर त्यांनी घरच्यांना घेत दुसर्‍या दिवशी थेट पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दाखल केली आहे. 

दरम्यान, महिला म्हटलं की त्यांनी अलंकारची नित्तांत गरज असते. काही महिलांच्या त्या मुलभूत गरजा असतात. अर्थात अलंकारी विभुषणे नक्की परिधान केले पाहिजे. मात्र, ते घातल्यानंतर त्यांची काळजी देखील तितक्याच आत्मियतेने केली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आता बसमध्ये चढताना, गर्दीत जाताना, बाजारात फिरताना, लग्नात मिरविताना आपल्या दागीन्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण, गेल्या महिन्यात विघ्नहर्ता लॉन्समधून हजारो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी गेले होते. त्यामुळे, प्रत्येक महिलेने या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, कारण, पै-पै करुन मोठ्या कष्टाने गळ्याची शोभा वाढवायची आणि केवळ शुल्लक बेजबाबदारपणामुळे लाखो व हजारो रुपयांना चंदन बसतो. हे कोठेतरी थांबले पाहिजे. आता लग्नसराई सुरू आहे प्रत्येकाने एक मेसेज म्हणून ही बातमी आपण वाचून व पुढे शेअर करा.

महिलांनी दागिने घातल्यानंतर त्याची काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी कोणी आपला पाटलाग तर करीत नाही ना? याची खात्री केली पाहिजे. जर लग्ना समारंभात दागिने घेतले तर ते पदराच्या आड कसे झाकले जातील याची दक्षता घेतली पाहिजे. जर दागिने काढून पर्समध्ये ठेवले तर पर्स जबाबदारीने संभाळली पाहिजे. कोणत्याही अविश्वासू व्यक्तीच्या ताब्यात न देता जबाबदार व्यक्तीकडे दिली पाहिजे. शक्यतो मोठ्या समारंभात व गर्दीच्या ठिकाणी दागिने घालुन जाणे टाळले पाहिजे. इतकेच काय! लग्न वैगरे असेल तर तेथे संशयित व्यक्ती किंवा अनोळखी लहान मुले नाहीत ना? याचा देखील शोध घेतला पाहिजे. कारण, लग्नात बहुतांशी चोर्‍या ह्या लहान मुलेच करत असल्याचे समोरे आले आहे. त्यामुळे, अशा काही सुचनांचे पालन केले तर संभाव्य धोके टाळण्यास मदत होईल. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. 

आकाश देशमुख

सुवर्ण संधी

महत्वाचे :-

अकोले व संगमनेर तालुक्यात लवकरच रोखठोक सार्वभौम हे दैनिक व रोखठोक सार्वभौम हे चैनल सुरू होत आहे. संगमनेर व अकोले तालुक्यात मानधनावर विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. तत्काळ संपर्क करावा. 8888782010, 8208533006