शक्ती कायद्यानंतरही संगमनेरात सेल्समन महिलेचे कपडे फाडले.! दोघांना ठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील एका कापड दुकानात सेल्समन असणार्या महिलेला अभंगमळा या परिसरात राहणार्या एका तरुणाने घरात ओढून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेच्या अंगावरील कपडे फाडत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलेे. हा प्रकार बुधवार दि. 9 नोव्हेंबर रोजी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर पीडित महिलाने पोलीस ठाण्यात जाऊन आपली कौफियत मांडली आहे. तर त्यांच्या फिर्यादीनुसार राहुल गुडवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिलेला आरोपी राहुल गुडवाल याने मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी संबंधित महिला गेली होती. मात्र, आरोपी गुडवाल याने त्यांच्याशी अपशब्दांचा वापर केला. त्यांच्यात बाचाबाची झाली असता गुडवाल याने पीडित महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जर माझ्या नादाला लागशील तर जीव घेईल असे म्हणत मारण्याची धमकी दिली.
या दरम्यान पीडित महिला या तरुणास समजून सांगत असताना त्याने तिच्याशी अंगलट केली. तसेच तिच्या अंगातील कपडे फाडत तू माझ्यासोबत घरात चल असे म्हणून ओढून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा व्यक्ती येथेच थांबला नाही तर पीडित महिलेच्या मुलास ठार मरण्याची धमकी त्याने दिली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरंतर आजच शक्ती कायद्याचा उगम झाला आहे. त्यात महिलांच्या बाजुने फार मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऐकीकडे मोठमोठ्या कायद्यांची निर्मित्ती होत आहे. तर दुसरीकडे या कायद्याबाबत जनजागृती होताना दिसत नाही. ज्या शिकल्या सवरलेल्या व्यक्ती आहेत, त्या मात्र अशा कलमांचा पुरेपुर वापर करताना दिसत आहेत. तर प्रशासन देखील अशा कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. परिणामी घेणारे फायदा घेतात तर अज्ञानी अन्याय सहन करतात. त्यामुळे, कायद्याची जागरुकता, त्याचा गैरवापर टाळणे आणि योग्य अंमलबजावणी झाली तरच हे कायदे महत्वाचे ठरतील अन्यथा प्रशासन देखील त्यावर कागदी घोडे नाचविताना दिसतील यात शंका नाही.!