अकोले संगमनेरात उरले फक्त 3810 अर्ज.! बाकी सगळे अपात्र.! पहा कोणत्या गावात किती अवैध.!

सार्वभौम (अकोले) :-  

                    अकोले तालुक्यात 52 तर संगमनेर तालुक्यात 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा राजकीय धुरळा पेटला आहे. संगमनेरात एकूण 2 हजार 678 तर अकोल्यात 1 हजार 147 अर्ज उमेदवारांनी आपले नशिब आजमविले होते. मात्र, दुर्दैवाने अकोले तालुक्यात 15 जणांचे अर्ज आज गुरूवार दि. 31 डिसेंबर  2020 रोजी अवैध ठरले आहेत. तर संगमनेरात 90 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. त्यामुळे, जे काही इच्छूक व उताविळ राजकारणी होतेे. त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता झाली नाही. त्यामुळे, दोन्ही तालुक्यात 105 जणांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. अशी माहिती निवडणुक अधिकारी तहसिलदार यांनी दिली आहे. तर संगमनेरात 2 हजार 678 व्यक्ती आता कागदोपत्री प्राप्त ठरल्या आहेत. तर अकोल्यात 1 हजार 132 अर्जदार निवडणुक लढविण्यास पात्र ठरले आहेत. तर दोन्ही तालुक्यात आता एकुण 3 हजार 810 उमेदवार निवडणुकीच्या रिगणात दिसण्याची शक्यता असली तरी ते अशक्य आहेे. कारण, जोरवर माघारीचा दिवस येत नाही. तोवर वेट अ‍ॅण्ड वॉच..!

गेल्या नऊ दिवसांपासून 52 ग्रामपंचायतींचे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. या दरम्यान 1 हजार 153 अर्ज दाखल झाले होते. त्यात आज 31 डिसेंबर रोजी अर्ज छाननी सुरू झाली होती. त्यात 15 जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. त्यात सुगाव खुर्द गावात 25 अर्ज, आंबड गावात 28 अर्ज, कळस बु येथे 32 अर्ज, लिंगदेव येथे 30 अर्ज, जांबळे ग्रामपंचायतीचे 12 अर्ज, उंचखडक बु येथे 26 अर्ज, ढोकरी गावातून 37 अर्ज, निळवंडे 07 अर्ज, कळस खुर्द 24 अर्ज, चैतन्यपूर 05, टाकळी 27 अर्ज, कळंब 13, धामनगाव आवारी 50 अर्ज, हिवरगाव 32 अर्ज, औरंगपूर 08, ब्राम्हणवाडा 34 अर्ज, बेलापूर 27 अर्ज, गणोरे 47 अर्ज, पांगरी 17 अर्ज, चितळवेढे 11 अर्ज, रूंभोडी 30 अर्ज, धुमाळवाडी 44 अर्ज, बहिरवाडी 08, 

वाघापूर 19 अर्ज, कोतुळ 60 अर्ज, उंचखडक खु 09 अर्ज, बदगी 14 अर्ज, इंदोरी 15 अर्ज, परखतपूर 16 अर्ज, मेहेंदुरी 37 अर्ज, भोळेवाडी 04 अर्ज, नवलेवाडी 18 अर्ज, पिंपळगाव निपाणी 20 अर्ज, बोरी 14 अर्ज, वाशेरे 23 अर्ज, शेरणखेल 07 अर्ज, घोडसरवाडी 01, नाचणठाव 11 अर्ज, निंब्रळ 18 अर्ज, जाचकवाडी 06 अर्ज, म्हाळदेवी 07, लहित बु 17 अर्ज, पिंपळगाव खांड 26 अर्ज, मोग्रस 07 अर्ज, पिंपळदरी 25 अर्ज, मनोहरपूर 7 अर्ज, तांभोळ 15 अर्ज, कुंभेफळ 33 अर्ज, मन्याळे 14 अर्ज, धामनगाव पाट 16 अर्ज, विरगाव 33 अर्ज, देवठाण 66 अर्ज असे एकुण 1 हजार 147 अर्ज बुधवार दि. 30 डिसेंबर 2020 अखेर दाखल झाले होते. त्यातील 1 हजार 132 पात्र ठरले असून 15 अर्ज अवैध ठरले आहेत.

काल जे काही अर्ज भरले गेले होते. त्यापैकी संगमनेरच्या 90 जणांचा आकडा हाती आला. तर अकोल्यात लिंगदेव येथून 33 अर्ज आले होते. त्यापैकी 3 अर्ज बाद झाले असून 30 अर्ज वैध ठरले आहेत. चैतन्यपुर येथून 6 अर्ज आले होते. या गावात ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चिन्हे होती. मात्र, आता एक अर्ज बाद ठरला असून 5 अर्ज वैध ठरले आहेत. एक अर्ज बाद झाल्याने येथे मोठी चिंता वाढली आहे. त्यानंतर टाकळी येथून 27 अर्ज दाखल झाले होते. या गावात एक व्यक्ती बिनविरोध झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता एक रद्द ठरला असून 27 अर्ज वैध ठरले आहेत. ब्राम्हणवाडा येथील 35 अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक बाद झाला असून 34 अर्ज वैध ठरले आहेत. तर बेलापूर येथून आलेल्या 28 पैकी एक अर्ज अपात्र ठरला असून 27 अर्ज पात्र ठरले आहेत. रुंभोडी गावाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तेथून 32 अर्ज आले होते. त्यातील दोन अर्ज बाद ठरले असून 30 अर्ज पात्र आहेत. तसेच पिंपळदरी येथील 26 पैकी एक बाद, तांभोळ येथील 16 पैकी एक बाद, मन्याळ येथील 15 पैकी एक बाद, धामनगाव पाट येथील 17 पैकी एक आणि देवठाण येथील 68 पैकी 2 अर्ज अपात्र ठरले असून 66 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे, आता 1 हजार 132 उमेदवार निवडणुकीस वैध ठरल्याची माहिती तहसिलदार यांनी दिली आहे.

- सागर शिंदे