नागरिकांच्या सतर्कतेमुळे जोर्वे रोडवर दरोड्याचा प्रयत्न फसला.! गावात दहशत.! साहेबांच्या गावात तरी गस्त घाला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहराच्या जवळच असणार्या निंबाळे ते जोर्वेरोड परिसरात दरोडेखोरांचा फार मोठा प्लॅन सजग नागरिकांनी उध्वस्त केल्याची मंगळवार दि.15 रोजी रात्री पहायला मिळाले. ज्या घरावर दरोडा टाकयचा होता तेथील दोघांना आरडाओरडा केला असता सात ते आठ दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. तर निबाळेच्यापुढे जोर्वे गाव हे खुद्द नामदार साहेबांचे आहे. तेथे जर असा काही अनुचित प्रकार झाला तर राज्यात एकच डोंब उठेल. त्यामुळे, दुर्घटनासे सावधानता भली याप्रमाणे येथे पोलिसांनी गस्त घालणे आवशक्य आहे अशी मागणी आता होऊ लागली आहे.
त्याचे झाले असे की, निंबाळे ते जोर्वे रोड येथील मेहेरमळा परिसरातील एक व्यक्ती त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेेले होते. रात्री घरी येत असताना त्यांनी घराजवळ आल्यानंतर पाहिले की, दोन चोरटे घराच्या किचनच्या खिडकीतून डोकावून पाहत होते. तर काही लोक घराभोवती पहारा देऊन कोणी येत तर नाही ना यावर लक्ष देऊन होते. यावेळी बाहेरगावाहून आलेले व्यक्ती यांनी या दरोडेखोरांना पाहिले आणि एकच किंकाळी मारली. धरा-धरा, धावा-धावा, पकडा-पकडा असा एकच कल्लोळ केल्यानंतर दारोडेखोरांची धुळीदान उडाली. त्यांनी जीवाच्या आकांताने दिशा मिळेल तिकडे पळ काढला. खरंतर या तरुणांनी केलेले काम फार धडशी आणि धैर्याचे म्हणावे लागेल.
चोरटे पळून गेल्यानंतर या दोघांनी घरातील सर्वांना सावध केले. त्यानंतर या परिसरात राहणार्या सर्व नागरिकांना जागे करून सावध होण्यास सांगितले. तर त्यानंतर गावच्या नागरिकांनी एकत्र येत दरोडेखोरांची शोध सुरू केला. काठ्या कुर्हाडी घेऊन गाव एक झाल्यानंतर हे चोरटे निंबाळेतून हद्दपार झाले. दुर्दैवाने एकही व्यक्ती हाती लागला नाही तर सुदैवाने कोणाला काही झाले नाही. मात्र, रात्रभर गावातील काही लोक अगदी जागते रहोचा नारा देत होते. दरोडेखोरांच्या या हल्ल्याने निंबाळे व जोर्वे परिसरात आता एकच दहशत माजली आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, हा प्रकार घडला असता तत्काळ शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली होती. मात्र, नेहमीप्रमाणे बराच वेळानंतर गाडी आली आणि पाच सहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. मात्र, नागरिकांनी त्यांनी विनंती केली आहे की, आता येणार्या काळात किमान निंबाळे व जोर्वे गावात गस्त घालावी.