अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, तर एक पळून नेली, पाच जणांवर गुन्हे! कोतुळ, सांगवी व सावरगावातील प्रकार.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन दिवसात सावरगाव पाट येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यात संगमनेरच्या दोघांसह पुण्यातील एकास आरोपी करण्यात आले आहे. तर सांंगवी येथे एक तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार रविंद्र पथवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर केळी कोतुळ येथे सोमनाथ एकनाथ शेंगाळ याने एका अल्पवयीन मुलीचे अपरहण केल्याची प्रकार पुढे आला आहे. तर परवा ही बालिका पोलीस ठाण्यात हजर झाली असता तिने वेगळेच कारण सांगत घर सोडल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही मुलगी पुन्हा फरार झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहेे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील सावरगाव पाट येथील एक तरुणी संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे गेली होती. तेथे तिची सचिन मच्छिंद्र दिघे याच्याशी ओळख झाली. कालांतराने त्यांच्या चर्चा आणि नंतर दिघे याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या बौद्धीक अपरिक्तवतेचा फायदा घेत त्याने तिला अनेक प्रलोभने दिली आणि तिच्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गुरूवार दि. 3 डिसेंबर रोजी सचिन दिघे व त्याचा मित्र प्रमोद काशिद (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांनी संगनमताने या अल्पवयीन मुलीस पुण्याला पळवून नेण्याचा प्लॉन केले. काशिद व अन्य एकाने या दोघांना पळवून लावण्यास मदत केली त्यामुळे या गुन्ह्यात तिघांना आरोपी करण्यात आले आहे. यात दिघे व काशिद यास अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. तर यात एकजण पसार आहे.
तर दुसर्या घटनेत अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथे एक अल्पवयीन मुलीस सोमनाथ एकनाथ शेंगाळ याने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मुलगी वयात नसल्यामुळे यात अपहरणाचा गुन्हा नोंदविला गेला. मात्र, जी मुलगी पसार होती. तिचा शोध घेतल्यानंतर तीने पोलीस ठाण्यात धक्कादायक माहिती दिली. ती अशी की, तिने पोलिसांना कथन केले त्यात म्हटले मी अल्पवयीन आहे तरी देखील माझ्या घरचे माझे लग्न करुन देण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे, मला कमी वयात लग्न करायचे नाही. त्यांच्या या निर्णयाला घाबरुन मी स्वत:हून घर सोडून गेले होते. या दरम्यानच्या काळात मला कोणीही पळवून नेलेले नव्हते. त्यामुळे, मुलीचे हे उत्तर एकल्यानंतर पालकांच्या देखील भुवया उंचविल्या. कारण, अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह करुन देण्याचा प्रयत्न करणे हा देखील फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे, झाकली मुठ सव्वा लाखाची. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र, दुर्दैवाने ही मुलगी पुन्हा घरातून गायब झाली आहे. त्यामुळे, तुर्तास तरी या गुन्ह्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविला गेला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तर तिसर्या गुन्ह्यात अकोले तालुक्यातील सांगवी येथे रविंद्र पथवे (रा. सांगवी) याने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. या मुलीस त्याने आपल्या घरी देखील नेले. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या घटनेत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोेंदविण्यात आला असता पीडित मुलीने दिलेल्या जबाबनुसार रविंद्र पथवे याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात 376 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्यास पोलीस कोठडी मागवून घेतली आहे. आजवर अकोले पोलीस ठाण्यात जे काही अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सर्व आरोपी अटक करण्यात आले आहेत. अशा गुन्ह्यांना पोलीस काहीच करु शकत नाही. मात्र, यासाठी सामाजिक संघटना आणि पालकांची व विद्यार्थ्यांची जागरुकता फार गरजेची आहे.
हे तर तोतया समाजसेवक.!
खरंतर अकोले तालुका हा पुरोगामी आणि टापा झोडणार्या महान व्यक्तींचा आहे. कारण, येथे अनेक महाशय स्वत:ला समाजसेवक म्हणून घेतात. बालकांवर मोठ्या प्रमाणावर आपण काम करतो आहोत असा अविर्भाव गाजवितात. इतकेच काय! कोणी बाल विवाहाच्या नावाखाली दलाली करताना दिसतात. जर हे खरोखर जनजागृती करतात तर तालुक्यात गेल्या सहा महिन्यात 50 पेक्षा जास्त गुन्हा बाललैंगिक अत्याचाराचे दाखल झाले आहेत. आजही तालुक्यात बालविवाह अगदी राजरोस सुरू आहेत. केवळ मोठमोठी भाषणे करायची आणि समाजवेच्या नावाखाली पोलिसांना व सामान्य नागरिकांना ब्लॅकमेल करायचे यांसारख्या दलालांना पाठीशी घालून त्यांना पाठबळ द्यायचे. या पलिकडे काही समाजसेवक नेमके काय काम करतात? हे त्यांनाच आता लोक विचारू लागले आहेत.
कायदेशीर बाब म्हणते की!
जर 18 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा/ मुलगी असेल तर ती स्वत:हून घर सोडून गेली, तिचे अपहरण झाले, ती लवकर मिळून आली नाही, तर कारण कोणतेही असो अशा वेळी कलम 363 (अपहरण) नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा वेळी जर एखाद्या मुलाने प्रेमसंबंधातून मुलगी पळवून नेली तरी देखील त्याच्यावर 363 नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र, जेव्हा हरवलेली व्यक्ती पुन्हा मिळून येते किंवा पोलीस ठाण्यात हजर होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या जबाबानुसार त्या गुन्ह्याची पुढील रूपरेषा ठरविली जाते. त्यामुळे, काही वेळा मुलगा व मुलगी पळून गेले तरी 363 नंतर या गुन्ह्यात जबाबनुसार कलम 376 (बलात्कार) हा गुन्हा वाढीव कलम लागला जातो. हे प्रमाण अकोले तालुक्यात जिल्ह्याच्या तालनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे, येथे विद्यार्थ्यांच्या जागरुकतेची नित्तांत गरज वाटू लागली आहे. तर लॉकडाऊन उघडल्यानंतर हे प्रमाण फार मोठ्या गतीने वाढल्याचे दिसते आहे.