राजूर पोलिसांची पुन्हा मोठी कामगिरी.! प्रवाशांचे सोने लुटणारी टोळी जेरबंद.! चौघांना ठोकल्या बेड्या.! नेकलेससह लाखोंचा मुद्देमाल ताब्यात

 

 - आकाश देशमुख

राजूर प्रतिनिधी : - 

        अकोले तालुक्यातील राजूर येथे बस स्टॅण्ड परिसरात सोने चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीस राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून हजारो  रुपयांचा नेकलेस हार हस्तगत केला आहे. यात साहिल नाशिक खान (रा. श्रीरामपूर) अर्जंन कानिफनाथ भोसले (रा. अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर), कमलेश उत्तम पवार (राहणार अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर), गुफरान निसार पठाण (राहणार सोमेश्वर पथ श्रीरामपूर) या चौघांना राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता यापुर्वीही त्यांनी राजूर परिसरात असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आता आरोपींना मुद्देमालासह राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पुढील तपास चालू आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे कौतुक केले आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी राजूर शहरातील कुसुम लक्ष्मण नाडेकर ( राहणार राजूर, ता. अकोले) यांचे राजुर बस स्टॅन्ड येथे राजुर ते कोहणे या बसमध्ये बसताना कोणीतरी अज्ञान इसमांनी कुसुम नाडेकर यांची पर्समधून 96 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस 16 ग्रॅम 960 मिली असलेला चोरला होता. त्याबाबत कुसुम नाडेकर यांना कळताच त्यांनी लगेच राजूर पोलीस स्टेशन येथे जाऊन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने तपास करत असताना पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा बाबत श्रीरामपूर येथील सराईत टोळी चा हात असू शकतो. अशी गोपनीय माहिती मिळताच पथकातील पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पो.हे.कॉ.आघाव,पो.कॉ.फटांगरे, पो.कॉ.गाढे,पो. कॉ.वाडेकर व अकोले पोलिस स्टेशनचे पो.कॉ.मैड या सर्वांनी मिळून अकोले बस स्टँड वर जाऊन मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमालाची रिकवरी केली आहे.

दरम्यान,राजूर येथे ओमनगर परिसरात अपना मोबाईल शॉपी आणि शेंडी व पांजरे येथे घरफोडी झाल्याची घटना घडली होती. यातील गुन्ह्यातील सराईत दोन गुन्हेगारांच्या सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्या आरोपींकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. विष्णु विठू सोडनगर (रा. घाटघर, ता. अकोले) व सोमनाथ शिवाजी भुतांबरे (रा. समशेरपूूर, चिंचेचीवाडी, ता. अकोले) अशी या दोघांची नावे होती. ही दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दि. २७ ऑक्टोबर २०२० रोजी राजूर शहरातील तोफीक आयुब तांबोळी (रा. ओमनगर) यांच्या अपना मोबाईल शॉपीत चोरी झाली होती. यातून ३० हजार ३३५३ रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यावेळी आयुब यांनी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी विष्णु विठू सोडनगर व सोमनाथ शिवाजी भुतांबरे या दोघांना घाटघर परिसरातून  ताब्यात घेतले होते. या दोघांकडून पोलिसांनी तीन एलईडी टिव्ही, 3 मोटार सायकली, 3 मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा राजूर पोलिसांनी उतुंग कामगिरी केली आहे.