शिक्षण संस्थेतून चोरी.! गुन्हा दाखल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.!
शिक्षक हा देशाचा कणा आहे. कारण, त्यांच्याकडे नागरिक घडविण्याची जबाबदारी असते. येथे मात्र, भलतेच काही पहायला मिळाले आहे. एका मुलानेच विद्यार्थ्यांच्या मुळ कागदपत्रांसह, जात प्रमाणपत्र व 7 हजार रुपये किंमतीचा कलर प्रिंटर, सातशे रुपये किंमतीचे एफोर साईजचे पेपर, कपाटाच्या चाव्या रबरी शिक्के, स्टेपलर चोरी केले. यावेळी त्यास रंगेहात पकडून देत पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना संगमनेर शहरातील प्रसिद्ध कॉलेज पेटिट बीएड येथे सोमवार दि. 7 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 ते 6 च्या दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या अगदी हकेच्या अंतरावर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या नऊ महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा व कॉलेज बंद आहे. याचाच फायदा घेत एक विद्यार्थ्यांने पेटीटी बीएड कॉलेजमध्ये प्रवेश केला. कॉलेजमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत आतमध्ये प्रवेश केला. तेथे कॉलेजचे प्रचार्यांच्या कार्यालयाचे कुलुप व कडीकोयंडा तोडत विद्यार्थ्यांनचे मुळ कागदपत्रांसह, जात प्रमाणपत्र व 7 हजार रुपये किंमतीचा इसपन कंपनीचा कलर प्रिंटर, सातशे रुपये किंमतीचे एफोर साईजचे पेपर, कपाटाच्या चाव्या रबरी शिक्के, स्टेपलर चोरी करून फरार झाला होता. मात्र, हा प्रकार उघड होताच पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
दरम्यान जेव्हा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले तेव्हा त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती तपासी अधिकारी बोटे यांनी दिली आहे. प्रकार कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित बाब पोलीस प्रशासनाला सांगितली आणि याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खरंतर गेल्या कित्तेक दिवसांपासून शहराच चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश मिळात नाही.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जोर्वेरोड येथे दरोडा टाखण्याचा प्रयत्न झाला. तेथून दरोडेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देत परागंदा झाले. मात्र, तेथील काही स्थानिक लोकांना चोर पकडले नाही याचे बिल्कुल दु:ख नाही, मात्र स्वत:चे संबंध जपण्यासाठी पोलिसांच्या अपयशावर पांधरुन घालत आंजारण्या गोंजण्याची टिमकी काही लोक वाजवताना दिसून आले. इतके काय! गेल्या सहा महिन्यात संगमनेरातून 30 पेक्षा जास्त गाड्यांची चोरी झाली आहे. कोणी रेकॉर्डवर आणले तर कोणी झाकली मुट सव्वा लाखाची म्हणून शांत बसले. रोज तालुक्यात चोर्या, मार्यांचे गुन्हे दाखल होत आहेत. तर लॉकडाऊन पासून संगमनेरमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एवढेच काय तर तहसील व पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळुचे पकडलेले ट्रॅक्टर चोरीला गेले आहे. त्यामुळे चोरट्यांना येथे कोणाचे भय दिसत नसल्याचे जनतेकडून बोले जात आहे.