काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविकेसह चौघांवर गुन्हे दाखल.! शिक्षण संस्थेसह अयुक्तांची फसवणुक.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                संगमनेर शहरातील काँग्रेस नगरसेविका यांच्यासह चौघांनी आलईन्स एज्युकेशन सोसायटीचे बनावट कागदपत्रे तयार करुन संस्थेची व धर्मादाय आयुक्तांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार दि.20 जुलै 2018 सालापुर्वी घडला आहे. तर काल सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी न्यायालयीन आदेश पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शबाना सईस बेपारी, शेख रईस अहमद, जावेद शेख लाल, महंमद जावेद हुसेन (रा. अल्कानगर कोल्हेवाडी, ता. संगमनेर) अशा चौघांवर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नजीर इस्माईल तांबोळी (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करीम इस्माईल तांबोळी हे माझे बंधू होते. ते मयत होण्यापुर्वी एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याने आलईन्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेच्या कायदेशीर बाबी पुर्ण करुन तिचे रजिस्टेशन केल्यानंतर त्या संस्थेचे अध्यक्षपद करीम तांबोळी यांच्याकडे होते. त्यांनी काही दिवसात ही संस्था नावारुपाला आणली. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे एक कार्यालय उभे केले. त्यानंतर संगमनेरात एका ठिकाणी जागा भाड्याने घेऊन त्यांनी पहिलीपासूनचे इंग्लिश स्कुल सुरु केले. येथे विद्यार्थी संख्या देखील चांगली झाली होती. 

त्यापुर्वी 2007 साली संस्थेच्या विश्वस्त मंडळात तीन जणांना राहण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांचे राजिनामे घेऊन ते मंजूर देखील केले होते. त्यानंतर पुन्हा विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी सन दि. 15 नोव्हेंबर 2014 साली धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, अपुर्‍या कागदोपत्रांमुळे ती मागणी नामंजुर झाली होती. मात्र, तृटी काढल्यानंतर पुन्हा नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी सन 2016 साली अर्ज दाखल केला असता त्याला 2017 मध्ये मंजुरी मिळाली आणि नव्या नियमानुसार नवे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. त्यात नजीर तांबोळी उपाध्यक्ष, सचिव वसिम तांबोळी सचिव, खान महंमद मुशरफ खैराती यांना विश्वस्त करण्यात आले होते. तर हंगामी अध्यक्ष म्हणून स्वत: करीम इस्माईल तांबोळी हे होते.

दरम्यान संस्थेचे अध्यक्ष करीम तांबोळी यांना कर्करोगाच्या अजाराने ग्रासल्यामुळे त्यांनी संस्थेचा चेंज रिपोर्ट दाखल करण्यास विलंब केला होता. मात्र, रिपोर्ट त्यांनी दि. 5 ऑक्टोबर 2019 साली नगर येथे सादर केला होता. कारण, सन 2007 ते 2019 पर्यंत मयत करीम तांबोळी हे स्वत: संस्थेचे अध्यक्ष होते. या दरम्यान दि. 9 ऑक्टोबर 2019 रोजी या संस्थेचे ज्या ठिकाणी खाते होते. तेथील बँकेंचे पत्र तांबोळी यांनी प्राप्त झाले. त्यात कोणीतरी खात्यावरील सह्या बदलविण्यासाठी अर्ज केला होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष करीम तांबोळी यांनी स्वत: बँकेत जाऊन चौकशी केली. हा प्रकार केला कोणी? हे त्यांच्या लक्षात आले नाही. तो अर्ज तपासला असता त्यावर संस्थेचे अध्यक्ष म्हणून आरोपी शेख रईस अहमद याचे नाव होते.

त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला की, यांनी बनावट कागदपत्रे, सही शिक्के तयार करुन विश्वस्तमंडळ तयार केले होते. त्यात ठराव घेणे, रिक्तपदे भरणे, मंजुरी देणे, बदल अर्ज करणे, सन साजरे करणे, बैठका घेणे नव्याने सदस्य घेणे, अशा बनावट प्रोसिडिंग तयार केले होते. अशी काही अवैध कामे केली गेली. या दरम्यान संस्थेत काही लोकांची नियुक्ती करुन त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सचिव, अध्यक्ष अशी पदे नेमण्यास धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. तर जे कोणी सचिव नाहीतर त्यांच्या संगनमताने बनावट दस्तावेज तयार करून तो धर्मदाय आयुक्तांकडे दाखल केला आणि  संबंधित पदे फसवणूक करून मंजूर करून घेतली. 

दरम्यान या गोष्टीचा पाठपुरावा केला असता असे निष्पन्न झाले की, आरोपी हे आलईन्स एज्युकेशन सोसायटीचे कधीही सभासद नसताना देखील त्यांनी बनावट व खोटे कागदपत्र तयार करून धर्मदाय आयुक्त यांची दिशाभूल करीत फसवणूक केली आहे. त्यामुळे, नजीर तांबोळी यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. त्याची सखोल चौकाशीचे आदेश देण्यात आला होते. त्यानंतर काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शबाना रईस बेपारी, शेख रईस अहमद, जावेद शेख लाल, महंमद जावेद हुसेन (रा. अल्कानगर कोल्हेवाडी, ता. संगमनेर) अशा चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.