डॉ. किरण लहामटे व वैभव पिचड यांच्यात आता दुसरे महायुद्ध.! शंख फुकले, तोफा सुरू.!
सार्वभौम (अकोले) :-
सन 2019 मध्ये अकोले विधानसभेच्या बालेकिल्ल्याची चावी राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. गेल्या 40 वर्षाची सत्ता राखण्यात पिचड अयपशी ठरले तरी, त्यांनी प्रचंड ताकतीने झुंज देण्याची परंपरा कायम राखली. खरंतर 1977 नंतरचा हा पहिला पराभव होता. तो केवळ पक्षबदल हा त्याच्या पत्थ्यावर पडला आणि मा. शरद पवार यांच्या विश्वासातील डॉ. किरण लहामटे यांनी बोलबोल करता पिचड कुटुंबाशी पहिले युद्ध पुकारले आणि 56 हजारांची आघाडी घेत अकोल्याच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. मात्र, वर्ष उजाडते कोठे नाहीतर पुन्हा डॉ. किरण लहामटे व वैभव पिचड यांच्यात ग्रामपंचायतींचे दुसरे राजकीय महायुद्ध पेटले आहे. कारण, पुढील महिन्यात 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी आणि भाजप यांनी आपल्या सैन्यांना राजकीय धडे गिरविण्याची कार्यशाळा सुरू केली आहे. त्यामुळे, या गावगाड्याच्या लढाईत नेमका कोणाचा झेंडा फडकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. किरण लहामटे यांना आमदार करण्यात अनेकांच्या अथक प्रयत्नांचे ते फलित आहे. जेव्हा त्यांचा विजय झाला तेव्हा प्रत्येकाने तो स्वत:मुळेच झाला अशी रि ओढायला सुरूवात केली. त्यामुळे नकळत त्यांच्याकडून प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत गेल्या. आता एक माणूस आणि तो प्रत्येकाला खूश ठेवणार तरी कसा? कोणाचे फोन न घेणे शक्य झाले नाही. कोणाला भेट देणे शक्य झाले नाही, कोणाचा चहा घेणे शक्य झाले नाही, कोणाचा कार्यक्रम अटेंड करणे शक्य झाले नाही तर कोणाला मनासारखा सन्मान मिळाला नाही. त्यात सर्वात महात्वाचे म्हणजे डॉक्टरांचा स्वभाव प्रचंड स्वयंभू त्यामुळे गणितात योग्य सुत्र जळले नाही आणि त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना बदमान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अर्थात त्यांचा पीए अनिकेत थोरात यांना अजेंड्यावर घेण्याची सुपारीच काही व्यक्तींनी दिली होती. मात्र, झाले काय? सारांश शुन्य.! अर्थात कोणाचे ऑपरेशन करायचे हे डॉक्टरांना कोणी सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीच्याच काही व्यक्तींना जो काही कावा रचला होता. तो अक्षरश: हानून पडला. कारण, इतकेच होते. की, पीए राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्यांना अपेक्षित असे टेेंडर देत नाही.!
आता हा सर्व उहापोह मांडायचे कारण असे की, घरचा भेदी लंका दहन! असा प्रकार पक्षात पहायला मिळत आहे. याचे मुळ काय? तर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ज्या नाही पदाधिकार्यांच्या नेमणुका झाल्या. त्या बहुतांशी सामाजमान्य नव्हत्या. कोणी अजित दादांकडून सेटींग लावली तर कोणी सुप्रिया ताईंकडून, कोणी तात्यांकडून तर कोणी संदिप वर्पे यांच्याकडून! त्यामुळे, ज्या पवार साहेबांनी उमेदवार देताना कोणाची सेटींग न पाहता सामाजिक मिरीट पाहिले. त्याच पवार साहेबांच्या नेत्यांनी तोंड पाहुन कामे केली. म्हणूनतर राष्ट्रवादीचे येथे एक दोन नव्हे तब्बल पाच सहा गट पडले. यांची खरोखर आत्मचिंतन करुन छातीवर हात ठेवावा. यांच्यामागे गावातील किती लोक आहेत? यांचे पद सोडून समाजात किती लोक यांचा शब्द पाळतात, त्यांना जी पदे दिली आहेत, त्याला कोणी न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. एक रवी मालुंजकर हा नवखा तरुण वगळला अपवाद वगळता सगळ्या गोचिड म्हटलं तर काय वावघे ठरेल? असा प्रश्न राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते उपस्थित करु लागले आहेत.
खरंतर वैभव पिचड यांच्यासाठी आजकाल फार पुरक वातावरण निर्माण होत चालले आहे. सन 2019 साली लोक म्हणायचे भाजपचे विचार येथे रुजणार नाही. कमळ येथे फुलणार नाही, हा पक्ष येथे उभारी घेणार नाही. मात्र, तेव्हा जरी भाजप म्हणून लोकांनी नकारात्मक माना डोलावल्या असतील, आता मात्र एक पर्यांय आणि व्यक्तीशा राजकारण म्हणून लोक पिचड यांच्याकडे पाहु लागले आहे. अर्थातच पिचड यांना तेव्हा त्यांच्या सभोवताली असणारा प्रस्तापिंचा गोतावळा कारणीभूत ठरला होता. उद्या याच इतिहासाची पुनरावृत्ती डॉ. किरण लहामटे यांच्याबाबत पहायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही. कारण, त्याचे पडसाद आता गावोगावी उमटू लागले आहेत. खरंतर त्यावेळी, जनप्रक्षोभाच्या लाटेत राष्ट्रवादीला यश मिळाले खरे. मात्र, ते टिकवून ठेवताना आता मोठी कसरत करावी लागत आहे. कारण, उताविळ कार्यकर्त्यांमध्ये सगळा सावळा गोंधळ दिसत असून तालुुक्यात पांढरे कपडे घालुन मिरविण्याचे प्रमाण वाढताना दिसते, मात्र, सामाजउपयोगी काम होती घेताना कोणी दिसत नाही.
इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येते की, कोणत्याही गोष्टी या अपोआप किंवा अचानक होत नाहीत. त्याचा धागा-धागा गुंफून गुंता तयार होत असतो. आता खर्या अर्थाने राष्ट्रवादीत गुंतागुंत आणि नाराजी वाढू लागली आहे. म्हणजे जितका काळ पिचड कुटुंबाला पाडण्यासाठी लोक धडपडत होते. प्रयत्न करत होते. तितकी ताकद राष्ट्रवादीतील नेते त्यांच्यात नेत्यांना नेस्तनाबुत करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी वापरताना दिसत आहेत. त्यामुळे, येथे पक्ष बळकटीला सुरूंग लागला असून एकमेकांचे उनेधुने करण्यात पक्षातील नाही नेत्यांचा वेळ खर्ची होताना दिसत आहे. खरंतर तालुक्यात एक उपजिल्हाध्यक्ष आहे, एक युवक उपाध्यक्ष यांच्यासह अनेक बडेबडे पदे आहेत. पुरोगामी चळवळीचे नेते सोबत आहेत. ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्यासारखे बलशाली नेते आहेत. येथे कसे बजबुत वातावरण असायला हवे होते. मात्र, याची आडव त्याची जिवर यातच संघटनाचे भोंडबारे झाल्याचे पहायला मिळत आहे. अर्थात हेच वातावरण वैभव पिचड यांना अगदी बळ देऊन जाईल. कारण, आता त्यांनी देखील बदलत्या राजकीय परिघावर फिरताना आपल्या काही भुमिका बदलून घेतल्या आहेत. कारण, पुर्वी जो काही त्यांच्या सभोवताली गोतावळा जवळ होता त्यांना जरा विश्रांती देऊन नव्या दमाचे नवे सैन्य उभे केले आहे. त्यामुळे, या पुरोगामी तालुक्यात जर कमळ फुलले तर कोणी आश्यर्य वाटू देऊ नाका. याचे खापर नेमके कोणाच्या डोक्यावर फोडायचे हे तेव्हा वेळच निच्छित करेल.
आता वास्तव पाहता पिचड आणि डॉ. लहामटे यांच्यात ग्रामपंचायतीच्या रुपाने हे दुसरे राजकीय महायुद्ध पेटले आहे. मात्र, जर राजकीय दृष्ट्या पाहिले तर डॉ. किरण लहामटे यांना गावागावातून लोकांनी मतदान केले आहे. भलेही ती ग्रामपंचायत पिचड यांच्या ताब्यात असूद्या, मात्र तरी देखील त्यांनी मतदान घड्याळाला केले आहे. आता मात्र, त्यांची गोची झाली आहे. गावातील प्रस्तापित लोक हे भाजप (पिचड) यांच्याशी निगडीत आहे. त्यामुळे, बांधाचा, पाण्याचा, मजुरीचा, रस्त्यांचा, शेत जमिनी आणि भाऊबंदकीचा वाद आता चव्हाट्यावर येणार आहे. त्यामुळे, आमदारांना संभाळण्यापेक्षा गावातील नेत्याला संभाळलेले कधीही सोपस्कर ठरणार आहे. आज तालुक्यात 142 ग्रामपंचायती तर 191 गावे आहेत. त्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यात धामनगाव, रुंभोडी व म्हाळदेवी अशा काही ग्रामपंचायती वैभव पिचड यांच्या ताब्यात नाहीत. तर अन्यत्र आज तांत्रींक दृष्ट्या भाजप सरस आहे. ही लढाई आता कुरुक्षेत्रासाखी गुंतागुंतीची झाली आहे. राष्ट्रवादीत सध्या अनेकजन शकुनीमामाची भुमिका पार पडत आहेत. त्यामुळे, हे युद्ध जिंकायचे असेल तर पुन्हा अशोक भांगरे, विनय सावंत यांच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. अन्यथा या युद्धाचा निकाल सर्व काही सांगून जाईत. तोवर....
भाग 1 क्रमश: