आरे देवा.! संगमनेर पोलीस ठाण्याचे देशमुख लाचलुचपतच्या जाळ्यात.! प्रतिमहिन्याला छापा.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अगदी मागच्या महिन्यात पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी याच्यावर नाशिक लाचलुचपतने छापा टाकला होता. आत या महिन्यात पुन्हा याच पोलीस ठाण्यात पोलीस नाईक बापुसाहेब देशमुख याच्यावर नाशिकच्या पथकाने छापा टाकला आहे. एका मिसिंगच्या प्रकरणात एक हजार रुपयांची लाच घेताना या पोलीस कर्मचार्‍यास रंगेहात पकडल्याचा धक्कादायक प्रकार आज शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ट्रॅप घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील घोडेकर माळा परिसरात राहणारी एक महिला गेल्या काही दिवसांपासून मिसिंग होती. ती शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी मिळून आली होती. त्यानंतर ही मिसिंग दाखल असल्यामुळे नातेवाईक संबंधित महिलेस घेऊन आज 12 डिसेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आले होते. हा तपास पोलीस नाईक देशमुख यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी काही कागदपत्रे पुर्ण करण्यासाठी आणि ही मिसिंग निकाली काढण्यासाठी (जबाब नोंदविण्यास) एक हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर हा प्रकार महिलेच्या नातेवाईकांनी पुर्वीच नाशिकच्या लाचलुचपत पथकाला सांगितली होती. त्यानंतर पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या पथकाने सापळा रचून लाच मागणार्‍या देशमुख यास ताब्यात घेतले. तर याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान जेव्हा पीएसआय राणा परदेशी याच्यावर लाचलुचपत पथकाने छापा टाकला होता. तेव्हा संगमनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी अभय परमार हे औरंगाबाद येथे न्यायालयीन कामासाठी गेेले होते. त्यांच्या पश्चात राणा याने 2 लाखांची मागणी केली होती. त्यातील एक लाख रुपये स्विकारताना त्यास अटक केली होती. आता देखील संगमनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकुंद देशमुख हे नगर येथे पोलीस अधिक्षकांनी बोलविलेल्या क्राइम मिटींगसाठी गेले असता त्यांच्या पश्चात पोलीस नाईक याने हा उद्योग केला आहे. त्यामुळे पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस ठाणे सोडावे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 तर दुसरीकडे यापुर्वी असे  होते की, जर एखाद्या पोलीस अधिकार्‍यांच्या काळात पोलीस ठाण्यात ट्रॅप झाला तर त्यांना थेट नियंत्रण कक्षेत जमा केले जायचे. आता पोलीस अधिक्षक मनोज पाटील हे असा फंडा वापरतील अशी शक्यता फार कमी आहे. कारण, पोलीस ठाण्यातील बहुतांशी नेमणुका ह्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारून केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, वाद आणि डोकेदुखी वाढवून घेण्याच्या नादात ते पडतील अशी शक्यता फार कमी आहे. एकीकडे पोलीस कर्मचार्‍यांना फार कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार्‍या देशमुख यांच्या काळात अगदी महिना उलटण्याच्या आत एका देशमुख कर्मचार्‍यावर लाचलुचपतचा छापा पडणे ही फार शोकांतीकेची गोष्ट आहे. आता यापुढे येथे आणखी बरेच काही पहायला मिळणार आहे. फक्त वेट अ‍ॅण्ड वॉच..!