चोरीच्या संशयाने एका तरुणास 25 जणांकडून बेदम मारहाण.! अन तो कामगार निघाला.!

  सार्वभौम (संगमनेर) :-     संशयित चोर असल्याचे समजून एका परप्रांतीय तरुणास संगमनेर शहराच्या जवळच गुंजाळमळा परिसरात 25 ते 30 जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्दैवाने तो तरुण वाचला खरा! मात्र, त्या निरक्षर व्यक्तीला साक्षर व्यक्तींनी अगदी बेधुंद होऊन मारहाण केल्याचे पहायला मिळाले. मी चोर नाही! मला मारु नका अशी हात जोडून विनंती करुन देखील त्याच्या तोंडातून रक्त येईपर्यंत काही व्यक्तांनी माहरण केली. इतकेच काय! त्याच्या अंगावरील सर्व कपडे फाडून टाकल्याची दुर्देवी घटना पहावयास मिळाली. यावेळी, त्या तरुणाच्या संगण्यानुसार त्याच्या मालकाची माहिती विचारुन चौकशी केली असता ती योग्य निघाली. नंतर येथे मालक आला व काही वेळानंतर संबंधित घटना शहर पोलीस ठाण्यात कळविली असता पोलीस गाडी देखील उपस्थित झाली. त्या तरुणाचे नशिब बलोत्तर अन्यथा काल बोलबोल करता काही बेजबादार व्यक्तींनी निष्पाप बालकाचा जीव घेतला असता.

खरंतर, गेल्या सहा महिन्यांपुर्वी पालघर जिल्ह्यात केवळ संशयित व्यक्ती म्हणून तीन साधुंना जमावाने मारहाण करीत ठार मारले होते. त्यात 45 जणांना आरोपी करण्यात आले होते. इतक्या दिवसानंतर त्या अटक व्यक्तींना गेल्या आठवड्यात जामीन झाला आहे. ही घटना केवळ शुल्लक संशयाने घडली होती. मात्र, उपस्थित नतद्रष्ट लोकांनी आणि तेथील तरुणांनी स्वत:चा पुरूषार्थ व्यर्थ ठिकाणी दवडून निष्पाप तीन साधुंचा बळी घेतला होता. हे देखील प्रकरण असेच काहीसे झाले होते. मद्यधुंद अवस्थेतला एक परप्रांतीय तरुण दिशा भर्कटला होता. अवघ्या 19 वर्षातला व्यसनाधिक बालक आणि तो देखील अगदी मासूम चेहर्‍याचा. भलेही तो कृष्णवर्णीय, मद्यपी आणि नवखा होता. तरी तो प्रचंड घाबरलेला असल्यामुळे त्याला कोणीतरी चोर म्हटले आणि जिवाच्या आकांताने तो धावत सुटला. मग काय! त्याच्यामागे एकापाठोपाठ शिकली सवरलेली लोक धावू लागली.

अर्थात खरं पाहिले तर त्याची बौद्धीक पातळी देखील इतकी नव्हती की तो स्वत:ला चोर नाही असे सिद्ध करु शकेल. इतकेच काय! मद्य पिल्यामुळे त्याला स्वत:ची सुद नव्हती. तरी देखील तो अंधारात वाट दिसेल तिकडे पळत राहीला. अखेर त्याला संगमनेर पंचायत समितीच्या मागील बाजुने पडकण्यात आले. तेथे ज्याला वाटेल त्याने आपले होत धुवून घेतले. तो कोण आहे? कोठून आला आहे? तो कोणाकडे कामाला आहे? याची उत्सुकता कोणाला पडली नाही. मात्र, त्याच्याकडे चाकू-सुर्‍या आहेत असे म्हणून त्याला चोर-दरोडेखोर घोषित करण्यासाठी अनेकांनी आटापिटा केला. त्यामुळे, त्या बालकाची येथेच्च धुलाई झाली. त्याची बाजू एकूण घेण्यापुर्वीच त्याच्या अंगावरील कपडे अनेकांनी फाडले होते. त्यामुळे, त्याने वारंवार हात जोडून देखील त्याची खातरदारी करण्यास कोणी तयार नव्हते.

दरम्यान, तेथे जे काही समजदार लोक होते. त्यांनी त्याच्यावर दया करत त्याला विचारणा केली. तेव्हा समजले की, तो समनापूर परिसरातील एक हॉटेलवर आणि  ब्लॅक तयार करतात त्यांच्याकडे काम करतो आहे. याची खात्री होईपर्यंत जो येतो तो त्याच्यावर हात उचलून जात होता. काही तरुणांनी तर अगदी या तरुणास अमानुष मारहाण केली. मात्र, मॉब सायकॉलॉजीच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही. या दरम्यान शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी फोन झाल्यानंतर त्यांनी काही वेळात पोलीस गाडी पाठवून दिली. किमान पोलीस येत आहेत या भितीने का होईना त्यास कमी मारहाण झाली. तर दुसरीकडे या तरुणाचा मालक देखील घटनास्थळी येत होता.

काही वेळातच या तरुणास ओळखणारा व्यक्ती तेथे आल्यानंतर त्याने आपली ओळख सांगितली. हा तरुण 6 महिन्यापुर्वीच येथे आला आहे. तो रात्रीचा वाट चुकला असेल. त्याला इकडे काहीच माहित नाही. त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असे म्हणत त्याने या तरुणास ताब्यात घेतले. या दरम्यान पोलीस गाडी तेथे दाखल झाली. त्यांनी या तरुणाची चौकशी केली. खात्री केल्यानंतर घटनास्थाची व प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब घेऊन त्यास मालकाच्या ताब्यात दिले. यावेळी पोलिसांना व त्याच्या मालकास पाहुन त्या तरुणाने एकच टाहो फोडला. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. एक मात्र खरे, त्या बिचार्‍याचे दैव बलोत्तर होते. म्हणून इतका मार खावून देखील तो सुखरूप निघुन गेला.

आता यात एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की, एखाद्या व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर तो जिवाच्या आकांताने धावण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे, जर कोणी संशयित कोणी ताब्यात घेतले तर त्याची सखोल चौकशी करा. फार शंका वाटली तर पोलिसांना माहिती द्या. टारगेट टपोरी मुलांना हात उचलण्याची संधी मिळेल असे कोणतेही वर्तन करु नका. कारण, प्रत्येक संशयित हा चोरच असतो असे नाही. रागाच्या भरात एक फटका जिव्हारी लागला तरी एखाद्याचा अगदी सहज जीव जाऊ शकतो. त्यामुळे, पालघर प्रकरणाची आपल्या तालुक्यात पुनरावृत्ती व्हायला नको आणि हकनाक एखाद्या निरापराध व्यक्तीचा जीव जायला नको हीच प्रांजळ ईछा.!