दिल, दोस्ती, दुनियादारी व राजकारणातील विद्यार्थीनेतृत्व गौरव डोंगरे पाटील.! कर्तबगारीच्या गौरवाला सलाम!
सार्वभौम (विशेष) :-
स्वामी विवेकानंद म्हणत असे, मला सिंहाच्या निधड्या छातीचे शंभर तरुण द्या, मी सबंध भारत देश घडवून दाखवितो. अर्थातच देशातील तरुणांमध्ये किती शक्ती आहे. हे त्यांनी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. आज आम्हाला देखील त्या वाक्याची फार प्रकर्षाने आठवण होते आहे. कारण, त्या शंभरपैकी एक म्हणजे आमचा निधड्या छातीचा तरुण मित्र म्हणजे गौरव डोंगरे हा दिल, दोस्ती, दुनियादारी व राजकारणातील दिलदार मित्र आहे.
एनएसयुआयचा विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष असलेला गौरव हा नामदार बाळासाहेब थोरात (महसुलमंत्री) व युवा नेते सत्यजीत तांबे (युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष) यांच्याकडून प्रेरणा घेऊन एनएसयूआय विद्यार्थी संघटनेत नऊ-दहा वर्षांपासून काम करतोय. बदलत्या काळाची पावले ओळखत एनएसयूआयचा पाया महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अधिक घट्ट रोवावा लागेल यासाठी नेहमीच अथक प्रयत्न करणे ही गौरवच्या कामाची खासियत आहे. म्हणूनच गौरवने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले. रक्तदान शिबिरं, करियर मेळावे, एस.टी.पास करिता आंदोलन, मुलींच्या सुरक्षेसाठी राबविलेले अभियान, फी संदर्भातील समस्या, विद्यार्थी संवाद अभियान वगैरे. या सार्यातून हळूहळू संघटन उभे राहू लागले. त्यातील दांडीया रास, विद्यार्थी संवाद अभियान, राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा तर उत्कृष्ट नियोजनाने सर्व वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठरली. गौरवचे वैशिष्ट असे आहे की त्याने उचललेले प्रत्येक पाऊल किंवा त्याची प्रत्येक अॅक्टिविटी ही संघटनेसाठी आणि स्वाभाविकच त्याचे नेते सत्यजित तांबे व ना. बाळासाहेब थोरात यांच्यासाठी समर्पित असते.
गौरवचे व्यवस्थापन, त्याचे संघटन कौशल्य प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्याची क्षमता आणि कामातले सातत्य हे संघटनेसाठी नेहमीच फायदेशीर ठरली आहे. त्यामुळेच युवकांचे संघटन करुन काँग्रेस पक्षाच्या ध्येपूर्तीसाठी ते कार्यरत ठेवायचे हे गौरवने सहजतेने केले आहे. 2014 पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत गौरवचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नगरपालिकेच्या विविध वार्डमधील युवकांचे एकत्रीकरण करणे, पंचायत समिती गणांमध्ये तरुणांना प्रचारात आणणे, वेगवेगळ्या युवक मित्र मंडळाच्या आणि उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क करून त्यांना वरिष्ठांशी जोडणे अशी संघटनात्मक बांधणीची कामे गौरवच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहेत.
त्याचे हे काम, पक्ष, संघटना आणि नेत्यांप्रती असलेली निष्ठा पाहून 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या मुख्य प्रचार दौर्यात थोरात साहेबांनी समाविष्ट करून घेतले. तर, एनएसयुआय शहर उपाध्यक्ष पदावरुन तालुकाध्यक्षपदाची बढती ही गौरवलाच मिळाली. गौरवचे काम खरोखर वाखान्याजोगे आहे. जास्तीचे काही बोलण्यापेक्षा काम करुन दाखवणे हाच त्याचा स्थायिभाव स्वभाव आहे. राजकारणात चमकोगिरी न करता मेहनत करुन संयम ठेवल्यास आपल्याला कोणीही रोखु शकत नाही असे त्याचे नेहमी म्हणणे असते.
नवयुवकांना भावणार्या सोशल मीडियाचा वापर गौरव अत्यंत प्रभावीपणे करतो. तो नेमही व्हॉट्सप, ट्विटर, फेसबुकद्वारे अनेक युवकांशी जोडलेला असतो. प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करतानाच विद्यार्थी युवकांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहुनही स्वतःची, संघटनेची आणि नेत्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत असतो.
तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयात गौरवने मोठ्या प्रमाणात संघटन उभे केले आहे. गावात फ्लेक्सद्वारे पक्ष, संघटनांचे निर्णायक मुद्दे जनतेसमोर ठेवणे गौरवला सहज जमते. ज्यावेळी लोकांना प्रत्यक्ष मदतीची गरज असेल त्यावेळी मोठेपणाची व नेतेपणाची झुल उतरवून गौरव जमिनीवर पाय रोवून कामाला लागतो. वेगवेगळी आंदोलने, निवेदनांच्या माध्यमातुन लोकांचे प्रश्न सोडवतो. कोरोनात लॉकडाऊनच्या काळात गरजूंना पुरवलेली भोजन सेवा, प्रशासनाला केलेले सहकार्य, रात्रंदिवस लोकांसाठी केलेली मेहनत गौरवला शाबासकी मिळवुन देणारी ठरली आहे. इतकेच काय! ती इतरांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी कामगिरी म्हणून रेखाटली गेली आहे. राजकीय सामाजिक कामाबरोबरच धार्मिक कामातही गौरव नेहमी सक्रीय असतो.
पठारभागातील दत्त देवस्थान व खंडोबा देवस्थानच्या कार्यात गौरव नेहमी सक्रीय असतो. व्यवसायाने सिव्हील इंजिनिअर व गव्हर्मेंट काँट्रॅक्टर असुनही व व्यवसायात राजकीय शक्ती वापरणे शक्य असुनही गौरवने मात्र राजकारण व व्यवसाय या दोन्ही गोष्टी अगदी विभिन्न ठेवत समतोल राखला आहे. राजकारणासाठी आवश्यक असलेली दृष्टी, नविन पद्धतीने विचार करण्याची क्षमता, स्थितप्रज्ञता, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि ना. बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याशी संपूर्ण निष्ठा या गुणांमुळे गौरवची पुढील कारकीर्द यशाची शिखरे सर करणारी आहे, नव्हे-नव्हे समाजासाठी अत्यंत उपयोगी ठरणारी असेल. त्यामुळे, आमचा मित्र परिवाराचा गोतावळा नेहमी त्याच्या सोबत असेल. गौरवला उदंड आयुष्य लाभो, त्याची उत्तरोत्तर प्रगती होवो.! तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!