तरुणीची छेडछाड, गजाने मारहाण व घरावर दगडफेक, दोघे जखमी, सात जणांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
किरकोळ कारणास्तव दोन गटात वादंग झाले असता सात जणांनी मिळून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. इतकेच काय! घरावर दगड फेकून एका तरुणीशी अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरात जेधे कॉलनी येथे 2 डिसेंबर 2020 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात आकाश बाळु जेधे, दाऊद उर्फ दिनेश बाळु जेधे, संदिप बाळु जेधे, काळ्या पारचे, सोमा घोडेकर, मयुर चांगरे, बाळु सुवजी जेधे (सर्व. रा. जेधे कॉलनी, ता. संगमनेर) यांच्यावर शहरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेधे कॉलनी परिसरात एक व्यक्ती घरात झोपला असताना आरोपी यांनी त्यांच्या घराच्या बाहेर येऊन आरडाओरड केली. त्यावेळी घरात असणार्या व्यक्तीने बाहेर येत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीं यांनी काही एक न एकता तुम्ही जास्त माजले आहेत का? आम्ही सांगितल्याप्रमाणे का वागत नाही, आता तुमच्याकडे बघतोच असे म्हणत लोखंडी गज व लाकडी दांड्याने मारहाण केली, यात दोघे जखमी झाले आहेत. तर हे भांडन सुरू असताना आरोपी यांनी एका तरुणीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.
दरम्यान यातील काही आरोपी यांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करुन घराचे नुकसान केले तर शिवीगाळ दमदाटी करीत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आकाश बाळु जेधे, दाऊद उर्फ दिनेश बाळु जेधे, संदिप बाळु जेधे, काळ्या पारचे, सोमा घोडेकर, मयुर चांगरे, बाळु सुवजी जेधे (सर्व. रा. जेधे कॉलनी, ता. संगमनेर) यांच्यावर शहरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.