बाबो.! नोकरी लावून देण्यासाठी हेडक्लार्क दलालाने घेतले 57 लाख 94 हजार.! रयत शिक्षण संस्थेचे लोभी गुरूजी.!

सार्वभौम ( राहाता) :- 

                        रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी तरी महसूल खात्यात तलाठ्याची नोकरी लावून देतो असे म्हणत हेडक्लार्क, दलाल व त्याची पत्नीअशा तिघांनी एक ना दोन तब्बल 57 लाख 94 हजार 700 रुपये घेऊन आठ जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथे दि. 31 जानेवारी 2014 ते दि. 31 आक्टोंबर 2020 या दरम्यान घडली. याप्रकरणी धिरज प्रतापराव पाटील यांनी राहाता पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात दिनेश गोंविंद सोनवणे, त्यांची पत्नी बिना दिनेश सोनवणे (दोघे रा. साकुरी, ता. सुधर्मा अपार्टमेंट, राहाता, जि. अ.नगर) व हेडक्लार्क भाऊसाहेब पांडुरंग पटेकर (रा. विद्यानगर, लोणी, ता, राहाता) अशा तिघांना आरोपी करण्यात आले आहे. या घटनेमुळे रयत शिक्षण संस्थेच कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर शिक्षण विभागात अशा पद्धतीने डि.एड, बी.एड, एमएड असणार्‍या शिक्षकांचा छळ करून शिक्षण व्यवस्थेचा कचरा केल्याचे दिसू लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धिरज पाटील हे गणेश सहकारी साखर कारखाना येथे क्लर्क म्हणून काम करतात तर त्यांची अर्धांगिनी बीएड होऊन देखील पार्लर चालविते. दोघांचा संसार चांगला सुरू असताना आरोपी दिनेश याची पत्नी धिरज यांची पत्नी विद्या यांच्याकडे पार्लरसाठी आली होती. दोघींच्या गोलगप्पा सुरू असताना आरोपी बिनी ही विद्या यांना म्हणाली की, बी.एड सारखे शिक्षण झालेले असताना हे काम करण्यापेक्षा शिक्षक म्हणून काम का करत नाही? तेव्हा विद्या यांनी डि.एड, बी.एड, एम.एड असणार्‍या शिक्षकांचे हाल तिच्यापुढे कथन केले. त्यानंतर बिना म्हणाली की, माझे पती तुला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतील. तेव्हा मोठ्या आशेने विद्या यांनी आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. एका हाताला काम असताना दुसर्‍या हाताची मदत होत असेल तर पाटील कुटुंबासाठी ते चांगलेच होते. त्यांनी देखील होकार देत बिना यांच्या मदतीने दिनेश सोनवणे याची भेट घेतली आणि शिक्षकाच्या नादापासून यांच्या भरभराटीची बरबादी सुरू झाली.

दरम्यान दिनेश सोनवणे याने सोनगाव येथे या दोघांना नेले. तेथे भाऊसाहेब पांडुरंग पटेकर याच्याशी भेट घालुन दिली. पटेकर याने सांगितले की, तुम्हाला रयत शिक्षण संस्थेत सेवक म्हणून कामाला लावून देतो. नोकरीसाठी प्रत्येकी 11 लाख रुपये द्यावे लागतील. तेव्हा पाटील म्हणाले की, आम्ही गरीब आहोत आमच्याकडे इतके पैसे नाहीत. थोडेफार पैसे कमी करा. तेव्हा पटेकर म्हणाला ठिक आहे. नंतर पाहु, येथून पुढील व्यावहार हा सोनवणे दाम्पत्यासोबत करा ते दोघे माझ्या घरातील व्यक्ती आहेत.  सध्या तुमचे नाव मस्टरवर घेण्यासाठी दोन ते अडिच लाख रुपये भरावे लागतील तर जाहिरात पडल्यानंतर पंन्नास टक्के रक्कम जमा करावी लागेल. राहिलेले पैसे ऑर्डर झाल्यानंतर द्यावे लागतील अशा चर्चा झाली होती. त्यावेळी सरळ सेवा भरती होती तर नंतर पवित्र पोर्टल आले. तेव्हा दिनेश सोनवणे म्हणाले की, तुम्ही काही काळजी करु नका. तुमची कोणत्याही प्रकारे फसवणुक होणार नाही. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन धिरज पाटील व विद्या पाटील या दोघा नवरा बायकोने रयत शिक्षण संस्थेत नोकरी मिळविण्यासाठी टप्प्या-टप्प्याने 20 लाख रुपये भरले.

दरम्यान, इकडून तिकडून पै-पै करुण या दोघांनी रयत शिक्षण संस्थेत नोकरी मिळावी म्हणून 20 लाख कसे भरले असतील हे त्यांचे त्यांनाच माहित. मात्र, आज ऑर्डर निघेल, उद्या ऑर्डर निघेल या आशेने ते रोज विचारणा करीत होते. मात्र, दि. 7 सप्टेंबर 2020 पासून आरोपी दिनेश सोनवणे व त्याची पत्नी बिना सोनवणे या दोघांचे फोन बंद लागु लागले होते. त्यामुळे पाटील यांनी थेट लोणी येथे राहणार्‍या भाऊसाहेब पटेकर याचे घर गाठले. तेव्हा तेथे सांगण्यात आले की, आता हे भाऊसाहेब येथे नाही तर ते कोपरगाव येथे बदलुन गेले आहेत. शिक्षक म्हणून 20 लाख भरलेले हे दाम्पत्य पायपिट करीत पुन्हा कोपरगावात दाखल झाले. तेव्हा ते के.बी.पी हायस्कूल येथे मिळून आले. त्यांच्याकडे सोनवणे दाम्पत्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांकडे फोन करुन चौकशी करतो व तुम्हाला कळवितो. तेव्हा हे दाम्पत्य माघारी फिरले. नंतर या भाऊसाहेबांनी सांगितले की, त्यांचा संपर्क होत नाही. त्यामुळे, तुम्ही ज्यांच्याकडे पैसे दिले आहेत. त्यांच्याकडूनच काढून घ्या. नोकरी वैगरे काही मिळणार नाही. तेव्हा, या दोघांचे शिक्षक होण्याचे स्वप्न उडले आणि ज्यांच्याकडून इतकी हातउसनी रक्कम घेतली होती. ते चेहरे सामोर दिसू लागले.

आता धिरज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या बहाद्दरांनी फक्त आमचीच फसवणुक केली नाही. तर येथे आठ ते दहा जणांनी लाखो रुपये भरले आहेत. त्यात घनश्याम खैरनार यांना रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो असे म्हणत त्यांच्याकडून 8 लाख रुपये, सागर खैरनार याच्याकडून 3 लाख, तसेच तलाठी करुन देण्यासाठी सुधाकर जाधव यांच्याकडून 10 लाख 44 हजार 700 रुपये, अरुण पडोळकर यांच्याकडून 6 लाख 40 हजार रुपये, संजिवनी सोनवणे यांच्याकडून 3 लाख 10 हजार, प्रगती खंडागळे यांच्याकडून 2 लाख, कल्पेश पतके यांच्याकडून 5 लाख असे एकुण 57 लाख 94 हजार 700 रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे, आरोपी दिनेश गोंविंद सोनवणे, त्यांची पत्नी बिना दिनेश सोनवणे (दोघे रा. साकुरी, ता. सुधर्मा अपार्टमेंट, राहाता, जि. अ.नगर) व हेडक्लार्क भाऊसाहेब पांडुरंग पटेकर (रा. विद्यानगर, लोणी, ता, राहाता) अशा तिघांनी संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अनेकांची फसवणुक केली आहे. अशा प्रकारची फिर्याद धिरज पाटील यांनी राहाता पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेत खरोखर अशा प्रकारे शिक्षक होण्यासाठी पैसा वतावा लागतो का? की तेथील काही कर्मचारी अशा पद्धतीने शिक्षक होऊ इच्छिनार्‍या व्यक्तींची फसवणुक करतात याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. खरंतर शिक्षक होणार्‍या प्रत्येक शिक्षक प्रणालीचा कचरा होऊन बसला आहे. ज्या काही रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थांवर आज विश्वास आहे. तेथेच जर लाखो आणि कोट्यावधींची लुट होत असेल तर त्याइतके दुर्दैव कोठे नाही. खरंतर सीईटी व टिईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी पैसे देऊन सरकारी नोकरी लागत नाही. हे मास्तर होऊ इच्छिनार्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपल्यालाच जर लाखो रुपयांना लोक फसवत असेल तर आपण येणारी पिढीला काय आदर्श शिकविणार आहात याचे देखील आत्मिचिंतन केले पाहिजे असा सुर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाहेर पडू लागला आहे.