अल्पवयीन मुलावर केला तीन वेळा अनैसर्गिक अत्याचार.! आरोपी अटक, संगमनेरातील प्रकार.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                     संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका नराधमाने अवघ्या 14 वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत त्याला धमकी दिली. ही घटना गुरूवार दि. 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11 वाजता तर पुन्हा नव वर्षाच्या प्ररंभात शुक्रवार दि. 1 जानेवारी 2021 रोजी पहाटे 12:30 वाजता आणि सकाळी 8 वाजता अशा तीन वेळा  घडली. त्यानंतर या मुलास त्रास होऊ लागल्यानंतर त्याने आपल्या आईस ही माहिती दिली आणि घडलेला सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी अलताफ उर्फ लाला असिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी यात तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील इंदिरानगर येथे एक कुटुंब राहते. पीडित बालकाची आई ही मुंबई येथे मेकअपचा व्यावसाय करते. या दरम्यान, तिने आरोपी यास तिच्या मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले होते. शेख हा त्या मुलांना मेसच्या माध्यमातून त्यांचे पालन करीत होता. मात्र, थर्टी फस्टच्या नावाखाली त्याने मद्य प्राशन केले आणि नवे वर्ष लागण्यापुर्वीच या नराधमाने झोपलेल्या मुलाचे कपडे काढले. यावेळी बालकाने विरोध केला असता त्याला शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा नराधम येथेच थांबला नाही तर त्याने पहाटे व दुसर्‍या दिवशी सकाळी देखील या बालकावर अत्याचार केले.

दरम्यान, सकाळी या मुलास प्रचंड त्रास होऊ लागल्यानंतर त्याने आपल्या आईस घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे मुलाचे मेडिकल केला असता हा प्रकार वास्तव असल्याचे समोर आले. मात्र, या मुलावर जो काही अत्याचार झाला होता. तो जर कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन अशी धमकी आरोपीने दिली होती. मात्र, पीडित मुलाने त्याच्या वेदनांना वाट मोकळी करुन सर्व प्रकार पोलिसांपुढे कथन केला. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या फिर्यादीनुसार आरोपी अलताफ उर्फ लाला असिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आपली मुले अन्य कोणाच्या स्वाधिन करून पालकांनी घराबाहेर पडू नये. अज्ञात व्यक्तींच्या भरवशावर मुलांना सोडू नये, आपल्या पाल्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. मुलांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. जर कोणी त्यांचे शोषण करीत असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती दिली पाहिजे. पालकांनी पाल्याचे मित्र होऊन त्यांच्या प्रत्येक समस्या लक्षात घेतल्या पाहिजे. असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले आहे.