देवा जीम चालकाकडे 20 लाखांची खंडणी मागितली, चौघांवर गुन्हा दाखल! एक निष्पन्न चौघे पसार.!
सार्वभौम (अकोले) :-
देवा जीममध्ये वेश्या व्यावसाय चालतो असे निनावी पत्र पोलीस ठाण्यात देत एका तरुणाने जीमची बदनामी केली. त्यानंतर त्यास जीमधून काढून टाकल्याचा राग आल्यामुळे, त्याने व त्याच्या तीन मित्रांनी देवा जीम चालकाकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात घडली. जर 20 लाख रुपये दिले नाही तर तुझ्या जीममध्ये वेश्या मुली आणून त्यांचा व्हिडिओ काढून तुझी बदमानी करु. अशा प्रकारची धमकी दिली. हा प्रकार देवा जीमचे चालक अतुल प्रभाकर गायकवाड (रा. गुरवझाप, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गौतम दगडू कदम (रा. पिंपळगाव खांड, ता. अकोले) याच्यासह अन्य तिघांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कदमचे नाव निष्पन्न झाले असून अन्य तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अतुल प्रभाकर गायकवाड यांची अकोले शहरात जीम आहे. तेथे गौतम कदम हा तरुण गेल्या दोन वर्षापासून व्यायाम करीत होता. मात्र, त्याच्याकडे जीमचे पैसे मागितले असता त्याला राग आला आणि त्याने या जीमची बदनामी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने पोलीस ठाण्याशी संपर्क करीत देवा जीम येथे वेश्य व्यवसाय चालतो असे निनावी पत्र लिहीले. त्यामुळे, एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी त्याची खात्री केली असता त्यात काहीच तत्थ्य आढळले नाही. हा प्रकार कोण करते आहे. याबाबत पोलीस आणि देवा जीमचे चालक गायकवाड हे देखील अनभिज्ञ होते. यामुळे, त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता.
दरम्यान, कदम याने एक नवी व्युव्हरचना करुन गायकवाड यांच्याकडे 20 लाखांची खंडणी मागितली. गायकवाड हे शनिवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना कदम याच्यासह अन्य तिघांनी आडविले आणि म्हणाला की, तु मला 20 लाख रूपये दे! अन्यथा मी तुझ्या जीममध्ये मी वेश्या व्यवसाय चालतो अशी बदनामी करील. जर तु पैसे दिले नाही तर तुला ठार मारुन टाकील अशी धमकी दिली. तर कदमच्या सोबत असणार्या तिघांनी देखील दमदाटी करीत जीममध्ये अश्लिल व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. असे अतुल प्रभाकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.