प्रेमीयुगलांनी एकमेकांच्या कवेत येऊन जीव सोडला, आंबडचा तरुण व कुमशेतची महिला, जंगलात आत्महत्या, मृतदेह कुजले.!

 

             सार्वभौम (अकोले) :- 

   अकोले तालुक्यातील आंबड येथे सुतारदार वन विभागाच्या अंतर्गत असणार्‍या जंगलात एका प्रेमीयुगलांनी एकमेकांना मिठी मारुन आपली जीवणयात्रा संपविली आहे. यातील तरुण हा आंबड येथील अमोल कातोरे हा असून विवाहीत महिला कुमशेत येथील आहे. यांनी रुंभोडी परिसरात एका व्यक्तीकडे शेती वाट्याने केली होती. या दरम्यान त्यांचा संपर्क आला असता त्याचे प्रेमात रुपांतर झाले आणि कदाचित दोघांना या जन्मात एक होता आले नाही. त्यामुळे, त्यांनी एकमेकांना संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचा अंदाज खाकीने वर्तविला आहे. त्यामुळे, दोघांच्या मृत्युप्रकरणी सध्या अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंबड येथील अविवाहीत तरुण अमोले कोतोरे याने रुंभोडी येथे एका शेतकर्‍याची शेती वाट्याने केली होती. याच दरम्यान त्याचा संपर्क कुमशेत येथील एका महिलेशी आला होता. ही महिला विवाहीत असून तिला मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, तरी देखील या दोघांची ओळख झाली आणि त्यांनी एकमेकांशी मैत्री केली. त्यानंतर हे रिलेशन अधिक वाढत गेले. त्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. त्यानंतर यांचे भावनिक नाते इतके आगाध झाले की, त्यांनी एकमेकांना आधार देण्याचा विचार करण्यापेक्षा एकमेकांना संपवून घेण्याचा विचार केला आणि त्यांनी आंबडच्या जंगलात जाऊन गळफास घेत आपल्या आयुष्याला पुर्णविराम दिला.

दरम्यान, त्यांनी ज्या भागात आपली जीवणयात्रा संपविली, त्या भागात कोठेही मनुष्य वस्ती किंवा कोणाची रहदारी नाही. त्यामुळे, त्यांनी स्वत:च्या प्रेमासाठी केलेला नको तो त्याग हा पाहण्यासाठी जनावरे आणि पक्षी सोडून कोणी नव्हते. मात्र, जेव्हा चार-पाच दिवस होऊन गेले तेव्हा पक्षी त्या जंगलात धिरट्या घालु लागले. त्यानंतर हा प्रकार एका गुरे चारणार्‍याच्या लक्षात आला असता त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, हे प्रेमीयुगल कोण आहे? याची माहिती काढताना पोलिसांच्या नाकीनव आले. सायंकाळी उशिरा हा प्रकार गावभर पसरला असता आंबड येथील काही व्यक्तींनी अमोेल कातोरे याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील एकास त्याबाबत माहिती विचारली असता तो पोलिसांना ओळखता आला. मग त्यानंतर कुमशेत येथील महिलेचा संपर्क पोलिसांनी शोधून काढला.

दरम्यान, असे प्रकार अकोले तालुक्यात बर्‍याच वेळा पहायला मिळाले आहेत. अगदी आठ-नऊ महिन्यांपुर्वी विठे घाटात असे जोडपे मयत अवस्थेत मिळून आले होते. या घटना फार दुर्दैवी असून हे फक्त आणि फक्त अज्ञात आणि शिक्षणाचा आभाव असल्याचे तज्ञांचे मत आहे. खरंतर प्रेम हे जगायला शिकवत असते, लढायला शिकवत असते, प्रेरणा देते, बळ देते. मात्र, असे प्रेम जर जीव घेत असेल किंवा जीव द्यायला प्रवृत्त करत असेल तर ते प्रेम नव्हे, त्यास विकृती म्हटली पाहिजे. त्यामुळे, जिल्ह्यात सर्वाधिक अकोले तालुक्यात अशा प्रेमीयुगलांची आत्महत्या झाल्याचे लक्षात येते. तर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार असण्याचे प्रकार देखील जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. त्यामुळे, दुर्दैवाने येथील राजकारण राज्यभर गाजते. मात्र, येथील शिक्षण व्यवस्था, आदिवासी बांधवांचा शैक्षणिक विकास आणि उन्नती याबाबत  तालुका फार कुपोशीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, अशा घटना थाबवांयच्या असतील तर शिक्षण व समुपदेशन यासाठी वेगळा कृतीकार्यक्रम आखणे अत्यंत गरजेचे आहे असे सुज्ञ लोकांना वाटते आहे.