यशवंत गडाखांची सुन व जलसंधारण मंत्री गडाखांच्या भावजयीचा संशयास्पद मृत्यू.! आत्महत्येचा संशय, काय आहे कारण?
सार्वभौम (अहमदनगर) :-
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भावजय तसेच साहित्य क्षेत्रात नावाजलेले माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सुनबाई गौरी प्रशांत गडाख (वय 38) या त्यांच्या नगर येथील राहत्या घरी मयत अवस्थेत आढळून आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हा प्रकार आज शनिवार दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लक्षात आला. या दरम्यान त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा प्रकार डॉक्टरांनी तोफखाना पोलीस ठाण्यात कळविला असता तुर्तास याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस करीत असून या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर रात्री उशिरा मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सर्व नातेवाईक दवाखान्याच्या आवारात आक्रमक झाले होते. तर मुलीने आत्महत्या का केली याबाबत त्यांनी गडाख कुटुंबाला जाब विचारला आहे. यावेळी पोलीस हे देखील उपस्थित होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रशांत गडाख व पत्नी गैरी हे गेल्या काही वर्षीपुर्वी नेवासा तालुक्यातील सोनई येथे राहत होते. त्यानंतर प्रशांत गडाख हे नगर शहरातील यशवंत कॉलनी येथे राहण्यासाठी आले होते. गौरी ह्या नेवासा तालुक्यातील यशवंतराव गडाख यांच्या सुन असून त्यांचे माहेर लोणी ता. राहाता आहेे. त्या विखे पाटील कुटुंबातील नातेसंबंधित असल्याचे बोलले जात आहे.
प्रथमदर्शनिय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी गैरी यांचा देह घरात पडलेल्या आवस्थेत मिळून आला होता. तो पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तिला तत्काळ जवळच्याच एका रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्या मयत झाल्याचे लक्षात आला. दरम्यान हा प्रकार पोलीस ठाण्यात कळविला असता त्यांनी स्टेशन डायरीला नोंद घेतली. काही कालावधीनंतर ही बातमी जिल्हाभर वार्यासारखी पसरली. पोलिसांनी याबाबत फारशी माहिती दिली नाही. त्यामुळे, याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, जोरवर शवविच्छेदनाचा अहवाल येत नाही. तोवर खरे कारण काय आहे? याची माहिती देण्याचे डॉक्टरांनी देखील टाळाटाळ केली.
दरम्यान, हा प्रकार नैसर्गिक आहे की, कसा? याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. माध्यमांमध्ये सोबर माहिती आली असली तरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान गौरी यांचे शवविच्छेदन करण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला. जोवर जवळचे नातेवाईक येत नाहीत. तोवर तिचा मृतदेह कोठे हलवायचा नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. आता या गौरी लोणी येथील असल्यामुळे येथे विखे पाटील यांची भूमिका काय असणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
रात्री उशिरा हा नातेवाईक आपल्या भूमिकावर ठाम होते. त्यामुळे, यावेळी पोलीस अधिक्षक यांच्यासह काही पोलीस अधिकारी, माध्यमे आणि सामाजिक व राजकीय लोकांची हॉस्पिटल परिसरात गर्दी जमा झाली होती. रात्री उशिरानंतर या घटनेच्या कारणापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या मृत्युचे कारण समोर येणार आहे. आता काही झाले तरी गौरी यांचे शवविच्छेदन नगर येथे नव्हे तर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात होण्याची शक्यता आहे.