अकोले पोलीस कर्मचार्‍याचा अतिरिक्त तनावामुळे मृत्यू.! वर्दीतल्या मानसाचे दु:ख.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                     अकोले शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा दिलदार व अभ्यासू पोलीस कर्मचारी किशोर पालवे (वय 48) यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर अचानक घडलेल्या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, दुर्दैव असे की, हे नेमकी घडले तरी कसे? तर याला जबाबदार म्हणजे पोलीस दलावरील वाढता तणाव होय! रोजगार हामी, काम जादा आणि   पगार कमी अशी गत खात्याची झाली आहे. आज पेट्रोलिंग, तपास, पंचनामे, माहिती अधिकारांची उत्तरे, मंत्री आणि लोकप्रतिनिधींची दौरे, बंदोबस्त, नको ते होणारे आरोप, 24 तासांपेक्षा जास्त ड्युट्या, त्यामुळे वाढणारी व्यसनाधिनता, वरिष्ठांचा दबाव व या सगळ्यांमध्ये कौटुंबिक जबाबदार्‍या या सगळ्यांमध्ये पोलीस दादा पुरता चेपून गेला आहे. त्यामुळे, अनेकांची अकस्मात नोंद करणार्‍या वर्दीवर कधी स्वत: अकस्मात होऊ याची शास्वती राहिली नाही. अर्थात हाच वाढता तणाव अनेक पोलिसांच्या मृत्युचे कारण ठरु लागले आहे.

खरंतर पालवे यांच्या रुपाने असे एक ना अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहे. मात्र, आज यांच्यासारखे अनेक प्राण या अतिरिक्त तनावाने गेले आहेत हे बळी केवळ आणि केवळ शासनाच्या बेजबाबदार नियम अटींचे आहेत हे नाकारुन चालणार नाही. कारण, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक पोलीस (काही अपवाद) पळ-पळ पळत असतो. वर्दी अंगावर चढली की तो एक सामान्य माणूस आहे हे तो विसरून जातो. आर्मी नंतर हेच देशाचे खरे वैभव आहे. मात्र, त्या खाकीत देखील एक माणूस आहे हे शासनाचे आदेश आणि वरिष्ठ अधिकारी विसरुन जातात. म्हणून तर जीवापेक्षा जड कामे करुन आणि नको तशा ड्युट्या करुन अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपले प्राण या देशासाठी न्योछावर केला आहे. याचे एक उदा. म्हणजे, पोलीस उपाधिक्षक वाय. डी पाटील हा अधिकारी अगदी सेवानिवृत्त होण्याच्या अखेरच्या सेकंदापर्यत काम करीत होती. त्यांचा निरोप समारंभ झाला आणि केवळ एक महिन्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. दुदैवाने ज्या नगरच्या पोलीस मुख्यालयात त्यांना निरोप दिली होती. त्याच मुख्यालयात त्याच ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप द्यावा लागला. हे कशाचे द्योतक आहे? तर अर्थातच पोलीस खात्यासाठी काही लोक जन्म घेतात आणि पोलीस खात्यासाठीच मरतात. म्हणून प्रत्येकाला त्याच्या कुटुंबासाठी वेळ देता येईल किमान अशी नोकरी शासनाने पोलिसांची करणे गरजेचे आहे. अन्यथा सकाळी ड्युुटीवर गेलेला बाप संध्याकाळी घरी येईल की नाही? इतकी देखील शाश्वती आता राहिलेली नाही की काय?  असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

आत पालवे हा कर्मचारी वर्दीत असला तरी तो इतका हुशार होता की, त्यांनी नेटची परिक्षा नुकतीच पास केली होती. ते डॉक्टरेट होतील इतकी तल्लख आणि चाणक्ष बुद्धीमत्ता त्यांची होती. सकाळी आपले काम आवरून ते अकोले तालुक्यातील कोतुळ येथे पेट्रोलिंगसाठी मार्गस्त झाले होते. कोतुळचा बाजार असल्यामुळे तेथे काही चोर्‍या किंवा छेडछाड होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी बाजारात पेट्रोलिंग केली. त्यानंतर सायंकाळ झाली आणि सुर्यास्ताच्या वेळी त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान आंभोळ येथे एक वायर चोरीचा गुन्हा घडला होता. तेथील पंचनामा करून मार्गस्त होऊ असा विचार करीत ते चिचखांडी मार्गाने अकोल्याकडे निघाले. पंचनामा झाला असता चिचखांडी घाटात असता ते एका दुचाकीवर मागे बसले होते. अचानक त्यांच्या छातीत चमका निघू लागल्या. खरंतर त्यांना दुपारीच असाच काहीसा त्रास होत होता. मात्र, काहीतरी किरकोळ झाले असेल आणि आपोआप निट होईल असे समजून त्यांनी कामामुळे दुर्लक्ष केले होते. मात्र, सायंकाळी त्या वेदना अचानक अधिक झाल्या आणि चालु गाडीहून ते अचानक खाली पडले. तेव्ह त्यांच्या सहकार्‍याने गाडी उभी केली आणि काय झाले असे विचारले. मात्र, योग्य उत्तर मिळाले नाही. त्यानंतर अकोल्याहून त्या 10 ते 12 किलोमिटर पोलीस गाडी बोलविण्यात आली. पालवे यांना तत्काळ शहरातील नामांकीत हॉस्पिटल भांडकोळी यांच्याकडे आणले गेले. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले.

खरंतर अकोले पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण 94 गावे आहेत. त्यात 3 लाख 50 हजार लोकसंख्या आहे. आता येथे समशेरपूर आशि कोतुळ असे दोन पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत. मात्र, ते होण्यासाठी अजून किती पोलीस कर्मचार्‍यांचा बळी जाणार आहे. हे येथील पुढारी आणि लोकप्रतिनिधी यांनाच माहिती. त्यात अकोले हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. मात्र, येथे केवळ राजूर आणि अकोले असे दोनच पोलीस ठाणे आहे. चार जिल्ह्यांच्या सिमारेषा असेला हा तालुका मात्र येथे फक्त 44 कर्मचारी काम करतात. येथे गेल्या वर्षभरात चार खून, तर एकाच वर्षात 37 दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. या पलिकडे या आठ महिन्यात दुखापतीचे तब्बल 60 गुन्हे दाखल आहेत. म्हणजे गेल्या वर्षी 2019 मध्ये अकोले पोलीस ठाण्याचा क्राईट रेट 259 इतके होता. तर आज अवघ्या आठ महिन्यातच तो 260 पेक्षा अधिक असल्याची माहिती मिळाली आहे. यापेक्षा दुर्दैव असे की, या पोलीस ठाण्यात फक्त आणि फक्त 2 पोलीस अधिकारी आहेत. एक पोलीस निरीक्षक व दुसरे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे फक्त दोन अधिकार्‍यांवर इतके मोठे पोलीस ठाणे चालते आहे. म्हणजे, तुलनात्मक संगमनेर शहराचा नाही किंवा नगर शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या बरोबरीने येथे सीआर आहे. तर एनसी मॅटर जवळपाव 300 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे पोलीस ठाणे नगर अकोल्यातील आहे की एखादे बिहार मधील पोलीस ठाणे आहे. हेच समजण्या पलिकडचे आहे.

आता पोलीस अधिक्षक साहेबांनी यावर जरा विचार करणे गरजेचे आहे. समशेरपूर व कोतुळ पोलीस ठाणे करून शहरात आणखी एखाचा पोलीस कर्मचारी तातडीने दिला तर तालुक्यावर उपकार होतील. एसपी साहेबांनी गेल्या आठवड्यात अकोले, राजूर पोलीस ठाण्यांची चौकशी केली आहे. त्याचे मुल्यांकन म्हणून लवकरात लवकर एखादा अधिकारी येथे मिळेल अशी अपेक्षा आहे. अकोलेच काय! ज्या-ज्या ठिकाणी पोलीस बळ कमी असेल तेथे कर्मचार्‍यांची पुर्तता करणे अपेक्षित आहे. अन्यथा कामे करून असे अनेक पालवे आपला जीव सोडून देतील. तसेच पोलीस अधिकार्‍यांनी देखील जिल्हा विभाजनासाठी हट्ट धरला पाहिजे किंवा नगर जिल्ह्यात तरी पोलीस आयुक्तालय होणे गरजेचे आहे. या पलिकडे किमान उत्तरेसाठी तरी एक अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि पोलीस बळाची तरतुद गरजेची आहे. असे झाले नाही तर पोलीस काम करीत राहतील आणि हकनाक जीव सोडत राहतील. यात जाईल तरी कोणाचे काय? फक्त खकीच्या छायेखाली जगणारी लेकरं उघड्यावर पडतील. बस बाकी काही नाही...!!