व्हाटसअॅपवर तो तिला आय लव यु म्हणाला अन तिने त्याच्यावर थेट गुन्हाच ठोकला. अश्लिल शब्दप्रयोग आणि धमकीही..!
संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात राहणार्या एका तरुणीस एक तरुणाने व्हाटसअॅपवर चॉटिंग केली. त्यात त्याने तिला थेट प्रपोज करीत माझे तुझ्यावर प्रेम आहे असा शब्दप्रयोग करीत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार तरुणीस फार मनस्ताप देऊन गेला. त्यानंतर तिने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला असता त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तरुणाच्या विरोेधात गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संकेत नवले (रा. मालदाड) याच्यावर छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे, मालदाड व घुलेवाडी परिसरात चर्चेला उधान आले असून या तरुणीने घेतलेल्या निर्णयाने अनेक सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, घुलेवाडी परिसरात राहणारी एक तरुणी स्वत:चे शिक्षण करण्यासाठी एका खाजगी ठिकाणी नोकरी करते. या दरम्यानच्या काळात नवले याच्याकडे तिचा मोबाईल नंबर आला होता. त्याचा फायदा घेत या तरुणाने तिच्या मोबाईलच्या व्हाटसअॅपवर चॉटिंग सुरू केली. हा प्रकार त्याने पुढे कायम ठेवत शुक्रवार दि.27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक मेसेज टाकला. त्यात त्याने स्वत:ला व्यक्त होत काही मेसेज सेंड केले होते. या दरम्यान तो थांबेल असे तरुणीला वाटले. मात्र, रविवार दि. 29 नोव्हेंबर 2020 रोजी 9:44 वाजता देखील त्याचे मेसेज मोबाईलवर येऊन धडकले. त्यानंतर सोमवार दि. 30 नोव्हेंबर रोजी मात्र, मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठले व संकेत नवले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करताना अनेकदा सोशल मीडियावरच चांगल्या सुचना येतात. मात्र, त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष असते. तर दुसरीकडे अगदी कमी वयातच तरुणांच्या हातामध्ये मोठमोठे मोबाईल येऊ लागले आहेत. याकडे पालकांनीच लक्ष दिले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने पालकच मुलांना महागडे मोबाईल घेऊन देताना दिसत आहे. ऐकीकडे सरकार ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थीच अशा प्रकारचे मोबाईलचा दुरुपयोग करताना दिसत आहे. खरंतर ऑनलाईन स्टडी करण्यासाठी विद्यार्थी पालकांकडून मोबाईल घेतात. त्यात पालक फोरजीचा रिचार्ज मारतात आणि काही अतिहुशार मुले त्यात नको त्या चित्रफिती पाहतात. त्यामुळे, या ऑनलाईन शिक्षणाबरोबर विद्यार्थी अधोगतीकडे चालला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता या गुन्ह्यामुळे अनेक तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एकदा मनव्यक्त होण्याचा तोटा म्हणजे संपुर्ण करिअर वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे, आधी उच्चशिक्षण घेतले पाहिजे, स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि मग आपले मन व्यक्त केले पाहिजे. अन्यथा अशा प्रकारचे गुन्हेगारी ठपक्यांना सामोरे जावे लागते. हे प्रकार टाळण्यासाठी किमान शाळा तत्काळ सुरू होणे गरजेचे आहे की काय असे वाटू लागले आहे.