संगमनेरात दुकानावर छापा, गुटख्याच साठा जप्त, अवैध व्यावसायाने तालुका भंगलाय.! येथे काय घडायचं राहिलय.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात मालदाड रोड परिसरात सार्थक ट्रेडर्स या दुकानावर संगमनेर पोलिसांनी छापा टाकला. यात 10 हजार 574 रुपयांचा गुटखा व नशिली तंबाखु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवार दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास केली. यात अनिल नामदेव दिघे (रा. अंबर कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर) यास आरोपी करण्यात आले आहे. तर अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यात गुटखा प्रकरणाचा बोलबाला सुरू असताना त्याची निर्मिती संगमनेर तालुक्यातून होत असल्याचे समोर आले होते. तर गुटखा प्रकरणातून निमगाव येथून काही व्यक्तींना ताब्यात देखील घेतले होते. विशेष म्हणजे, याच प्रकरणात संगमनेरात बदलुन आलेल्या बड्या अधिकार्यांवर देखील आरोप झाले आहेत. तर त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. असे असताना संगमनेर शहरात दुकान तेथे तंबाखु आणि टपरी तेथे गुटखा अशी परिस्थिती दिसत आहे. मात्र, शहर पोलीस ठाण्यातून या एकच ठिकाणी कारवाई का झाली? याचे देखील आश्चर्य वाटते आहे. मात्र, काही का होईन.! अशा "गुटखा किंगवर" कारवाईला मुहूर्त लागला हे महत्वाचे आहे.
विशेष म्हणजे, संगमनेर तालुक्यात आता वेश्या व्यावसाय सुरू झाला आहे. त्याला शहरातील खाकीचे वलय असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शहरातील चांगल्या वसाहतीच्या शेजारुन तालुक्यात आणि जिल्ह्यातील काही भागात गांजा पुरविला जात असल्याचे बोलले जात आहे. आता यापुर्वी पोलिसांनी एका ठिकाणी गांजावर कारवाई केली होती. मात्र, असे अनेक "गांजाबहाद्दर" आहेत, जे शहरातील काही कर्मचार्यांना माहित आहे. खरंतर तुम्हाला थोडा धक्का बसेल की, अधिकार्यांच्या त्रयस्त काही कर्मचारी मोठा "मलिदा" जमा करतात, त्याची खबर अधिकार्यांपर्यंत जात असेल नसेल. मात्र, "मांजराने डोळे झाकून दुध पिले म्हणजे ते जगाने पाहिले नाही, असे होत नाही". याच भोंगळ कारभाराचा एक बळी देखील गेला आहे.
यात महत्वाचे म्हणजे, संगमनेर तालुक्यात खाकीकडूनच आजकाल फार अतिरेख होऊ लागला आहे. कारण, भर लॉकडाऊनच्या काळात एका पोलीस कर्मचार्याने पोलीस बंदोबस्तात गुटख्याची गाडी पुणे तालुक्यात नेवून सोडली होती. तर दुसरीकडे वाळु तस्करांचा पाटलाग करता-करता एका कर्मचार्याने तिघांचा बळी घेतल्याचे समोर आले होते. मात्र, झाले काय? सर्व काही सारंश शुन्य.! त्यामुळे, येथे कोणाचा वचक राहिलेला दिसून येत नाही. येथे सर्वच हात बरबटले आहेत की काय? असा प्रश्न अनेकांनी उभा केला आहे. मात्र, एक अन्याय खरा आहे. की, जे रोशन पंडित अगदी कोणाच्या एक रुपयास मिंधे नव्हते, त्यांची थेट पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. खात्यात राहून त्यांना जितके कागदी काम करता आले त्यांनी ते केले. मात्र, त्या पलिकडे त्यांना फार बंधने होती. तरी देखील त्यांनी मोठ्या जिकरीने काम केले. मात्र, त्यांना मुख्यालयात जमा व्हावे लागले. त्यामुळेच काही काय! त्यांच्या बदलीनंतर अनेकांनी उच्चार काढले. वा रे उध्ववा..! अजब तुझे सरकार....
खरंतर संगमनेर तालुक्यात स्थानिक खाकी बरबटलेली आहेच.! मात्र, येथे एका स्थागुशाचा कर्मचारी देखील येथे 24 तास डेरेदेखल असतो. येथील वाळु तस्कारी आणि अवैध धंद्यांसाठी तो या तालुक्याला अगदी देवाला सोडल्यासारखा फिरतो आहे. प्रवरा नदिकाठी फिरत-फिरत बिचार मोठ्या कष्टाने मलिदा जमा करत असतो. या घाई गरबडीत त्याचा मागिल आठवड्यात बस स्थानक परिसरात अपघात देखील झाला होता. मात्र, सुदैवाने तो वाचला, गाडीचे मात्र प्रचंड मोठे नुकसान झाले. हा कर्मचारी नगरच्या शाखेत कार्यरत असतो की संगमनेरच्या हे अधिकार्यांनी जर शोधले पाहिजे. मात्र, सगळी यंत्रणा कशी आहे, हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. मात्र, आता या स्थागुशाला एक तडफदार अधिकारी मिळाला आहे. त्यांनी किमान खाकीची "चवधरी"ल अशी तरी मानसे इकडे पाठविली पाहिजे. नाहीतर, काय.! येरे माझ्या मागल्या.....
एकंदर, संगमनेर तालुक्याची परिस्थिती फार भयानक आहेत. येथे फार जबाबदार लोक देखील वाळुच्या गाड्यांमध्ये भागिदारी आहेत. तर अनेक जबाबदार लोकांचे जुगार मटक्याचे आड्डे आहेत. दुर्दैवाने मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यात वेश्या व्यवसाय, गांजा, गुटखा, दारु, जुगार, मटका, आफू, कट्टा, सट्टा, कत्तलखाने यांच्यासह अन्य अवैध व्यवसायांचे आड्डे उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे जमिनिच्या किरकरोळ जागेहून जिवघेणे हल्ले होण्याचे प्रमाण फार आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने प्रॉपर पोलिसिंग करणे अपेक्षित आहे. अन्यथा येणार्या काळात येथे नगर शहर आणि उल्हास नगर सारखे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत राहिल. तसेच आज एक पुरोगामी म्हणून तालुक्याची ओळख आहे. ती बिहार आणि युपी, एमपी सारख्या एखाद्या दुर्गम भागातील तालुक्यासारखी पहायला मिळेल. त्यामुळे, राजकारणी, समाजसेवक व तालुक्याच्या हितचिंतकांनी या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी त्वरीत काहीतरी प्रयत्न केले पाहिजे.