अकोले बाजार समितीत फुल राडा, म्हतार्याला तरुणाकडून अमाणूश मारहाण.! दादागिरी व गुंडशाही चव्हाट्यावर!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील बाजार समिती म्हटले की, पहिले चित्र बाजारभाव नव्हे तर अगस्ति कारखान्याच्या राजकारणाहून सन 10 जून 2002 रोजी झालेली दंगल आठवते. त्यावेळी एक मयत, दोघे आयुष्याचे अधू तर 40 जण गंभीर जखमी झाले होते. तीच बाजारसमिती आज पुन्हा हाणामारीने चर्चेला आली. येथे ओल्या पार्ट्या आणि अन्य काय-काय उचापती चालतात हे अनेकांच्या तोंडून एकले होते. मात्र, आज प्रत्यक्षात एक जीव जाता-जाता वाचल्याचे पहायला मिळाले. कारण, एक तरुण तागडा माणूस एका वयोवृद्ध वडीलधार्या व्यक्तीला किती अमानुषपणे मारतो आहे. हे पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचे पाणी-पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, अन्य काही मांडण्यापेक्षा हा व्हिडिओ पाहा आणि तुम्हीच ठरावा. या बाजार समितीला मारामार्यांची चटक लागली आहे की काय? मात्र, या सगळ्यात येथील प्रशासन नेमके काय करतेय हे कोणाला कळेनासे झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या काळात कोणाच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत एका वयोवृद्ध व्यक्ती गेल्या कित्तेक दिवसांपासून बाजार समितीत येऊन हाताला मिळेल ते काम करुन आपली व आपल्या कुटुंबाची गुजरान करण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे. मात्र, हे अन्य लोकांना पहावेल ती मानवी प्रवृत्ती कसली? या वृद्ध व्यक्तीस तेथील काही व्यापारी देखील दोन रुपये मिळतील अशा पद्धतीचे काम सांगून त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, नकळत तेथे काही व्यक्तींचे महत्व कमी होते की काय! असा प्रश्न पडतो. अर्थात हे वाद वास्तवत: कशाहून झाले हे समजत नाही. मात्र, व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की, अगदी शुल्लक काहीतरी कारणाहून हा तरुण त्या म्हातार्या व्यक्तीस अगदी अमानुष मारहाण करीत आहे.
अर्थात, काही व्यापार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित वृद्ध व्यक्ती हा फार प्रामाणिक असून या वादात त्याची काही एक चुक नाही. तर, त्या व्यक्तीला कोणी काहीही काम सांगितले तरी तो कधी नाही म्हणत नाही. त्यामुळेच की काय! त्याचे मार्केटमध्ये चांगलेच भावनिक प्रस्त बसले होते. कदाचित हीच तेथील काही लोकांची पोटदुखी झाली असावी असे व्यापार्यांचे मत आहे. तर जो व्यक्ती म्हतार्यास मारहाण करत आहे. त्याचे शरिरयष्टी पाहिली तर त्याच्या वर्तनुकीला असा वागणे शोभत नाही अशा प्रतिक्रीया आज सोशल मीडियात उमटत होत्या. आज हा व्हिडिओ दिवसभर अकोले तालुक्यातील बर्याचश्या व्हाटसअॅप गृपवर पहायला मिळाला. हा सर्व प्रकार घडत असताना तो एका व्यापार्याच्या दुकाना परिसरात असणार्या सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद झाला. त्यामुळे, हे अमानुष कृत्य सगळ्यांच्या समोर आले.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात माहिती विचारली असता पोलिसांनी सांगितले की, बाजार समिती परिसरात अशा प्रकाचे कृत्य घडल्याची माहिती हाती आली आहे. मात्र, याबाबत कोणी तक्रार दाखल केलेली नाही. आता पोलिसांनी हा व्हिडिओ कदाचित पाहिला असेल. मात्र, त्यांना फिर्याद हवी आहे. म्हणजे, कोणी कोणाला मारुन टाकले तरी चालेल. जोवर फिर्याद नही तोवर कोई गुन्हा नही! अशी फिल्मी भूमिका प्रशासनाने निभावली आहे. मात्र, अशा वेळी पोलिसांनी किमान बाजार समितीला नोटीस काढणे आवश्यक आहे. जे घडले त्याबाबत प्रतिबंधात्मक नोटीस काढणे गरजेचे आहे. की गंभीर गुन्हा घडण्याची ते वाट पाहतात. देव जाणे! याबाबत आता पोलीस निरीक्षक, नवे पोलीस उपाधिक्षक आणि पोलीस अधिक्षक काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
अकोले बाजार समितीवर रक्तरंजीत दंगल होऊन आज 18 वर्षे, 3 महिने व 30 दिवस झाले आहेत. त्यानंतर देखील येथे अशा प्रकारचे कृत्य पहावयास मिळते. हे तेथील प्रशासनाचे अपयश आहे. खरंतर तेथे काय बाजार चालतो आणि कसा बाजार भरतो. हे अनेकांच्या तोंडून एकावयास मिळते. मात्र, अशा बाजारात देखील येथे मानुसकीचा बाजार उठल्याचे चित्र पहायला मिळाल्याची टिका समाजातून होऊ लागली आहे. येणार्या काळात येथे अशी बेजबादार यंत्रणा पहावयास मिळू द्यायची नसेल तर अकोल तालुक्याप्रमाणे बाजार समितीत देखील परिवर्तनासाठी शेतकर्यांनी मजुरांनी साथ द्या. अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर पहावयास मिळाले आहे. त्यामुळे, हा व्हिडिओ येथील कारभार आणि दादागिरी तसेच शेतकरी व मजुरांना किती अमानुष पणाची वागणूक देते, याचे दर्शन यातून घडल्याचे बोलले जात आहे.