मित्रानेच डॉक्टरांना असा दिला दणका की डॉक्टर व्हेंटीलेटरवर.! डॉक्टरांनीही मग सार्या कुटुंबाची दिवळीच काढली.! डॉ. गेठेंची 40 लाखांच्या गुंठेवारीत फसवणुक.!
सार्वभौम (सार्वभौम) :-
संगमनेर शहरातील डॉ. योगेश गेठे यांना गुंजाळवाडी येथील 10 गुंठ्याच्या जमिन व्यावहारात पाच आरोपींनी 40 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार दि. 24 फेब्रुवारी 2016 ते आज रविवार दि. 14 नोव्हेंबर 2020 रोजी या दरम्यानच्या काळात घडला आहे. हा व्यावहार गंगागिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नविन रोड येथे झाला होता. पैसे दिल्यानंतर जागा मागून देखील ती मिळाली नाही तसेच जागा नाही, तर दिलेले पैसे तरी परत द्या अशी विनंती करुन देखील डॉक्टारांना त्यांनी वारंवर फसविले. याप्रकरणी आज संगमनेर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात डॉ. गेठे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रशांत प्रकाश झावरे, विनीता प्रशांत झावरे, प्रविण प्रकाश झावरे, प्रकाश कोंडाजी झावरे, शारदा प्रकाश झावरे (सर्व रा. घोडेकर मळा, संगमनेर) यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे, आजवर जे डॉक्टर अनेकांना व्हेंटीलेटरवर टाकून निट करतात त्यांनाच आज झावरे कुटुंबाने व्हेंटीलेटरवर टाकले आहे. मात्र, डॉक्टरांनी थेट पोलीस ठाणे गाठून झावरे कुटांबाची दिवाळी काढली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील गणेश नगर येथे राहणारे डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे (वय 40) यांची गुंजाळवाडी शिवारातील प्रशांत झावरे याच्याशी ओळख झाली होती. गेठे यांनी झावरेस सांंगितले की, मला 10 गुंठे जागा हवी आहे. तेच सावज लक्षात घेऊन झावरे याने त्यांची गुंजाळवाडी येथे असणारी गुंतागुंतीची जागा विकण्याचा घाट घातला. प्रशांतने डॉक्टरांना सांगितले की, माझ्याकडील गुंजाळवाडी शिवारातील सर्वे नं 45 मधील 10 गुंठे जागा देणे आहे. आम्हाला लोकांची देणेदारी आहे. त्यामुळे, ही जमीन आम्हाला तत्काळ विकायची आहे. असे म्हणत आरोपी मित्राने डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. दरम्यान 10 गुंठ्याचा व्यावहार दोघांमध्ये साक्षी पुराव्यासह 40 लाख रुपयांना ठरला होता. त्यावेळी डॉक्टरांनी ही जागा घ्यावी म्हणून त्यांच्यामागे घाई केली गेली आणि तत्काळ व्यावहार होऊन पहिल्याचे वेळी 20 लाखांची मागणी करण्यात आली. आता जागा हवी आणि मित्रही विश्वासातील आहे. त्यामुळे डॉक्टर गेठे यांनी वडिलांकडून व स्वत:च्या कमाईतले 20 हजार झावरे यास काडून दिले.
दरम्यान आरोपी झावरेकडे जागेचे कागदपत्र मागितले असता त्याने फक्त टोप्या घालण्याची कामे केली. आज उद्या करुन कागदपत्रे तहसिल कार्यालयात काढण्यासाठी टाकले आहेत लवकरच मिळतील असे सांगण्यात आले. त्यानंतर यांनी दुसरा स्टन्ट उभा केला. डॉक्टर गेेठे यांना सांगितले की, ज्यांचे पैसे द्यायचे आहेत ते आमच्या दारात येऊन उभे राहतात. त्यामुळे, आमच्यावर विश्वास ठेवा आणि 20 लाख रुपये आणखी द्या. त्यानंतर दुसर्या टप्प्यातील 20 लाख रुपये देखील आरोपींना देण्यात आले. दरम्यानच्या काळात झावरे कुटुंबाने डॉक्टरांना काही कागदपत्रे देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. ठरल्याप्रमाणे जमिनीचे खरेदीखत झाले नाही, त्यामुळे, तुम्हाला मी जे 40 लाख रुपये दिले होते, ते मला परत द्या अशी मागणी डॉक्टरांनी केली होती. ते देखील त्यांना परत मिळाले नाही. त्यामुळे नेमकी काय भानगड आहे हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी चौकशी केली असता ती जागा फार गुंतागुंतीची असून ती विकता येत नाही असे लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, हा प्रकार समोर येताच त्यांच्यात झालेला जमीन व्यावहार रद्द करण्यात आला व या व्यावहाराबाबत एक करारनामा तयार करण्यात आला. यावेळी डॉ. गेठे यांनी दिलेल्या 40 लाखांच्या बदल्यात आरोपी प्रशांत प्रकाश झावरे, विनीता प्रशांत झावरे, प्रविण प्रकाश झावरे या तिघांनी त्यांच्या नावाचे 80 लाख रुपये रकमेचे नऊ चेक दिले होते. परंतु आरोपी यांच्या खात्यात पैसे नसल्यामुळे सर्व चेक बाऊन्स झाले, त्यामुळे, डॉक्टर गेठे यांनी कलम 138 नुसार न्यायालयात खटला दाखल केला. या दरम्यानच्या काळात डॉक्टरांनी आरोपींकडे वारंवार पैशाची मागणी केली होती. मात्र, आरोपींकडून त्यांना वारंवार उडवाउडविची उत्तरे मिळाली. उलट आरोपींनी पैसे देणे सोडून डॉक्टरांनाच शिविगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीस ठाणे गाठून आरोपींची दिवाळी काढली आहे. आज पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी चौकाशी केली असता यात तत्थ आढळून आले आहे. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केला आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करीत आहेत.