अकोल्यात २२ तर संगमनेरात ३२ रुग्णांची भर, दोन्ही तालुके कोरोना मुक्तीकडे.!

सार्वभौम (संगमनेर) :- 
      संगमनेरमध्ये काल 19 तर आज 32 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरातील 5 तर तालुक्यातील 27 जणांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहेत. कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ पाहता  22 मार्च रोजी कडेकोट लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यास संगमनेरांनी चांगला प्रतिसाद देखील दर्शवला होता. परंतु सुरवातीस बोटावर मोजण्याइतके कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत होते. तेच नंतर शहरासह तालुक्यात 50 ते 60 च्या सरासरीत आढळून आले. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये संगमनेरात सर्वाधिक रुग्णांची आकडेवारी आढळून आली. मात्र, संगमनेर प्रशासनाने गेल्या सहा महिन्यात या कोरोना विषाणुविरुद्ध चांगलीच कंबर कसली होती.जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळुन येणारा तालुका आज कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कारवाई करण्यात आली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्याला कायद्याचा धाक दाखवला तर विनामास्क हिंडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. लग्नसोहळ्याच्या माध्यमातून कोरोना संगमनेरकरांच्या मानगुटीवर बसला होता. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्नांवर देखील कडक कारवाई करण्यात आली. तर दिवसागणिक रुग्णाची वाढती संख्या पाहुन सुविधा उपलब्ध करून दिल्या. पण, कोरोना महामारीच्या काळात कोणाची ही हेळसांड होऊन दिली नाही.आज मितीला संगमनेर मध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहे. यामध्ये संगमनेर प्रशासनाचा मोलाचा वाटा आहे. आज शहरातील कोष्टीगल्ली येथे चार रुग्ण आढळुन आले आहे. यामध्ये 55 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष तर 85 वर्षीय वयोवृद्ध व 8 वर्षीय मुलगी तर चंद्रशेखरचौक येथे 60 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यातील पठारभागावरील केळेवाडी येथे 55 वर्षीय महिला तर शेळकेवाडी येथे 29 वर्षीय पुरुष व भोजदरी येथे 35 वर्षीय पुरुष तर कुरकुटवाडी येथे 22 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा तर आंबीदुमाला येथे 18 वर्षीय युवती व केळेवाडी येथे 60 वर्षीय पुरुष तर अकलापूर येथे 37 वर्षीय महिला व 20 वर्षीय युवती तर 17 वर्षीय व 15 वर्षीय तरुण तर आनंदवाडी येथे 12 वर्षीय मुलगा व 21 वर्षीय युवती तर 40 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला तर झोळे येथे 18 वर्षीय पुरुष व संगमनेर खुर्द येथे 30 वर्षीय पुरुष तर जवळेश्वर येथे 29 वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडी पठार येथे 4 वर्षीय मुलगा व जवळेकडलग येथे 52 वर्षीय महिला तर तळेगाव दिघे येथे 30 वर्षीय पुरुष व वडगावपान येथे 68 वर्षीय पुरुष असे लोक पॉझिटीव्ह मिळून आले आहेत.
        तर अकोले तालुक्यात आज २२ रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. त्यात नवलेवाडी येथे ३१ वर्षीय महीला, ३४ वर्षीय महीला, उंचखडक बु येथे ४० वर्षीय पुरूष, अकोले शहरातील जुन्या एस. बी. आय. बँकेजवळील ७५ वर्षीय पुरूष, १७ वर्षीय तरुणी, २१ वर्षीय महीला, ४० वर्षीय महीला, ५० वर्षीय महीला, १० वर्षीय तरुण, बदगी येथे ४० वर्षीय महीला, मन्याळे येथे १७ वर्षीय तरुणी, बेलापूर येथे १२ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय महीला, डोंगरगाव येथे ६६ वर्षीय महीला, ६५ वर्षीय महीला,६६ वर्षीय महीला, ७४ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय पुरूष, ५३ वर्षीय पुरूष, ४९ वर्षीय पुरूष, ७५ वर्षीय पुरूष, लिंगदेव येथे २४ वर्षीय तरुण, असे एकूण २२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत अकोले तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १ हजार ९१३ झाली आहे.
        आज दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७ वाजता आतापर्यंत ४६ हजार ८३७ रुग्ण बरे होऊन परतले घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.८२ टक्के असून आज तब्बल १ हजार ४० रुग्णांना डिस्चार्ज तर ४११ रुग्ण नव्याने बाधित मिळून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४११ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३८५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९४ आणि अँटीजेन चाचणीत २२० रुग्ण बाधीत आढळले आहेत. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, जामखेड ०१,  कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१,  पारनेर १०, पाथर्डी ०१, राहाता ०२, राहुरी ०१, श्रीगोंदा १८, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २७, अकोले ०२, जामखेड ०३, कर्जत ०१,  कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १२, पारनेर ०६, पाथर्डी ०३, राहाता ०९, राहुरी ०८, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०६, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २२० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, अकोले २२, जामखेड ११, कर्जत ०८,  कोपरगाव ११, नेवासा १९, पारनेर १३, पाथर्डी ०४, राहाता १७, राहुरी १४, संगमनेर ३२, शेवगाव २३, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २१६, अकोले ६४, जामखेड ५४, कर्जत १२, कोपरगाव २८, नगर ग्रा. ८१, नेवासा ४८, पारनेर ३८, पाथर्डी ३०, राहाता ९३, राहुरी ८०, संगमनेर १४७, शेवगाव ४७, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट ०६ आणि मिलिटरी हॉस्पिटल २१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ४६ हजार ८३७ असून उपचार सुरू असलेले रूग्ण ३ हजार ३८५ आहेत. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७८८ इतकी असून आजवर एकूण रूग्ण संख्या ५१ हजार ०१० इतकी झाली आहे.