च्यायला, छे.! त्यांनीतर स्मशानातल्या सरपनाची लाच खाल्ली.! मेल्यावर तरी सोडा मानसांना.!
सार्वभौम (अहमदनगर) :-
गेल्या काही दिवसांपुर्वी अहमदनगर येथे एका मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. त्यानंतर नतदृष्ट लोक मेलेल्या प्रेताच्या टाळुवरील लोणी देखील चाटायला मागेपुढे पाहत नाहीत. हे समोर आले होते. त्यानंतर आता तर लाचखोरीची दुसरी हद्दच लाचखोरांनी पार केली आहे. कारण, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून जे स्मशानात नऊ मन सरपण जाते. त्यातच तीन लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ५० हजार लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हणजे लाच कोठे खावी याचे देखील तारतम्य समाजाला आणि सरकारी लोकांना राहिले नाही की काय.! असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या ५० हजारांपैकी या महाशयांनी ३० हजार रोख रक्कम स्विकारताना पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांच्या पथकांने तिघा लाचखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी राजेंद्र माधवराव जाधव (वय ४५ वनसंरक्षक वर्ग-3) श्री. पल्लवी सुरेश जगताप (वय. ३५ वनपाल वर्ग-३) व बाळु श्रीधर सुंभे (वय ४२, वनसंरक्षक फिरते पथक वर्ग. ३) सर्व नेमणूक वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर अशी तिघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे अहमदनगर ते मुंबई स्मशानासाठी लाकुड पुरवठा करतात. सध्या कोविडचा काळ असल्यामुळे, मुंबईत मयत होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर, मुंबई अति लोकसंख्या असणारे शहर असल्यामुळे तेथे माणसे जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरपण गरजेचे आहे. म्हणून तर पारनेर तालुक्यातील काही वनक्षेत्र परिसरातून मोठ्या प्रमाणावर ही लाकडाची निर्यांत मुंबईत केली जाते. पण, दुर्दैव असे की, येथे कोणाला मानुसकी नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही देव जाणे. येथील वनपालांनी तर लाच खाण्याच्या देखील हद्दच पार करुन टाकल्या आहेत. चक्क स्मशानातील लाकडांवर त्यांनी लाच खावी.! म्हणजे लोक माणूस मेला तरी त्याच्या टाळुवरील लोणी चाटायला टपून बसलेले असतात असेच आता बोलले जाऊ लागले आहे.
त्याचे झाले असे की, त्या चार लाकडाचा ट्रक कारवाई करणेसाठी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर येथे विभागीय वन अधिकारी दक्षता नाशिक यांनी जमा केला होता. सदर ट्रक सोडणेसाठी आरोपी १ राजेंद्र जाधव याने ३० हजार रु. लाचेची मागणी केली होती. ती दि. ९ आक्टो २०२० रोजी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर अ.नगर येथे स्विकारली. तर आरोपी २ यांनी रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले व ३ यांनी ५० हजार रू ची मागणी करून त्यापैकी २५ हजार स्विकारल्याचे मान्य केले. याबाबत हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ देखील घेण्यात आलेली आहे. हा सापळा मृदुला नाईक, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक सह अधिकारी - पोनि. उज्ज्वल पाटील, पोनि. किरण रासकर ला.प्र.वि नाशिक, पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, पो ह वा मोरे, पोना. बाविस्कर,पोना. शिंपी लाप्रवि नाशिक यांनी सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, सोनवणे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, दिनकर पिंगळे पोलीस अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
तर हा ट्रॉप होतो कोठे नाहीतर दि.09 ऑक्टोबर रोजी दुसरा एक ट्रॉप यशस्वी झाला होता. यात देखील तक्रारदाराच्या भावाच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाच्या तपासाचा अनुषंग होता. त्या खर्चापोटी 5 हजारांची लाच स्विकारताना शिर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रविण दिलीप अंधारे याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. यातील तक्रारदार यांच्या भावाच्या अकस्मात मृत्यू संदर्भात दाखल असलेल्या तपासामध्ये तक्रारदाराकडे संबंधित पोलिसाने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज पोलिस प्रविण दिलीप अंधारे याला शिर्डी पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक हरिष खेडकर, पोलिस निरिक्षक दिपक करांडे यांच्यास पथकाने ही कारवाई केली आहे.