अकोल्यात जमीन वाटपामुळे वाद, तिघांवर कोत्याने वार, दोन बोटे तुटली, तिघांवर गुन्हा दाखल.!

सार्वभौम (अकोले) :- 

              अकोले तालुक्यातील विरगाव येथे जमीन वाटपाच्या कारणाहून दोन गटात वाद झाले होते. यात एका व्यक्तीने तिघांवर कोयत्याने वार केले आहेत. त्यात एका व्यक्तीच्या हाताची दोन बोटे कट झाले असून दोघांना गंभीर मार लागला आहे. ही घटना बुधवार दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाळासाहेब विश्वनाथ वाकचौरे (धंदा शेती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांना आरोपी करण्यात आले आहे. तर बाळासाहेब वाकचौरे, अलका वाकचौरे व किरण वाकचौरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब वाकचौरे हे बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी महेश रंगनाथ वाकचौरे, शितल महेश वाकचौरे व मंदा रंगनाथ वाकचौरे (रा. विरगाव, ता. अकोले) हे तेथे आले व बाळासाहेब यांना म्हणाले की, तु गट नं. 1011 व 124 मध्ये असलेल्या शेतीची नव्याने वाटणी करुन दे. असे म्हटल्यानंतर बाळासाहेब हे त्यांना समजून सांगत असताना तिघांनी त्यांना शिवीगाळ दमदाटी केली. तर महेश वाकचौरे याने त्याच्या हातातील कोयता घेऊन बाळासाहेब यांच्या बोटांवर मारला. 

दरम्यान हा प्रकार किरण व अलका वाकचौरे यांने पाहिला असता ते हा वाद सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना देखील महेशने कोयत्याने मारहाण केली. यात अलका यांच्या डाव्या हातावर कोयता मारल्याने तळहात कापला गेला आहे. तर शितल व मंदा वाकचौरे यांनी अलका व किरण यांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करीत धमकी दिली असे बाळासाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तर या घटनेनंतर जखमी यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी अकोले येथे आणले होते. तेव्हा सदर बाब अकोले पोलिसांना सांगितली असता त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल होण्याचे सांगण्यात आले. मात्र, बाळासाहेब यांच्यासह अन्य दोघांना चांगलाच मार लागलेला असल्यामुळे ते खाजगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अकोले पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार गुरूवार दि. 15 रोजी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसले करीत आहेत.

दरम्यान, अकोले तालुक्यात जमिनीच्या वादातून खून, मारामार्‍या, धमक्या, शिवीगाळ दमदाट्या असे प्रकार वाढत चालले आहेत. येथे खरंतर गाव पुढार्‍यांनी एकत्र बसून असे जमिनिचे वाद सोडविले पाहिजे. दोन गटातील वाद समोपचाराने मिटले तर कोर्ट कचेर्‍या आणि दोन भावांमध्ये होणार्‍या वादांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे, गाव पुढार्‍यांना राजकारणापेक्षा अशा वादांमध्ये लक्ष घातले पाहिजे. त्यावर मार्ग काढले पाहिजे असे समाजसेवक व पोलिसांना वाटते आहे.