दारुड्या करंगळीला चावला, अकोल्यात गुन्हा दाखल


सार्वभौम (अकोले) : 

                    अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भाऊबंदकीत किरकोळ वाद होते. यावेळी एक व्यक्ती दारू पिवून आला व त्याने एका महिलेस शिविगाळ दमदाटी करून एकाच्या करंगळीला चावा घेत तेथून पळ काढला. ही घटना गुरूवार दि. 15 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोपट किसन वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात मच्छिंद्र किसन वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोपट वाकचौरे हे त्यांच्या घरात त्यांचे काम करीत होते. तर त्यांची पत्नी ही घराबाहेर काम करीत होती. यावेळी मच्छिंद्र किसन वाकचौरे हा तेथे आला व त्याने पोपट यांच्या बायकोला वाईट शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी पोपट हे बाहेर आले व त्यांनी मच्छिंद्र यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ, दमदाटी करु नको. महिलांना वाईट साईट बोलू नको. मात्र, त्याने काही एक एकले नाही. उलट पोपट व त्यांच्या पत्नीस धक्काबुक्की करु लागला.


दरम्यान पोपट हे मच्छिंद्र यास समजून सांगत असताना मद्य पिल्याच्या नादात त्याने पोपट यांचा हात धरुन करंगळीचा तोंडाने चावा घेतला. यात पोपट यांच्या हाताला मोठी जखम झाली असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी पोपट यांच्या फिर्यादीनुसार मच्छिंद्र किसन वाकचौरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. असे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

         कोविड माहिती 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत २५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२५६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१ आणि अँटीजेन चाचणीत १०७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२,अकोले १४, जामखेड ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०३, राहाता ०१, श्रीगोंदा १५, कॅंटोन्मेंट ०२  अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १७, अकोले ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०५, संगमनेर ०९,  श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ११, जामखेड ०८, कर्जत १४,  कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०४, पारनेर १०, पाथर्डी २०, शेवगाव ३२, श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ६९, अकोले १४, जामखेड २२, कर्जत१३ कोपरगाव १०, नगर ग्रा.२२,नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ३९, राहाता १९, राहुरी ०८, संगमनेर ०७, शेवगाव १६, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेली रुग्ण संख्या ५० हजार १९ इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या २ हजार २५६ आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ८०८ असून एकूण रूग्ण संख्या ५३ हजार ८३ इतकी आहे.


तर आज अकोले तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात गणोरे येथे 48 वर्षीय पुरुष, कारखाना रोड अकोले येथे 30 वर्षीय पुरुष, धामनगाव पाट येथे 17 वर्षीय तरुण, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 40 वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे 13 वर्षीय मुलगा, 45 वर्षीय पुरुष, उंचखडक बु येथे 34 वर्षीय पुरुष, गर्दनी येथे 12 वर्षीय मुलगा, धामनगाव रोड अकोले येथे 31 वर्षीय पुरुष अशा 11 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. आज 69 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 11 जण मिळून आले आहेत. तर आजवर तालुक्यात कोरोनाने तीन हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे.