संघर्षातून राजकीय अस्तित्व निर्माण करणारा लोकाभिमूख नेता- अजय फटांगरे


सार्वभौम (विशेष लेख) :- 

                               जिद्द आणि धेय्य डोळ्यासमोर असेल तर समोर कितीही मोठी संकटे आली तरी ती कस्पटाप्रमाणे वाटतात. जीव गेेला तरी बेहत्तर पण ज्याच्या अंगी शुन्यातुन विश्वाची निर्मिती करण्याचे धाडस असते, तो धेय्यवेडा तरुण कधीच परिणामांची चिंता करीत नाही. आपल्यामागे कोणाचे वलय असो नसो. लढायचे आणि जिंकायचे हेच स्वप्न उराशी बाळगून राजकारणात नव्याने पाय रोवून स्वकर्तुत्वाने संगमनेरकरांच्या मनात विशेष स्थान निमार्र्ण करणार्‍या एका विशाल व्यक्तीमत्वाची आज आपण ओळख करुन घेणार आहोत. अर्थातच ज्यांनी भल्याभल्यांना राजकारणात घाम फोडून नामदार साहेबांच्या विश्वासाने पठार भागावर अधिराज्य गाजविले अशा अपराजीत अजय फटांगरे यांची. आजवर अनेकांना त्यांचे सानिध्य लाभले आहे. मात्र, या व्यक्तिमत्वाच्या संघर्षाची सखोल ओळख अनेकांना नाही. साहेबांची उंची आज उतुंग वाटत असली तरी त्यामागे अथक परिश्रम आणि प्रचंड मोठा त्याग आहे. म्हणतात ना.! जया  अंगी मोठेपण, तया यातना कठीण. असेच काहीसे स्ट्रगल फटांगरे साहेबांनी भोगले आहे तेव्हा कोठे आज त्यांच्या कष्टाचा आज बहर आल्याचे दिसते आहे. अर्थात त्यांच्यावर जळणारे काही लोक असतील देखील. मात्र, त्यांच्या प्रेमाचा जनसागर आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओठंबून वाहताना दिसतो आहे. अशा संघर्षमय व्यक्तीला रोखठोक सार्वभौम सलाम करतो आहे..!

सन 1982 साली देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत होते. याच वेळी संगमनेर तालुक्यातील डोंगर दर्‍यांमधील सारोळे पठार गावात एका राजकीय अस्तित्वाचा जन्म होऊ घातला होता. आदर्श शिक्षक नारायण फटांगरे यांच्या सुसंस्कृत कुटुंबात फुललेले हे रोपटे पुढे 1988 साली अकोले तालुक्यातील वाशेरे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आकार घेऊ लागले होते. मुळात वडिल शिक्षक असल्यामुळे त्यांच्या संस्काराची आणि हुशारीचे प्रमाण देण्यात अर्थ तरी काय! मात्र, सर्वगुणसंपन्न असणारा हा विद्यार्थी अगदी लहानपणापासून संघटन कौशल्यात अगदी तरबेज होता. तर पुढे 1993 सालात 5 वी ते 10 वीचे शिक्षण पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झाले. आता ज्याने नवोदय विद्यायात शिक्षण घेतले त्याच्या गुणवत्तेची उंची किती असते हे नव्याने सांगायला नको. तेथे देखील वक्तृत्व स्पर्धा आणि विविध कलागुणांमध्ये अजय नावाचा निनाद गुंजत होता.

पुढे खर्‍या अर्थाने त्यांनी ज्या मातीत जन्म घेतला तेथे त्यांच्या प्रगतीचे बीज रोवले गेले. म्हणजेच सन 1999 साली त्यांनी संगमनेरमध्ये कॉलेजात प्रवेश केला. आयुष्य सानिध्य आणि मैत्री किती महत्वपुर्ण आणि जिवणाला वळण देणारी असते याची प्रचिती अजय फटांगरे यांच्या आयुष्यातून लक्षात येईल. ते इयत्ता 12 वीत असताना त्यांची मैत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्याशी झाली. या माध्यामातून खर्‍या अर्थाने त्यांच्या रक्तात चळवळीचे बळ भरले गेले. काँग्रेसच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांनी राजकारणात नव्याने पाय रोवून जनमानसांच्या मनात अभेद्य असे स्थान निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. तेव्हा संगमनेरात एक संघटन म्हणून एनएसयुआय संघटना नावारुपाला आली होती. तेव्हापासून शिक्षकी ज्ञानाबरोबर सामाजिक विचारसारणीचे धडे गिरविण्याचे काम त्यांनी सुरू केले. यावेळी अ‍ॅडमिशन, स्कॉलशिप, कागदपत्रे काढून देणे असे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम सुरू केले. यातूनच प्रत्येकाच्या नजरेत अजय यांनी स्वत्ताची छबी तयार केली. नंतर सन 2001 साली त्यांनी आमृतवाहीनी कॉलेज येथे सिव्हील इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तेथे देखील त्यांच्यात निर्माण झालेला धडपड्या कार्यकर्ता शांत बसला नाही. समाज्यात जेथे अन्याय तेथे आवाज आणि न्यायासाठी बंड पुकारुन दंड थोपटण्याची वृत्ती त्यांच्यात अधिकच वृद्धींगत झाली. याचेच फळ म्हणून त्यांना एनएसयुआयचे शहराध्यक्ष पद मिळाले. त्यामुळे, एकीकडे विद्यार्थी तर दुसरीकडे पदाधिकारी यामुळे त्यांच्या पंखात इतके बळ भरले की, त्यांनी बघता-बघता अगदी ध्रुवतार्‍यासारखी तांबे आणि थोरात कुटुंबाच्या ह्रदयात जागा निर्माण केली.

पुढे सन 2006 साली राज्यात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकली. अजय फटांगरे तेव्हा अनेक युवकांच्या डोळ्यात सलून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले. त्यांनी स्वत:च्या कर्तुत्वाचा इतका ठसा उमटविला. की, तब्बल 2013 पर्यंत त्यांनी या पदाला स्पर्धक निर्माण होऊ दिला नाही. त्यानंतर 2014 साली जिल्हा युवक काँग्रेसची निवडणुक लागली होती. त्यावेळी त्यांनी मात्तब्बर राजकारणी विखे कुटुंबातील सुजय विखे यांना जोरदार टक्कर दिली. या प्रस्तापित नेत्याच्या विरोधात फटांगरे अवघ्या काही मतांनी पडले. मात्र, विजयापेक्षा फटांगरे यांच्या संघर्षमय लढतीची चर्चा जिल्हाभर रंगली होती. त्यावेळी ते युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष झाले. हा प्रगतीचा आलेख येथेच थांबला नाही. तर, फटांगरे हे नाव संगमनेर  पुरते मर्यादीत न राहता जिल्ह्यात त्यांच्या नावाची आणि दिलदार स्वभावाची चर्चा होऊ लागली होती. जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या फटांगरे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांचा देखील विश्वास संपादन केला. म्हणून तर पुढे सन 2017 साली जेव्हा अहदमनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तेव्हा देशात आणि राज्यात मोदी नावाचे वादळ वाहत होते. अगदी लोकसभेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत सत्ताबदल होऊ पाहत होती. अशावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी प्रथमत: पठार भागावरील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडली. अजय फटांगरे यांचा जनसंपर्क, त्यांच्याविषयी लोकांना वाटणारी आत्मियता आणि विश्वास हे नामदारांनी हेरले आणि मोठ्या विश्वासाने उमेदवारीची माळ फटांगरे यांच्या गळ्यात टाकली.

सन 2017 ची ती निवडणुक संगमनेर तालुक्याच्या इतिहासावर एक मोहर लावून गेली. काँग्रेसच्या विरोधात असणारा उमेदवार चारी मुंढ्या चित झाला. गेली कित्तेक वर्षानंतर पठार भागावरील बोटागटात काँग्रेसचा झेंडा मोेठा दिमाखात फडकला. अजय फटांगरे यांच्यावर विजयी वर्षाव झाला. दर्‍याखोर्‍यात जन्मलेल्या या लेकरावर तेथील आदिवासी, ओबीसी आणि 18 पगड जातीच्या लोकांनी भरभरुन प्रेम करीत त्यांना मिनी मंत्रालयात पाठविले. पुढे बाळासाहेब थोरात यांचा हात त्यांच्या डोक्यावर अगदी श्रीकृष्णासारखा राहिला. म्हणून तर अजय फटांगरे यांच्यासारखे व्यक्तीमत्व झेडपीत नावारुपाला आले. त्यांना कृषी व पशुसंवर्धन खाते मिळाले. तर यापलिकडे पठार भागासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे निवडून आलेल्या तालुक्यातील सर्व सदस्यांपैकी फटांगरे हे एकमेव सभापती झाले. ही जबाबदारी त्यांनी अगदी अभिमान वाटावा अशी पार पाडली. ते नुसते गरजलेच नाही. तर त्यांनी त्यांच्या गटासाठी तब्बल 36 कोटी रुपयांचा निधी आणूून पठार भागाचा उल्लेखनिय विकास केला.

 परंतु, दरम्यानच्या काळात नगर जिल्हात विखे आणि थोरात हा काँग्रेस वाद कायम चर्चेचा विषय ठरत राहिला. याच धकाधकीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि काँग्रेसचे सुजय विखे भाजपात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ विखे पाटलांनी लेकाच्या पावलावर पाऊल ठेवला आणि नकळत शालिनिताईंना काँग्रेसच्या झेडपी अध्यक्षपदाहून पायऊतार व्हावे लागले. अशावेळी झेडपीत फार विश्वासू मानसाची गरज होती. जो विखेंच्या गळाला लागणार नाही. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी अजय फटांगरे याच्यावर विश्वास दाखविला आणि व्हीप बजावण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. अर्थातच ते काँग्रेसचे गटनेते झाले. सन 2019 ते आज तागायत ते तेथे काँग्रेसचा झेंडा अटकेपार फडकविताना दिसत आहेत. आयुष्यात मानसे कमविण्याचे कौशल्य भल्याभल्यांना जमले नाही. ते फटांगरे यांनी अगदी पहिल्यापासून अंगीकारले आहे. तोडक्या यशाने आजवर अनेकजण हवेत गेले आणि लोप पावले, मात्र, इतके मोठे अस्तित्व निर्माण होऊन देखील त्यांचे पाय जमिनिवर आहे. आजही तालुक्यातील युवकांच्या मानात त्यांनी अगदी ध्रुवतार्‍यासारखे स्थान निर्माण केले असून असा तरुण नाही ज्याच्या पाठीवर त्यांना कौतुकाची थाप टाकली नाही. अशा या लोकाभिमूख नेत्यास उदंड आयुष्य लाभो.! हिच ईश्वर चरणी प्रार्थना...

- सुशांत पावसे

(संगमनेर)


टिप :- विशेषत: संगमनेर आणि अकोेले व नगर जिल्ह्याच्या क्राईम न्युज, सामाजिक व राजकीय विश्लेषण तसेच निर्भिड बातम्या वाचण्यासाठी ७०२०२९०२५७ या नंबरला आपल्याकडील गृपला जॉईन करुन घ्या.