खुनशी व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याहून दोन व्यापार्‍यांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी.! दोन जखमी 12 जणांवर गुन्हे.!

सावभौम (संगमनेर) :- 

                       व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याच्या कारणाहून संगमनेर शहरात रसाळ हॉस्पिटल समोर दोन गटात तुफान हाणामार्‍या झाल्याची घटना बुधवार दि. 21 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यात 12 जणांना आरोपी करण्यात आले असून दोघांना जबरी मार लागला आहे. एकाच्या चेहर्‍यावर तर दुसर्‍याच्या डोक्यात लाकडी दांड्याने मार लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अमित सुरेश राहतेकर (धंदा व्यापार, रा. इंदिरानगर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, राहतेकर यांनी त्यांच्या व्हाट्सअ‍ॅपला एक स्टेटसला ठेवले होते. अर्थात दोन मित्रांमध्ये मतभेद झाल्यानंतर हे स्टेटसचे उद्देशून प्रकार सुरू असल्याचे समोरच्या मित्राला वाटले. त्यानंतर त्याने अमित राहतेकर यांना गाठले व त्याच्या हातातील लाकडी दांड्याने चेहर्‍यावर मारुन जखमी केले. यावेळी काही मित्र सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी राहतेकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेे असता त्यांच्या जबाबानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात योगेश सोमनाथ पोगुल, त्यांची आई व पत्नी तसेच कल्पेश पोगुल, सोनु पोगुल अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तर योगेश सोमनाथ पोगुल (धंदा व्यापार, रा. इंदिरानगर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोगुल यांनी त्यांच्या व्हाट्सअ‍ॅपला काही स्टेटस ठेवले होते. ते कोणाला उद्देशून नव्हते. मात्र, आरोपी यांनी ते स्वत:वर ओढून घेत मनात रोष निमार्र्ण केला आणि त्याच कारणाहून अमित सुरेश राहतेकर याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने डोक्यात व चेहर्‍यावर मारुन जखमी केले. तसेच पोगुल यांना सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना समोरच्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी योगेश पोगुल यांना जबरी मारहाण झाल्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी जखमी अस्थेत असताना सात जणांच्या विरोधात जबाब दिले आहेत. ते नोंदून घेत पोलिसांनी याप्रकरणी अमित राहतेकर धिरज राहतेकर (दोघे. रा. इंदिरानगर, ता. संगमनेर) सुरज गाडे व अन्य चौघे अशा सात जणांना आरोपी करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सो.मीडियाचा विपर्यास नको.!

दरम्यान सोशल मीडियाचा वापर हा कशासाठी केला जावा आणि कशासाठी नाही. हे आता सुशिक्षितांना देखील संगण्याची गरज भासू लागली आहे. समोरासमोर मत व्यक्त करता येत नाही म्हणून लोक आजकाल व्हाट्सअ‍ॅप सारख्या वस्तुंचा वापर करीत आहेत. त्यातूनच असे प्रकार घडतात. त्यामुळे, पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, सोशल मीडियाचा गैरवापर करण्यापेक्षा जे काही चांगले आहे. ते आत्मसाद करा.

- संजय कवडे (पीएसआय, संगमनेर)