अकोल्यात ५३ पॉझिटीव्हा तर संगमनेरात २९ रुग्णांची भर.! धोका वाढताच.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज दि. ४ रोजी ५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर संगमेनर तालुक्यात आज दिवसभरात २९ रुग्णांचे भर पडली आहे. एकंदर विचार करता संगमनेरची कोविड आकडेवारी कमी होताना दिसते आहे. तर अकोल्यात ही आकडेवारी वाढती असल्याचे लक्षात येते. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही एक धोक्याची घंडा असण्याची शक्यता आहे. या गोष्टीला प्रत्येकाने गांभिर्याने घेतले पाहिजे. अन्यथा काल आपल्या सर्वांमध्ये उठबस करणारा सुरज आज काही क्षणात आपल्यातून मावळून गेला. त्यामुळे, सावध रहा सतर्क रहा, काळजी घ्या.!
आज अकोले तालुक्यात कोतूळ येथे ३५ वर्षीय महीला,४० वर्षीय पुरूष, कुंभेफळ येथे ४५ वर्षीय पुरूष, १५ वर्षीय तरूण, १८ वर्षीय तरुणी, ६० वर्षीय महीला, तांभोळ येथे ४० वर्षीय पुरूष, मेहंदुरी येथे ३० वर्षीय महीला, गणोरे येथे, ६३ वर्षीय पुरूष, पेंडशेत येथे ३२ वर्षीय महीला, विरगाव येथे ५० वर्षीय महीला, ३७ वर्षीय पुरूष, अंभोळ येथे २३ वर्षीय महीला, कोतूळ येथे ६९ वर्षीय महीला,६० वर्षीय पुरूष, हिवरगाव आंबरे येथे ४८ वर्षीय महीला, राजूर येथे ४४ वर्षीय पुरूष, शहारातील के.जी रोड परिसरात ५३ वर्षीय पुरूष, अकोले शहरातील ६० वर्षीय महीला, ४० वर्षीय महीला, २७ वर्षीय महीला, ४५ वर्षीय पुरुष, १२ वर्षीय तरुणी, तांभोळ येथे १२ वर्षीय तरुण, चितळवेढे येथे २४ वर्षीय महीला, कुंभेफळ येथे ५ वर्षीय मुलगा, मेहंदुरी येथील ६० वर्षीय पुरूष, ११ वर्षीय मुलगा, ५० वर्षीय महीला, ३३ वर्षीय महीला, नवलेवाडी येथील ४१ वर्षीय महीला, हिवरगाव आंबरे येथे ३५ वर्षीय पुरूष, ०५ वर्षीय मुलगा, चैतन्यपूर येथे १९ वर्षीय तरुण, कोदणी येथे ४० वर्षीय पुरूष, देवठाण येथे ७० वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महीला, २४ वर्षीय महीला, १२ वर्षीय तरुणी,१४ वर्षीय तरुणी, १२ वर्षीय तरुणी, विरगाव येथे ७० वर्षीय पुरूष, गणोरे येथे १४ वर्षीय तरुणी, पिंपळगाव खांड (शेरेवाडी) येथे ४५ वर्षीय पुरूष, १४ वर्षीय तरुण, ४८ वर्षीय महीला, ६० वर्षीय महीला, ३३ वर्षीय पुरूष, कोतुळ येथे ४६ वर्षीय महीला, ५२ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, २२ वर्षीय तरुण, अशा ५३ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १ गजार ६७३ इतकी झाली आहे.
संगमनेरात आज २९ रुग्णांची भर पडली आहे. चिकणी येथे ५० वर्षीय पुरुष, आश्वी खु येथे ५७ वर्षीय पुरुष, समनापुरात ५२ वर्षीय पुरुष, जामकीनगर येथे ७० वर्षीय पुरुष, घोडेकरमळा येथे ३० वर्षीय पुरुष, घुलेवाडीत १३ वर्षीय तरुण, 55 वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडीत ४१ वर्षीय पुरुष, पावबाकी रोड येथे ३५ व ३७ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे १८, १७ वर्षीय तरुण व ४०, ७८ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ४७ वर्षीय पुरुष, नान्नज दुमाला येथे ६५ वर्षीय महिला, जाखुरीत ४८ वर्षीय पुरुष, शिंदोडीत ३५ वर्षीय पुरुष, घुलेवाडीत पवार मळा संगमनेर येथे ७५ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ५० व ५१ वर्षीय पुरुष, निमगाव जाळीत ६२ वर्षीय पुरुष, कनोली येथे ४५ वर्षीय पुरुष, चिखलीत ५२ वर्षीय पुरुष, सुकेवाडीत ६१ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे ३३ वर्षीय पुरुष, कुरण रोड येथे २६ वर्षीय तरुण, भारत नगर येथे ४६ वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथे ४८ वर्षीय पुरुष अशा २९ जणांचे अहवाल आज रविवार दि. ४ रोजी पॉझिटीव्ह आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९३५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६० आणि अँटीजेन चाचणीत ३२७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५०, अकोले १६, जामखेड ०१, कोपरगाव ०२,नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०१, पाथर्डी ०५, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ११, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३३, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण २१, नेवासा ०६, पारनेर ०६, पाथर्डी ०२, राहाता ३३, राहुरी ११, संगमनेर १५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३२७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १२, अकोले २२, जामखेड ४६ कर्जत ३६, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १०, नेवासा ०२, पारनेर ०५, पाथर्डी ४१, राहाता ०७, संगमनेर २२, शेवगाव ३८, श्रीगोंदा ५१, श्रीरामपूर २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ३५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ५०, अकोले ३०, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २३, नेवासा १५, पारनेर ०८, पाथर्डी ३४, राहाता ३८, राहुरी ०७, संगमनेर ३८, शेवगाव २४, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेली रुग्ण संख्या ४१ हजार ४३३ असून उपचार सुरू असलेले रूग्ण ३ हजार ९३५ आहे. तर एकूण रूग्ण संख्या:४६ हजार १०४ इतकी आहे.