अकोल्यात एका पाठोपोठ 2 बळी, 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह.!


सार्वभौम (अकोले) : - 

              अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर कायम दिसून येत आहे. आजकाल बाधितांच्या सरासरात मयतांची संख्या देखील वाढती असल्याचे दिसते आहे. आज शनिवारी दि. ३ रोजी अकोले तालुक्यात ४४ रुग्ण कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. आज रॉपीड ॲन्टीजन टेस्टमध्ये २६ तर खाजगी ०५ सह ३१ व्यक्ती पॅाझिटीव्ह व्यक्ती मिळून आल्या आहेत. तर काल शुक्रवार दि. 2 रोजी कोतुळ येथील एका महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तर आज सकाळी अकोले शहरातील कारखाना रोड परिसरातील ३७ वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजवर कोरोनाचे २३ बळी गेले आहेत. तर आज रात्री नगरहून १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात गणोरे येथे ६३ वर्षीय पुरुष,  मेहेंदुरी येथे ३० वर्षीय महिला,  कुंभेफळ येथे ६० वर्षाय महिला, ४५ वर्षीय पुरुष, १५ वर्षीय तरुण व १८ वर्षीय तरुणी, तांबोळ येथे ४० वर्षीय पुरुष, मोग्रस येथे ३२ वर्षीय पुरुष, कोतुळ येथे ४०, ३५, ४६  व ४४ वर्षीय पुरुष, सातेवाडीत ६६ वर्षीय पुरुष, असे ४४ रुग्ण कोरोना बाधीत आले आहे.

     तर आज शनिवार दि. 3 रोजी तालुक्यात मवेशी  येथे ८२ वर्षीय पुरूष, राजूर येथे २३ वर्षीय पुरूष, शेंडी येथे ५१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महीला, केळी येथे ३२ वर्षीय महीला, देवठाण येथे २० वर्षीय तरुण, १० वर्षीय मुलगा, ०९ वर्षीय मुलगा, ४१ वर्षीय महीला, १४ वर्षीय तरुणी, १६ वर्षीय तरुणी, ४२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरुष, कोतुळ येथे २२ वर्षीय महीला,३३ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला,१४ वर्षीय तरुण, पिंपळगाव खांड(शेरेवाडी) येथे २० वर्षीय महीला, ५० वर्षीय महीला, १२ वर्षीय युवती, ४५ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महीला, २० वर्षीय महीला, ५४ वर्षीय पुरूष, शहरातील कारखाना रोडवरील ४५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथे ३५ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, पिंपळगाव खांड (शेरेवाडी) येथे ५६ वर्षीय पुरूष, बलठण येथे ४५ वर्षीय पुरूष, अशा ४४ व्यक्तीचे अहवाल पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १ हजार ६३३ झाली आहे.

       तर आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२३७ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०४,  राहाता ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ७५८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १७०, अकोले ३३, जामखेड २९, कर्जत २२,  कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ८०, नेवासा ४९, पारनेर ३३, पाथर्डी ४१, राहाता ४४, राहुरी २४, संगमनेर ६३, शेवगाव ४०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ४१ हजार ०७५ इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण ३ हजार २३७ इतके आहे. तसेच आजवर एकूण रूग्ण संख्या ४५ हजार ०३९ इतकी आहे.