अकोले तालुक्यात १ हजार ९२६ तर संगमनेरात ४२ नवे रुग्ण.!
सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-
संगमनेर मध्ये आज पुन्हा 42 रुग्ण नव्याने कोरोना बाधीत आढळुन आले आहे. यामध्ये शहरातील 14 तर तालुक्यातील 28 रुग्ण आढळुन आले. आज शहरालगत असलेले वसंतलॉन्स येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. संगमनेर मध्ये ऑगस्ट महिन्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता स्व. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व ना. थोरात यांच्या सहकार्याने दि.6 सप्टेंबर रोजी वसंत लॉन्स येथे 170 बेडचे भव्य कोविड सेंटर उभारण्यात आले. या 37 दिवसात तब्बल 782 रुग्णांनी मोफत उपचार घेतला तर 759 रुग्ण येथून ठणठणीत होऊन घरी परतले. मात्र 23 रुग्ण पुढील उपचारासाठी येथुन हलवण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने हे कोविड सेंटर संगमनेरकरांसाठी दिलासा देणारे ठरले.संगमनेरकरांसाठी संजीवनी ठरलेल्या वसंतलॉन्स कोविड सेंटर आज बंद करण्यात आले आहे.
आज संगमनेर मध्ये शहरातील मालादड रोड येथे 64 वर्षीय व 47 वर्षीय पुरुष तर निर्मलनगर येथे 67 वर्षीय महिला व रेहमतनगर येथे 66 वर्षीय महिला तर इंदिरानगर येथे 59 वर्षीय महिला व गणेशनगर येथे 58 वर्षीय महिला व 28 वर्षीय युवक तर जनतानगर येथे 52 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय युवक तर 48 वर्षीय महिला व 17 वर्षीय युवती तर संगमनेर येथे 22 वर्षीय युवक 40 व 27 वर्षीय पुरुष तर तालुक्यात आज ओझर खुर्द येथे 28 वर्षीय पुरुष तर बोटा येथे 32 वर्षीय पुरुष व भोजदरी येथे 45 वर्षीय महिला व 50 वर्षीय पुरुष तर कुरकूटवाडी येथे 40 वर्षीय महिला व झोळे येथे 43 वर्षीय महिला तर चंदनापुरी येथे 32 वर्षीय पुरुष व अंबिखालसा येथे 21 वर्षीय युवती व 1वर्षाची मुलगी आणि 30 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला तर भोजदरी येथे 67 वर्षीय महिला तर पिंपळे येथे 55 वर्षीय महिला व डीग्रस येथे 35 वर्षीय पुरुष तर कोळवाडे येथे 23 वर्षीय युवक व 45 वर्षीय महिला तर गुंजळवाडी येथे 36 वर्षीय पुरुष घुलेवाडी येथे 39 वर्षीय पुरुष व वरुडी पठार येथे 47 वर्षीय पुरुष तर निमगाव जाळी येथे 58 वर्षीय पुरुष व घुलेवाडी येथे 21 वर्षीय युवती तर राजापूर येथे 38 वर्षीय पुरुष व पिंपळगाव कोंझिरा येथे 73 वर्षीय वयोवृद्ध तर सारोळे पठार येथे 70 वर्षीय वयोवृद्ध व राजापूर येथे 20 वर्षीय युवक व हिवरगाव पावसा येथे 22 वर्षीय युवक अशा 42 जणांना बाधा झाली आहे.
तर अकोले तालुक्यात आज मंगळवार दि. १३ रोजी खानापुर कोविड सेंटर येथून ३२ व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी अहमदनगर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपीड अँन्टीजन टेस्टमध्ये १० व खाजगी प्रयोगशाळेत ०३ अशी १३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
त्यात लिंगदेव येथे ४२ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष ,२१ वर्षीय तरुण, ३९ वर्षीय महीला, अवघ्या ६ वर्षाचा बालक, पिंपळगाव खांड येथे २६ वर्षीय तरुण, बेलापूर येथे १४ वर्षीय मुलगा, डोंगरगाव येथे ८४ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महीला, देवठाण येथे ५० वर्षीय पुरूष, अशी १० व्यक्ती व खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात धुमाळवाडी येथे २८ वर्षीय महीला, पिंपळदरी येथे ४७ वर्षीय पुरूष, हिवरगाव आंबरे येथे ४५ वर्षीय पुरूष, अशा ०३ व्यक्तीचा मिळून एकूण १३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, अकोले तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १ हजार ९२६ झाली आहे. तर दिवसेंदिवस ही आकडेवारी कमी होत चालली असून तालुक्यासाठी ही एक महत्वाची बाब आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२९० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २२१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, जामखेड ०४, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०८, पारनेर ०२, श्रीगोंदा २१, मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ६३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३०, अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी ०२, संगमनेर ०१, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०५, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २२१ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा २७, अकोले १०, जामखेड १९, कर्जत १९, कोपरगाव १३,नगर ग्रामीण ०२, नेवासा १७, पारनेर १४, पाथर्डी २१, राहाता १३, राहुरी ०२, संगमनेर २८, शेवगाव १३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले ३१, जामखेड ३६, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रा. २७, नेवासा १२, पारनेर २२, पाथर्डी ४५, राहाता ५४, राहुरी ०९, संगमनेर ३३, शेवगाव २५, श्रीगोंदा ३२, श्रीरामपूर १४, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल १७ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेली रुग्ण संख्या ४७ हजार २९६ इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ३ हजार २९० इतकी आहे. तर आजवर मृत्यू झालेले रुग्ण ७८९ असून एकूण रूग्ण संख्या ५१ हजार ३७५ इतकी झाली आहे.