संगमनेरात महिलांमध्ये प्रादुर्भाव वाढला.! आज ७२ रुग्णांची भर पैकी ३५ महिलांचा सामावेश.! अकोल्यात १० रुग्णांची भर.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात कोरोनाचे काल ३० रुग्ण मिळून आले होेते. तर आज पुन्हा ७२ रुग्ण मिळून आले आहेत. तर आज विशेष म्हणजे संगमनेरात ७२ पैकी ३५ महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. म्हणजे कालपर्यंत वृद्ध व बालक कोरोनाची शिकार होते. आता मात्र महिलांचे प्रमाण वाढत आहे. हे असे असले तरी बाधितांच्या सरासरीत येथे मृत्युचे प्रमाण अटोक्यात आणताना प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे, संगमनेरसाठी चे सर्वात मोठे समाधान आहे.
संगमनेर तालुक्यात आज ७२ जण पॉझिटीव्ह आले आहेत. यात कौठे मलकापूर येथे ३२ व ६१ वर्षीय पुरुष, चंदनापुरीत ३९ व ४३ वर्षीय पुरुष तर ४२ व १९ महिला, सुकेवाडीत ३६ वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथे ४१ वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथे ४९ वर्षीय महिला, वडगाव पान येथे ६८ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत १० व ५ वर्षीय बालिका, आश्वी खुर्द येथे ४२ व ६५ वर्षीय महिला, चनेगाव येथे २७ वर्षीय महिला, देव कौठे येथे ३६ वर्षीय पुरुष, घुलेवाडीत ४२ वर्षीय पुरुष, व ५८ व ६० वर्षीय महिला, मंगळापूर येथे ४० व २६ वर्षीय महिला, मोमिनपुरा येथे ४३ वर्षीय पुरुष, मालदाड गाव येथे ५२ वर्षीय पुरुष, व ५१ वर्षीय महिला, घुलेवाडीत ५० वर्षीय महिला, चिखलीत ५४ वर्षीय महिला, नविन नगररोड येथे ३१ वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे ४८ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे ६० वर्षीय पुरुष, नविन नगर रोड येथे ६४ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे १६ वर्षीय युवती, चिंचोली गुरव येथे ५२ वर्षीय पुरुष, कनोलीत ४० वर्षीय महिला, रहिमपुर येथे ४० वर्षीय पुरुष, चिंचपुरात ९० वर्षीय पुरुष, मनोलीत २७ वर्षीय व २७ व २५ वर्षीय पुरुष, निमगाव जाळीत ४१ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ३० वर्षीय पुरुष, चिखलीत ५८ वर्षीय पुरुष, खराडीत ५० वर्षीय महिला, इंदिरा नगर येथे ६५ वर्षीय पुरुष व ५४ वर्षीय महिला, जांबुत खुर्द येथे ४९ वर्षीय पुरुष, कुककुटवाडीत ३८ वर्षीय महिला, चंदनापुरीत ३५ वर्षीय महिला, केळेवाडीत ४४ वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे ४८ वर्षीय महिला, चिकणीत ३४ वर्षीय पुरुष, साकुर येथे ४८ वर्षीय महिला, घारगावात ४० वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत ४६ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे १९ व २० वर्षीय युवती, निमोण येथे ५२ वर्षीय महिला व १० वर्षीय मुलगा, चिखलीत ४० वर्षीय महिला, निमगाव जाळीत ६० वर्षीय महिला, साकूर ७० वर्षीय पुरुष, घुलेवाडीत ४२ वर्षीय महिला व २९ वर्षीय तरुण, चिखलीत ४८ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय तरुण, १८ व १६ वर्षीय मुले, देवगाव ४८ वर्षीय पुरुष, वाघापुर येथे २७ वर्षीय तरुण, स्वामी समर्थ नगर येथे ३१ वर्षीय महिला व ७ वर्षाचा मुलगा, खराडीत १७ वर्षीय युवक व ४५ वर्षीय महिला अशा ७२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर काल मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२० रोजी संगमनेरात ३० रुग्ण मिळून आले होते. त्यात घुलेवाडी येथे २९ वर्षीय महिला तर सुकेवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष व राजापूर येथे ७ वर्षीय बालक तर कसारा दुमाला येथे ४० वर्षीय महिला व पिंपळगाव देपा येथे ७० वर्षीय वयोवृद्ध तर ६५ वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय व ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. रायते येथे ७० वर्षीय वयोवृद्ध व ६० वर्षीय महिला आणि १३ व ११ वर्षीय युवतीस कोरोनाची बाधा झाली आहे. तर साकुर येथे ७० वर्षीय व ४२ वर्षीय पुरुष व ११ वर्षीय युवकास तर राजापुर येथे ५८ वर्षीय पुरुष व घुलेवाडी येथे ६२ वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडी येथे ८० वर्षीय वयोवृद्धास तर शहरातील गांधी चौक येथे ४३ वर्षीय पुरुष व मंगळापूर येथे ३० वर्षीय पुरुष तर कोल्हेवाडी येथे ३९ वर्षीय पुरुष व कौठेधांदरफळ येथे ५५वर्षीय पुरुष तर तळेगाव दिघे येथे ३७ वर्षीय पुरुष व बोरबन येथे ६७ वर्षीय महिला व धांदरफळ खुर्द येथे ५१ वर्षीय पुरुष व बोटा येथे ५० वर्षीय महिला व शिवाजीनगर येथे ५४ वर्षीय पुरुष तर तळेगाव दिघे येथे ५० वर्षीय पुरुष व शहरातील गणेश नगर येथे ६७ वर्षीय पुरुष व रेहमतनगर येथे ३० वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाली होती. तर आज नव्याने ७२ जणांची भर पडली आहे. त्यामुळे सरासरीत दोन दिवसात येथे १०० रुग्ण मिळून येऊ लागले आहेत.
अकोले तालुक्यात काल दिवसभरात ०७ रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होते. काल रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये समशेरपुर येथील, ४० वर्षीय पुरूष, मिळून आला होता तर आज येथे ३६ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह मिळून आली आहे. तर काल वाघापूर येथे ७२ वर्षीय पुरूष, कोतुळ येथे ३० वर्षीय पुरूष, गर्दणी येथे ३२ वर्षीय पुरूष, चितळवेढे येथे ७० वर्षीय महीला, कळस बु येथे ३४ वर्षीय महीला, ३१ वर्षीय पुरूष, अशा ०७ व्यक्तीचा अहवाल काल पॅाझिटीव्ह आल्या होत्या. तर आज समशेरपूर येथे ३६ वर्षीय महिला मिळून आली आहे. तर राजुर येथे 60 वर्षीय पुरुष तर वाशेरे येथे 40 वर्षीय पुरुष व शिवाजी चौक येथे 37 वर्षीय पुरुष तर राजुर येथे 40 वर्षीय पुरुष तर रुंभोडी येथे अहवालात जी 53 वर्षीय महिला दाखविली आहे. ती निळवंडे येथील रहिवासी आहे. रुंभोडीत कोणताही रुग्ण नाही. (मात्र, सरकारी अहवालात रुंभोडी असा उल्लेख असून तो चूक आहे.) तर अंभोळ येथे 47 वर्षीय पुरुष तर टाहकरी येथे 36 वर्षीय महिला व राजुर येथे 54 वर्षीय पुरुष लिंगदेव येथे 30 वर्षीय पुरुष आशा 10 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात महत्वाची बाब अशी की, अकोले तालुक्यात आता रॅपीड अँन्टीजन टेस्टच्या किट शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे, आज आणि काल तालुक्यात कोरोना तपासणीच्या चाचण्या होऊ शकल्या नाही. जे काही स्वॅब घेतले आहेत ते नगरला पाठविले असून त्यांचे रिपोर्ट लवकर मिळत नाही. त्यामुळे एकीकडे सरकार आणि जिल्हाधिकारी म्हणतात रॅपीड अँन्टीजनच्या टेस्ट वाढवा आणि दुसरीकडे कीटचा परवाठा केला जात नाही. त्यामुळे, ही दिरंगाई तालुक्यासाठी महागात पडू शकते. याकडे लोकप्रतिनिधी व समाजसेवक यांनी लक्ष दिले पाहिजे.
- सुशांत पावसे.