अकोले कॉलेजमध्ये कोरोनाचे अॅडमिशन! प्राचार्य पॉझिटीव्ह! अकोल्या पुन्हा 11 रुग्णांची भर.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात कोरोना शहरापासून तर दरी खार्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. इतकेच काय! सरकारी कार्यालयांपासून तर आता शाळा महाविद्यालयात देखील त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे, एकीकडे सरकार शाळा सुरु करण्याचा विचार करीत आहेत, तर काही ठिकाणी मुख्याध्यापक तर काही ठिकाणी प्राचार्यच पॉझिटीव्ह आढळून येऊ लागले आहे. अर्थात हे लोक खर्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. कारण, तमाम विद्यार्थ्यांना घर बसल्या शिकवण देणे तर काही ठिकाणी किचकट अॅडमिशन प्रोसेस पुर्ण करण्याचे काम हे गुरुवर्य करीत आहेत. त्यामुळे, त्यांच्या कार्याला खर्या अर्थाने सलाम केला पाहिजे. मात्र, आता जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. ज्यांना काही सिमटन्स वाटत असेल तर त्यांनी स्वत:हून तपासणी केली पाहिजे, तर ज्यांना शंका असेल त्यांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतले पाहिजे. सध्या प्राचार्यांच्या संपर्कात जे कर्मचारी आले होते त्यापैकी आठ जणांचे स्वॅब घेऊन ते जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर प्रादुर्भाव किती व कसा झाले हे समोर येणार आहे.
तर आज गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी अकोले तालुक्यात 11 रुग्णसंख्या मिळून आली आहे. त्यात राजूूर येथे घेण्यात आलेेल्या रॅपीड अॅन्टीजन टेस्टमध्ये पाडाळणे येथे 17 वर्षीय तरुणी, 26 वर्षीय तरुण, 75 वर्षीय तरुण, शेंडी येथे 25 वर्षीय तरुण, अकोले शहरात शाहुनगर येथे 32 वर्षीय तरुण, टाहाकारी येथे 21 वर्षीय तरुण, 45 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय तरुणी, समशेरपूर येथे, 55 वर्षीय पुरुष 36 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 80 वर्षीय महिला अशा 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर कॉलेजवरील ज्या आठ जणांचे रिपोर्ट जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट परवा सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर काल पाठविलेले रिपोर्ट अद्याप पेंडींग आहेत. कॉलेजच्या प्राचार्यांचा मुलगा पुण्यात असताना तो पॉझिटीव्ह आला होता. त्यांनतर संगमनेर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळात मुलामुळे आईला आणि नंतर वडीलांना म्हणजे प्राचार्य महोदयांना बाधा झाली आहे. आता त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्यामुळे त्यांच्यात मोठे घबराहटीचे वातावरण आहे. मात्र, कोरोना फार रौद्र प्रकार नाही तर किरकोळ आहे. फक्त त्यास धैर्याने सामोरे गेले तर व्यक्ती काही तास आणि दिवसात बरा होतो. त्यामुळे, कोणी काळजी करण्याची गरज नाही. परंतु दक्षता घेणे अनिवार्य आहे.
जसजसे कोरोनाचे सावट वाढत चालले आहे. तसतसे प्रशासनाचे काम वाढत असल्याचे दिसते आहे. जोवर टेस्ट वाढत नाही तोवर रुग्ण सापडत नाहीत आणि रुग्ण संपत नाही तोवर कोरोना हद्दपार होत नाही. मात्र, राज्यात काही ठिकाणी कोरोनाची आकडेवारी वाढू नये यासाठी टेस्टचे प्रमाण कमी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, राजकारण उभे करण्यासाठी कोरोनाला घरात दडपविण्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. त्याचा तोटा म्हणजे बाधितांचे प्रमाण आणि मृत्युदर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे, अकोल्यात लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी रॅपीड अॅन्टीजनच्या टेस्ट जास्तीत जास्त कशा होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मृत्युदर कमी होणार आहे. अर्थात अकोले तालुक्यात तहसिलदार मुकेश कांबळे आणि आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे तसेच शाम शेटे यांच्यासह प्रशासनाचे नियोजन उत्तम आहे. त्यामुळे, येथे कोरोनाचा अतिरेक कधी पहावयास मिळाला नाही. मात्र, वेळोवेळी तपासणी किट उपलब्ध करुन करु देणे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. अजित नवले यांनी अकोल्यात कोरोना तपासणीची सुसज्ज लॅब व्हावी अशी मागणी केली आहे. तर त्यानंतर रिपाईचे राजू गावंदे व सामजसेवक तात्यसाहेब देशमुख यांनी देखील त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या महत्वपुर्ण गरजा तालुक्याला मिळाव्यात यासाठी कोणी फारसे अग्रही नसल्याचे दिसते आहे. मात्र, तालुक्यात समाजकारण कमी आणि द्वेषाचे राजकारण व ऊणीधुणी करण्यात लोक माहिर झाल्याचे दिसू लागले आहे.