पोटात लाथ मारली म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर गुन्हा दाखल.! राजकीय झोडाझोडी.! काय आहे खरं प्रकरण!

सार्वभौम (अकोले) :-

                         अकोले तालुक्यातील खडकी येथे पायी जाणार्‍या एका व्यक्तीला पोटात लाथ मारुन अकोेले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शिवीगाळ दमदाटी केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज गुरूवार दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याने गावातील दोघांना घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले व त्यानंतर राजूर पोलीस ठाण्यात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर त्यांच्यावर टिकेची झोड उठू लागली आहे. दरम्यान याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे. तर डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. किरण लहामटे हे आज दुपारी त्यांच्या लव्हाळी या गावी चालले असता एक व्यक्ती मध्यभागातून चालला होता. मात्र, त्याला चुकवून डॉक्टरांची गाडी पुढे निघाली असता या व्यक्तीने त्यास जोराचा आवाज दिला. तुला गाडी हळू चालविता येत नाही का? त्यानंतर डॉक्टरांची गाडी पुढे जाऊन थांबली. ते खाली उतरले आणि म्हणाले तुला माहित आहे का? मी कोण आहे! त्यानंतर तो म्हणाला मला नाही माहित ही आमदाराची गाडी आहे. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाला व डॉक्टरांनी त्यास शिवागाळ, दामदाटी करुन त्यांच्या छातीत लाथ मारली व ते निघून गेले. असे संबंधित फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे, लोकभावनेतून निवडून गेलेले आमदार अशा पद्धतीने कोणाला मारहाण करीत असतील तर ते मात्र, चुकीचे आहे.

तर या व्यतिरिक्त तेथील काही स्थानिक व्यक्तींशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती हा पिण्याचा प्रचंड शौकीन आहे. तसेही पिणार्‍यांनी ढोसल्यानंतर त्यांना महामार्ग कमी पडतात, त्यामुळे हा तर ग्रामीण भाग आहे. तेथे रस्ता अरुंद आहेत. हे महाशय त्यांच्या तालात चालले होते. त्यामुळे ते गाडीवर आले असते म्हणून आमदारांची गाडी त्याच्या जवळून गेली. मात्र, त्याने आवाज दिल्यानंतर ते थांबले व दोघांमध्ये चर्चा झाली. आता कितीही कट्टर विरोधक असुद्या. उदा. राहुल गांधी यांनी देखील परदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागात जर एखाद्याला अचानक आमदार भेटले तर तो त्यांच्याशी प्रेमाणे सल्लामसलत करील की थेट शिवीगाळ द्यायला सुरूवात करेल? आणि जरी लाथ मारली तरी ती खरोखर छातीपर्यंत पोहचेल का? असा प्रश्न उपस्थित होतो.

मात्र, यातील दुर्दैव असे की, हे महाशय गावात गेल्यानंतर त्याला फुस लावणारे दोघेजण भेटले. आमदार तुझ्याशी भांडला असे म्हणत त्यांनी संबंधित व्यक्तीला भरी घातले. हे मजेदार गंमत अशी की, गुन्हा गुरुवारी दुपारी घडल्यानंतर आपल्यावर अन्याय झाला आहे. हे या बहाद्दराला शुक्रवार सुद आल्यानंतर कळले. त्याचे कारण असे की, जर त्याच दिसशी यांची डांगडौैल पोलीस ठाण्यात उघड झाली असती तर हा गुन्हा राहिला बाजुला. पोलिसांनी याच्यावर गुन्हा ठोकला असता. मात्र, 24 तास उलटल्यानंतर त्याने गुन्हा दाखल करण्याचा घाट घातला आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याच्यासह तिघांनी थेट राजूर पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन याने घडलेला प्रकार त्याच्या सांगितल्या शिकविल्या पद्धतीने कथन केला. मग काय! पोलीस-पोलीस असतात. त्यांना कायद्यापुढे सगळे समान असते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

आता हा गुन्हा अगदी सरळ-सरळ वाटतो आहे. मात्र, याच्यामागे भलतेच राजकारण दडले आहे. दुर्दैवाने याच राजूर परिसरात अनेक घरांमध्ये दोन वेळचे अन्न मिळत नाही. तेव्हा कोणी रेशन बाबत आवाज उठवत नाही. गावोगावी कोविडची सुविधा नाही, तेव्हा कोणाला तक्रार करु वाटत नाही, येथील लाखो रुपयांचे धान्य अगदी काल परवा सगळ्यांच्या डोळ्यादेखत काळ्या बाजारात गेले. तेव्हा येथील लोकांमधील जागरुकता दिसून आली नाही. आपली माय भगिनी काल परवा उपचाराविना तीची प्रसुती झाली. त्यामुळे येथील आरोग्यावर कोणी तक्रार करायला तयार नाही. परंतु कोणीतरी भरी घातले आणि लगेच गुन्हा दाखल करायला पुढे सरसावले. हे कोणाच्या सदसद विविक बुद्धीला पटेल? जो आमदार लोकांच्या भावनेतून निवडून आला आहे. ज्याच्या घरात कोणी मयत झाले तर तो दरावर जायचे चुकवत नाही, भलेही तो पैशाने बक्कळ नसुद्या, मात्र रोज तालुक्याचे पायपिट करतो आहे. असा लोकाभिमूख माणूस कोणाच्या पोटात लाथ मारेल! हीच बाब अविश्वसनिय आहे. यापुर्वी देखील सेम अशीच एक तक्रार सोशल मीडियावर आली होती, जायला रस्ता दिला नाही म्हणून लाथ मारली. अर्थात हे बालबोध कारणे तालुक्यातील जनतेने कमी केले पाहिजे. आमदार साहेब! आमच्या गावाला पाणी द्या म्हणून त्यांचे रस्ते आडविले पाहिजे, आमदार साहेब आमच्या मुलाला होस्टेलची व्यवस्था करा असे म्हणत त्याचा रस्ता अडविला पाहिजे. आमदार साहेब आमच्या गावात रस्ता करा, आरोग्याची सोय करा, शाळा बांधा, वाचनालये उभी करा अशा प्रकारच्या तक्रारी केल्या पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तालुक्यातील पुरोगामी विचार नाहीसे होऊन येथे प्रत्येकात रिशीचे राजकारण पेटले आहे. एकदा सत्ता बदल झाला काय आणि येथील व्यवस्था बिघडली काय! हे फार मोठे दुर्दैव आहे. मात्र, सत्ता आणि पदे येतील आणि जातील. मात्र, या सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात जी आजवर संस्कृती वाढली आहे. तिला कोठे गालबोट लागणार नाही. याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे मत तालुक्यातील जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.

अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या वर झालेल्या खोट्या गुन्हाचा मी प्रथमतः या अकोले तालुक्याचा नागरीक म्हणून आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निषेध करतो.आमदार डाॅ.किरण लहामटे यांची जी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे लोक करत आहेत. हा पराभव न पचल्याचे लक्षण आहे. आमदार लहामटे अतिशय नम्र स्वभावाचा माणूस असून जाणीवपूर्वक आपली एकहाती आमदारकी गमावली म्हणून जळफळाट झाला असेल ना त्यांनी चाळीस वर्षात समाजहिताची कामे केली असती तर आमदार लहामटे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची वेळ पडली नसती. आजकाल लोकांना आमदार लहामटे यांचा तापट स्वभाव दिसतो पण त्यामागे लपलेली प्रेमाची, भविष्याचा, दुरदृष्टीकोन असलेली नजर दिसत नाही. ज्यांना उभ्या आयुष्यात ऐवढ मतदान मिळाल नाही, चाळीस वर्ष एकहाती सत्ता, मंञीपद असलेल्या घराण्याला एका मास्तराच्या पोरानं आपला पराभव करावा, ते ही जनमतानं, त्यामुळे हे होणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नेते यांनी गृहीत धरलेल आहे. चाळीस वर्षात ज्यांच्या गाडीची काच खाली होत नव्हती त्यांना आज एक वर्षात काच खाली करुन हात करत रस्त्यान चालावे लागत या पेक्षा दुर्दैव काय असू शकतं, अंहकार आणि खोटी सहानभूती काही कामाची नसणार आहे. ज्यांनी हजारो कार्यकर्त्यांचे गंभीर गुन्हे पचवण्यास मदत केली आज ते आमदार लहामटे यांच्यावर गुन्हे दाखल करुन बदनामी करण्यास मदत करत आहे. यापेक्षा केविलवाणा प्रकार कोणता असू शकतो.आमदार डाॅ.किरण लहामटे हे झालेल्या प्रकाराला सामोरे जातीलच पण या ते विरोधकांनी खालची पातळीचे राजकारण करु नये.  अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल.

 - भाऊसाहेब साळवे, अकोले

हा जो प्रकार घडला आहे. तो केवळ द्वेष भावनेतून घडवून आणला आहे. यातून आमदार साहेब बदनाम कसे होती. यासाठी तक्कारदाराला भरी घातले आहे. तसेही राजूर परिसरात दारुबंदी आहे. ते येथे दारू येते तरी कोठून याचा देखील शोध घेतला पाहिजे. एका लोकाभिमूख आमदाराला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा घाट कोणी घातला आहे. याची चौकशी झाली पाहिजे. एक दिवस झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे किती नियोजपुर्वक हा प्रकार घडवून आणला आहे. मात्र, जनतेला वास्तव काय आहे ते माहित आहे. त्यामुळे, लोक अशा दिशाभूल करणार्‍या राजकारणाला बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. घडलेल्या प्ररकाराचा मी जाहिर निषेध करतो.

- चंद्रभान नवले (राष्ट्रवादी खजिनदार)

सागर  शिंदे


============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 430 दिवसात 740 लेखांचे 94 लाख वाचक)