बाप रे.! अकोले तालुक्यात पुन्हा सामुहिक बलात्कार.! अल्पवयीन मुलगी गरोदर, एकास अटक, दोघे पसार.!

सार्वभौम (अकोले) :- 

                             अकोले तालुक्यात गेल्या वर्षभरात 14 ते 16 गुन्हे तर राजूर पोलीस ठाण्यात सहा ते सात असे सरासरी 25 अत्याचाराचे गुन्हे अवघ्या वर्षभरात दाखल झाले आहेत. त्यामुळे, येथे चाईल्ड लाईन आणि बालकांच्या समस्यांवर काम करणारे नेमकी काय काम करतात? हा प्रश्न आता पुढे आला आहे. काल पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गर्भवती मुलगी पालकांच्या ताब्यात आहे. यात अकोले पोलिसांनी मोठ्या शातीर पद्धतीने एका आरोपीस यवतमाळ येथून अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना देखील बेड्या ठोकण्यात आम्हला यश येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी दिली आहे. तर या गुन्ह्यात सामुहीक अत्याचाराचे कमल लावण्यात आले आहेत. तर पीडितेच्या स्टेटमेंट संदिग्ध आहेत. त्यामुळे, डिएनए आणि अन्य तापास केल्यानंतर यातील कलमे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपुर्वी खानापूर येथे एका मतिमंद मुलीवर सामुहीक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गर्दनी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन ती गर्भवती राहिली होती. याच परिसरात शेळ्या चारण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी रानात गेली असता कारखाण्यात कामाला असणार्‍या एका व्यक्तीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या परिसरातील घटना अजून ताज्या असताना आता टाकळी ते गर्दणी येथील डोगराच्या मध्यावर एका अल्पवयीन मुलीवर सामुहीक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

                           याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील टाकळी व गर्दनी यांच्या दरम्यान डोंगराच्या पोटाला एक विटभट्टी आहे. त्यावर राहता तालुक्यातील केलवड परिसरातून एक कुटुंब तेथे रोजीरोटीसाठी आले होते. मात्र, याच दरम्याने येथे अन्य काही तरुण आणि काही कारागिर देखील होते. यातील तिघांना मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन अवघ्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केले. ही प्रकार फेब्रुवारी 2020 मध्ये घडला होता. त्यानंतर हे कुटुंब त्यांच्या गावी निघून गेले. त्यानंतर तिकडे मुलीचे पोट अचानक दुखू लागले, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान ही अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, हा प्रकार अचानक कसा घडला हे कोणालाच कळेनासे झाले तर मुलगी देखील कोणालाच काही संगण्यास तयार नव्हती. त्यानंतर, हा प्रकार थेट राहाता पोलीस ठाण्यात गेला. तेथे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होते.

                  हा गुन्हा अकोले पोलीस ठाण्याच्या हाद्दीत घडल्यामुळे तो शुन्य क्रमांकाने अकोल्याला वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर इकडे गुन्ह्याची नोंद होताच अप्पर पोलीस अधिक्षक पोलीस  दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोषन पंडीत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी मुलीचे समुपदेशन केले. यात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. हा गुन्हा करणारा पहिला व्यक्ती हा प्रविण उर्फ अजित लक्ष्मण भोर (वय 25, रा. कोलुरा, ता, दिग्रस, जि. यवतमाळ) हा असल्याचे लक्षात येताच जोंधळे यांनी क्षणाचाही विलंब न करता एक विशेष पथक तयार करुन थेट यवतमाळ येथे रवाणा केला. या पथकाने त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडत अवघ्या 24 तासाच्या आत त्यास बेड्या ठोकल्या. तर आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अर्थात अकोले पोलिसांची आता अत्याचाराच्या गुन्ह्यात पीएचडी झाली आहे. अकोले तालुक्यासारख्या ठिकाणी असे प्रकार घडतात या फार मोठे दुर्दैव आहे. मात्र, जर स्त्री अत्याचार, बाल गुन्हेगारी यावर कोणी बोलायला उठले तरी मात्र, पाट्याच्या पाट्या बोलतील. मात्र, येथे बालगुन्हेगारी, बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार याबाबत फार जागरुकतेची गरज असल्याचे दिसून येत आहे.